आईच्या वाढदिवसासाठी गिफ्ट आयडियाज | Gift Ideas for Mothers Birthday

आईच्या वाढदिवसासाठी गिफ्ट आयडियाज
आईच्या वाढदिवसासाठी गिफ्ट आयडियाज

आई हा असा शब्द आहे, ज्यामध्ये भावना आणि प्रेम दोन्ही गोष्टी सामावलेल्या आहेत. हा शब्द उच्चारताच जणू मनाला एकदम छान वाटतं. तर आईची प्रत्येक प्रार्थनाही तिच्या मुलांच्या प्रगती आणि आरोग्यासाठीच असते. त्यामुळेच जगभरात असं म्हटलं जातं की, आईचं महत्त्व कधीच कमी होऊ शकत नाही आणि तिच्या जागा आपल्या आयुष्यात कोणी घेऊ शकत नाही. आईच्या प्रेमाचं आणि ममतेचं मोल आपण आयुष्यभर फेडू शकत नाही. मग तिच्यावरील प्रेम जाहीर करण्याचा एक उत्तम दिवस म्हणजे तिचा वाढदिवस नाही का? आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासोबतच तिच्यासाठी भरपूर काही करण्याची आपली इच्छा असते. कारण हा दिवस फक्त तिच्यासाठीच नाहीतर आपल्यासाठीही खास असतो. म्हणूनच आईच्या वाढदिवसासाठी शुभेच्छांसोबत गिफ्ट आयडियाज देण्यासाठी खालील लेख नक्की वाचा.

 

1) ज्वेलरी बॉक्स

आईच्या वाढदिवसाला तिच्यावरील प्रेम जाहीर करणे आणि तिला एखादं सुंदर गिफ्ट देण्याचा विचार करत असाल तर खास हँडीक्राफ्टेड ज्वेलरी बॉक्स हा उत्तम पर्याय आहे. छान कोरीव काम असलेला ज्वेलरी बॉक्स तुमच्या आईला नक्कीच आवडेल.

 

2) कस्टमाईज्ड क्रिस्टल शो पीस

जर तुम्हाला आईला वाढदिवसाला काहीतरी हटके आणि वेगळं गिफ्ट द्यायचं असेल तर कस्टमाईज्ड 3डी क्रिस्टल शो पीससुद्धा देऊ शकता. हे दिसायला तर सुंदर असतातच त्यासोबतच समोरच्या व्यक्तीलाही लगेच आवडतात. यामध्ये तुम्ही तुमच्या मम्मीचा फोटो किंवा संपूर्ण कुटुंबाचा फोटो लावून तिला गिफ्ट करू शकता.

 

3) गोल्डन रोज 

खरंतर हे गिफ्ट पाहून तुम्ही म्हणाल हे तर व्हॅलेंटाईन डे चं गिफ्ट वाटतंय. पण तसं नाहीये. हे गिफ्ट आहे आपल्या गोल्डन हृदयाच्या आईसाठी. जिच्यामुळे आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण सोनेरी आहे. गोल्ड प्लेटेड रोजसोबतच आजकाल ग्रीटींग कार्डही मिळतं.

 

4) स्मार्ट वॉच

Gift Ideas for Mothers Birthday
Gift Ideas for Mothers Birthday

आई आपल्या सगळ्यांची काळजी घेते, पण ती स्वतःची काळजी घ्यायला मात्र साफ विसरते. मग यंदा वाढदिवसाला तिला द्या छान स्मार्ट वॉच. ज्यामध्ये तुमच्या आईच्या हृदयाची गती, तिची रोजची चाललेली पाऊले आणि बर्न कॅलरीज सर्व दिसतील. तसंच तिला यामध्ये तिच्या मोबाइलवरचे कॉल आणि नोटिफिकेशन्स ही दिसतील. आपल्या आईला वाढदिवसाच्या निमित्ताने द्या हे छान निरोगी आयुष्याची सुरूवात करून देणारं गिफ्ट.

5) बेकिंग किट

टीव्हीवर किंवा युट्यूबवर केक पाहून तिची ही नेहमी केक बनवण्याची इच्छा असते. पण उगाच कशाला जास्तीचं सामान घ्यायचं म्हणून ती टाळाटाळ करते. मग तुम्ही तिची ही आवड पूर्ण करा. ऑनलाईन तुम्हाला बेकिंग किट अगदी आरामात ऑर्डर करता येईल. यामध्ये भरपूर व्हरायटी उपलब्ध आहे.

