2024 Guru Purnima Wishes in Marathi | गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

‘गुरुने दिला ज्ञानरुपी वसा… आम्ही चालवू हा पुढे वारसा’ गुरुचे अस्तित्व प्रत्येकाच्या आयुष्यात दिशादर्शकाचे काम करते. आई ही सगळ्यांचीच सर्वप्रथम गुरु. तिच्याकडूनच लहानपणी अनेक गोष्टींचे बाळकडू पाजले जाते. समाजात वावरण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टींचे ज्ञान ही आईरुपी गुरु आपल्याला देते. त्यानंतर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात मार्गदर्शक रुपाने आपल्याला वेगवेगळ्या गुरुंचे मार्गदर्शन लाभते. अशा या गुरुंना वंदण्यासाठी त्यांनी दिलेल्या ज्ञानाचे ऋण व्यक्त करण्यासाठी ‘गुरुपौर्णिमा’ साजरी केली जाते. आषाढ महिन्यातील शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. भारतात फार पुरातन काळापासून गुरु-शिष्य परंपरा आहे. गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असे म्हणतात. गुरुपौर्णिमेची संपूर्ण माहिती शाळेत अनेकांना दिली जाते. या खास दिवशी तुमच्या गुरुंना तुम्हाला शुभेच्छा द्यायच्या असतील तर गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा (happy guru purnima quotes in marathi), गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा संदेश (guru purnima message in marathi), गुरूपौर्णिमा स्टेटस (guru purnima status in marathi), गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा (guru purnima wishes in marathi) पाठवून तुम्ही तुमच्या गुरुंना तुमचे त्यांच्या जीवनातील स्थान दाखवून देण्यासाठी आम्ही काही खास शुभेच्छा संदेश निवडले आहेत. जे तुम्ही तुमच्या आयुष्यातील सगळ्या गुरुंना पाठवू शकता.

guru purnima wishes in marathi
guru purnima wishes in marathi

Guru Purnima Wishes in Marathi | गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

guru purnima wishes in marathi
guru purnima wishes in marathi

गुरुपौर्णिमा
आई जिने आयुष्य कस जगायचं हे शिकवलं ,
बाबा ज्यांनी प्रत्येक पैश्याची किंमत ओळखायला शिकवलं ,
शिक्षक ज्यांनी अभ्यास्या सोबत आयुष्याचे धडे शिकवले ,
Freinds ज्यांनी वाईट परिस्तिथीत धीर दिला ,
ते सगळे लोक ज्यांनी मला नवीन नवीन गोष्टी शिकवल्या ,सल्ले दिले त्या प्रत्येक गुरुचा मी आभारी आहे ,तुमच्यामुळेच मला नवीन प्रेरणा ,मार्ग मिळाला आहे तुम्हा सगळ्यांना
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

आज गुरूपौर्णिमा ,त्या प्रत्येक गुरूला मी नमन करतो ज्यांच्यामुळे मी आज इथपर्यंत पोहोचलो आहे ,तुम्ही शकवलेल्या अनमोल ज्ञानाला मी कधीच विसरणार नाही ,मी आज जे काही आहे फक्त आणि फक्त तुमच्यामुळेच आहे , गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा

जो बनवतो प्रत्येकाला मानव,
जो करतो खऱ्या-खोट्याची ओळख,
देशाच्या अशा निर्मात्यांना आमचा कोटी-कोटी प्रणाम, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा

गुरुकृपा असतां तुजवरी, गुरु जैसा बोले तैसे चालावे,
ज्ञानार्जनाचे भंडार तो, उपसून जीवन सार्थ करावे, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा

अक्षर ज्ञान नाही, तर गुरुने शिकवले जीवनाचे ज्ञान,
गुरुमंत्र आत्मसात केला, तर भवसागर ही कराल पार, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा

आई-वडिलांनी जन्म दिला, पण गुरुने शिकवली जगण्याची कला,
ज्ञान, चरित्र आणि संस्कारांची शिकवण आम्हाला मिळाली आहे,
अशा आमच्या गुरुंना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा

आधी गुरुसी वंदावे,
मग साधन साधावे,
गुरु म्हणजे माय बापं
नाम घेता हरतील पापं,
गुरुपौर्णिेमेच्या शुभेच्छा

शांतिचा पाठ पठवून, अज्ञानाचा मिटवला अंध:कार,
गुरुने शिकवले आम्हाला, कसा मिळवावा रागावर प्रेमाचा विजय,
अशा माझ्या गुरुंना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा


Guru Purnima chya hardik shubhechha

विनयफलं सुश्रूषा गुरुसुश्रूषाफलं श्रूतं ज्ञानम|
ज्ञानस्य फलं विरति: विरति फलं चाश्रवनिरोध:|
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा

गुरु तुमच्या उपकाराचे कसे फेडू मी ऋण,
लाख रुपये कमावून सुद्धा, तुम्ही आहात त्याहून अनमोल,
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