6) स्मार्ट स्पीकर

आपल्या स्मार्ट मम्मीसाठी स्मार्ट गिफ्ट तर घ्यायलाच हवं ना. मग तुमच्याही आईला गाणी ऐकण्याची आवड असेल किंवा व्यायाम करताना म्युझिक लावून डान्स करत असेल तर हे गिफ्ट एकदम परफेक्ट आहे. स्मार्ट म्युझिकल बॉक्समध्ये तुम्ही अलार्म सेट करू शकता तसं कॉलही घेऊ शकता. यासोबतच यात अनेक ऑप्शन्स असतात. आता तुमच्या आईला किचनमध्येही गाणी ऐकत ऐकत स्वयंपाक करता येईल किंवा कॉल अटेंड करता येईल.

7) स्पोर्ट्स शूज 

आईच्या वाढदिवसाला स्मार्ट वॉच देणं शक्य नसल्यास तुम्ही स्पोर्ट्स शूजचा पर्याय निवडू शकता. कारण आई स्वतःकडे कधीच लक्ष देत नाही. घरातल्या सगळ्यांची काळजी घेण्यात ती स्वतः कडे हमखास दुर्लक्ष करते. मग तिला छान स्पोर्ट्स शूज घेऊन द्या आणि रोज तिच्यासोबत वॉकला जायला तुम्हीही सुरूवात करा. यामुळे आईसोबत वेळ ही घालवता येईल आणि आईच्या फिटनेसचंही काम होईल.

 

9) फेशियल किट

आईच्या फिटनेससोबतच तिच्या त्वचेची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. मग या वाढदिवसाला तिला द्या छानसं फेशियल किट. जे वापरून आईला तिच्या त्वचेची काळजी घेता येईल. यामध्येही बरीच व्हरायटी तुम्हाला बाजारात पाहायला मिळेल.

 

10) वॉच बांगडी

जर तुम्हाला आईला गिफ्ट नेमकं काय द्यायचं याबाबत मनात शंका असेल तर हा उपाय म्हणजेच गिफ्ट अगदी सोपं आहे. या वाढदिवसाला आईला द्या घड्याळ रूपातील बांगडी. आता याबाबत जास्त विचार करण्याचीही गरज नाही. सध्या अशा घड्याळ्यांचा ट्रेंड सुरू आहे. असं घड्याळ दिल्यास आईला एखाद्या फंक्शनलाही घालता येईल आणि इतरवेळीही घालता येईल. तुमच्या आईच्या हातात असं घड्याळ कम बांगडी फारच सुंदर दिसेल.

gift ideas for mother birthday marathi
gift ideas for mother birthday marathi

 

11) कस्टमाईज्ड वॉल क्लॉक

आपल्या आईचा प्रत्येक दिवस घड्याळ्याच्या काट्यानुसार धावत असतो. तिला सतत घाई असते आणि काम आवरायची लगबग असते. अशावेळी तिला खास कस्टमाईज्ड वॉल क्लॉक गिफ्ट द्या. ज्यावर तुमचा आणि तिचा किंवा कुटुंबाचा फोटो असेल. हे घड्याळ पाहून तिला तुमची छान आठवणही होत राहील.

 

12) सुंदरशी साडी

जर तुम्हाला तुमच्या आवडीने आईला एखादी साडी गिफ्ट करायची असल्यास तो पर्यायही आहेच. जर तिला आवडलेली एखादी साडी तुम्ही तिला आठवणीने घेऊन दिलीत तर ती जास्तच खूष होईल, यात शंका नाही. मग आईच्या आवडीनुसार तिला छानशी साडी या वाढदिवसाला भेट म्हणून द्या.

 

13) आवडीचं पुस्तक

आईला जर वाचनाची आवड असेल तर तिच्या आवडत्या लेखकांचं पुस्तकही तुम्ही तिला भेट देऊ शकता. दिवसभराच्या कामानंतर फावल्या वेळात तिला ते पुस्तक नक्कीच वाचता येईल. यासाठी ती हमखास वेळही काढेल यात शंका नाही.

 

14) बेल ब्रास हॅगिंग गणेश

प्रत्येक आई ही देवभोळी असतेच असते. आपल्या कुटुंबासाठी, लेकरांसाठी ती सतत देवाला धारेवर धरूनच असते. मग आपल्या आईला असं छान गणपतीचा शो पीस नक्की भेट द्या. हा तुमच्या घराची शोभाही वाढवेल आणि आईलाही नक्कीच आवडेल.

अशा प्रकारे यंदा आपल्या आईला सरप्राईज करा आणि छानसं गिफ्ट देऊन तिचा वाढदिवस नक्की साजरा करा.

Leave a Comment