आई माझी गुरु, आई माझी कल्पतरु,
माझ्या प्रिय आईला गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा

जे जे आपणास ठावे, ते दुसऱ्यासी देई,
शहाणे करुन सोडी, सकळं जना,
तोची गुरु खरा, आधी चरण तयाचे धरा,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा

गुरुविण कोण दाखविल
वाट हा आयुष्याचा पथ हा दुर्गम,
अवघड डोंगर घाट, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा

गुरुर्ब्रम्हां गुरुर्विष्णु, गुरुदेवो महेश्वर… गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

गुरुविण कोण दाखविल वाट आयुष्याचा पथ हा दुर्गम, अवघड डोंगर-घाट ,happy gurupornima

गुरूविण न मिळे ज्ञान, ज्ञानाविण न होई जगी सन्मान.. जीवन भवसागर तराया, चला वंदु गुरूराया|.. जे जे आपणासी ठावे, ते दुसर्यासी देई, शहाणे करून सोडी, सकळ जना.. तो ची गुरू खरा, आधी चरण तयाचे धरा.. आपणास गुरूपोर्णिमा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

“आज गुरुपौर्णिमा”
ज्यांनी मला घडवलं,
या जीवनात मला जगायला शिकवलं, लढायला शिकवलं,
अशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे… असेच माझ्या पाठीशी उभे रहा,
माझ्यासाठी प्रत्येक व्यक्ती गुरु आहे. मग तो लहान असो व मोठा..
मी प्रत्येकाकडून नकळत खुप काही शिकत असतो..
अशा आपल्या सारख्या लहान मोठ्या थोर व्यक्तींना माझा हृदयापासून धन्यवाद…!
गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

हिऱ्याप्रमाणे पैलू पाडतो तो गुरु, जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवतो तो गुरु, जीवनातला खरा आनंद शोधायला शिकवतो तो गुरु, आव्हानावर मात करायचा आत्मविश्वास मिळवून देतो तो गुरु, गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

आज गुरुपौर्णिमा”
माझ्या जीवनातील माझे गुरु आई-बाबा, माझे गुरुजन, माझे बंधू, माझी पत्नी, माझी मुले तसेच,
माझ्या आयुष्याच्या वाटचालीत मला वेळोवेळी मार्गदर्शन
व आधार देणारे माझे सर्व मित्र मंडळी, नातेवाईक,
समाजातील न्यात अज्ञात व्यक्ती आपण सर्वजण मला वंदनीय व गुरुतुल्य आहेत…
आपणाकडून जीवनात खुप काही शिकता आले,
सर्वांचे धन्यवाद!
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपणा सर्वांना वंदन व शुभेच्छा…
जय गुरुदेव दत्त ..

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

योग्य काय, अयोग्य काय ते आपण शिकवता
खोटे काय, खरे काय ते आपण समजावता
जेव्हा काहीच सुचत नाही अशा वेळी आमच्या अडचणी दूर करता
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

आदी गुरूसी वंदावे | मग साधनं साधावे ||1||

गुरु म्हणजे माय बापं | नाम घेता हरतील पाप || 2||

गुरु म्हणजे आहे काशी | साती तिर्थ आहे तया पाशी ||3||

तुका म्हणे ऐंसे गुरु | चरण त्याचे हृदयीं धरू ||4||

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

 

गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा.. गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य.. गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती.. गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य.. गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतिक.. आजपर्यंत कळत नकळतपणे ज्ञान देणाऱ्या सर्वांना, आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझे वंदन…!! गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..


हे पण वाचा :-

बाबा मराठी सुविचार

आईसाठी स्पेशल मराठी सुविचार

Family Quotes in Marathi


Guru Shishya Quotes in Marathi

 guru purnima quotes in marathi
guru purnima quotes in marathi
  • गुरू म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा.
  •  जेव्हा जेव्हा चुकीच्या मार्गावर गेलो तेव्हा तेव्हा गुरूने रस्ता दाखवला आहे.
  •  तुम्हीच शिकवले बोट पकडुन चालायला, तुम्हीच सांगितले ठोकर लागल्यावर पुन्हा पुन्हा चालायला.
  •  गुरू तुमच्या उपकाराची कसे फेडू मी मोल, लाख किमती असेल धन पण गुरू माझा अनमोल.
  •  जो बनवतो आपल्याला माणूस आणि सत्य असत्याचे ज्ञान देशाच्या त्या सर्व शिक्षकांना आम्ही करतो शत शत प्रणाम.
  •  गुरु विना ज्ञान नाही आणि ज्ञानाविना आत्मा नाही.
  •  ध्यान, ज्ञान, धैर्य आणि कर्म ह्या सर्वच गुरुच्या देणंग्या आहेत.
  • guru purnima chya hardik shubhechha in marathi
  • गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

Leave a Comment