2023 Janmashtami Wishes in Marathi | दहीहंडी ,गोकुळाष्टमी शुभेच्छा मराठीमध्ये

‘आज गोकुळात रंग खेळतो हरी… राधिके, जरा जपून जा तुझ्या घरी’  भगवान श्रीकृष्णाचा जन्म ज्या दिवशी झाला तो दिवस जन्माष्टमी म्हणून ओळखला जातो. यालाच गोपालकाला, दहीकाला, दहीहंडी असे देखील म्हटले जाते. पारंपरिक हिंदू धारणेनुसार श्रीकृष्ण हा हिंदूचा आठवा अवतार मानला जातो. श्रावण महिन्यातील सण यांचे हिंदू धर्मात फारच महत्व आहे श्रावण महिन्याच्या कृष्ण अष्टमी तिथीला श्रीकृष्णाचा जन्म झाला.  यंदा 30 ऑगस्ट 2021 रोजी गोकुळाष्टमी आली आहे.या दिवशी तुम्ही तुमच्या जवळ्च्या व्यक्तिंना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा (Happy Janmashtami Wishes In Marathi), कृष्ण जन्माष्टमी कोट्स (Krishna Janmashtami Quotes In Marathi), दहीहंडी शुभेच्छा (Dahi Handi Wishes In Marathi), हॅपी जन्माष्टमी स्टेटस (Happy Janmashtami Status In Marathi), कृष्ण जन्माष्टमी मेसेज (Krishna Janmashtami Message In Marathi) आणि जन्माष्टमी मराठी एसएमएस (Happy Janmashtami Marathi Sms) पाठवू शकता.

Janmashtami Chya Hardik Shubhechha
Janmashtami Chya Hardik Shubhechha

2021 जन्माष्टमी च्या हार्दिक शुभेच्छा मराठी (Janmashtami Chya Hardik Shubhechha In Marathi)

जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा (Janmashtami Chya Hardik Shubhechha In Marathi) आपल्या नातलग आणि मित्रांसोबत शेअर करण्यासाठी तुम्हाला खालील शुभेच्छा नक्कीच उपयोगी पडतील.

त्याच्या प्रेमात न्हाऊन निघाली राधा
गोड बासरीच्या नादाने बहरली राधा
अशा सावळ्या सुंदर हरीवर जडले प्रेम कायमचे आता ,जन्माष्टमी च्या हार्दिक शुभेच्छा .

दही हंडी, गोकुळाष्टमी, जन्माष्टमी
नाव अनेक पण उत्साह तोच
जन्माष्टमीच्या मनःपू्र्व शुभेच्छा

janmashtami wishes in marathi
janmashtami wishes in marathi

जसा आनंद नंदच्या घरी आला
तसा तुमच्या आमच्याही येवो
प्रत्येक घरी कृष्ण जन्म होवो
जन्माष्टमीचा हार्दिक शुभेच्छा

पुत्रातील पुत्र श्रीकृष्ण बासरीवाला
ज्याच्या लीलांना सगळ्यांना भुरळ
तो परम प्रिय नंदलाला शुभ जन्माष्टमी

राधाचं प्रेम, बासरीचा गोड नाद
लोण्याचा स्वाद, गोपींसोबतची रास
असा आहे आजचा दिवस खास
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा

2021 जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा (Happy Janmashtami Wishes In Marathi)

Janmashtami Wishes In Marathi
Janmashtami Wishes In Marathi

गोकुळात होता ज्याचा वास, गोपिकांसोबत ज्याने रसला रास,
यशोदा,देवकी होत्या ज्याच्या माता, तोच साऱ्या जगाचा लाडका कृष्ण कन्हैया,
जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!

दही-दूध-लोणी आहे ज्याचा छंद,
तो आमचा लाडका श्रीकृष्ण ,
सगळ्यांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा!

राधेची भक्ती, बासरीची गोडी,
लोण्याचा स्वाद, सोबत गोपिकांचा रास
मिळून साजरा करुया श्रीकृष्ण जन्माष्टमीचा दिवस
गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा!

कृष्ण ज्याचं नाव, गोकुळ ज्याचं गाव
अशा भगवान श्रीकृष्णाला प्रणाम,
गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा!

चंदनाचा सुगंध, फुलांचा हार,
पावसाचा सुगंधआणि
आली राधा-कृष्ण याच्या
प्रेमाची बहर
गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा!

2021 दहीहंडी शुभेच्छा (Dahi Handi Wishes In Marathi)

Dahi Handi Wishes In Marathi
Dahi Handi Wishes In Marathi

दह्यात साखर, साखरेत भात
दहीहंडी उभी करुन देऊया एकमेकांना साथ,
फोडूया हंडी लावून उंच थर,
जोशात साजरा करुया दहीहंडीचा हा सण,
दहीहंडीच्या शुभेच्छा!

तुझ्या घरात नाही पाणी,
घागर उताणी रे गोपाळा,
गोविंदा तान्ह्या बाळा,
गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा!

विसरुनी सारे मतभेद
लोभ- अहंकार सोडा रे
सर्वधर्मसमभाव जागवून
आपुलकीची दहीहंडी फोडा रे,
दहीहंडीच्या शुभेच्छा!

कृष्णाच्या भक्तीत होऊन जाऊ दे दंग
अति उत्साहात अजिबात करु नका नियमभंग,
दहीहंडीच्या शुभेच्छा!

आला रे आला गोविंदा आला,
गवळ्यांच्या पोरींनो जरा मटकी सांभाळा, दहीहंडीच्या शुभेच्छा!

दही हंडीचे कोट्स मराठी (Dahi Handi Quotes In Marathi)

सण बदलला आहे
पण श्रीकृष्णावरचे प्रेम कायम आहे
देवकी नंदन हे कृष्ण नंदलाला

सण तोच आहे
कदाचित आपण बदललो आहे
हंडी फोडणारे हात आता
दर्शक बनले आहेत आणि टाळ्या वाजवत आहेत

कृष्ण ज्याचं नाव
गोकुळ ज्याचं गाव
अशा कन्हैयाला
आम्हा सगळ्यांचं नमन

तो येतो दंगा करतो
हातात घेऊन बासरी
कपाळावर आहे मोरपीस
चोरून घेतो लोण्याचा गोळा
फोडून दही हंडी करतो धमाल
असा आहे नटखट नंद किशोर

आमच्या हृदयात आहे तुझं स्थान
हे नंदलाला लवकर ये आणि दहीहंडी फोड
जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा

कृष्ण जन्माष्टमी कोट्स (Krishna Janmashtami Quotes In Marathi)

रुप मोठे प्रेमळ आहे, चेहरा त्याचा निराळा आहे,
सर्वात मोठ्या समस्येला, श्रीकृष्णाने सहज पार केले आहे

सकाम निष्मकाम भक्ती कामनेनं फळं घडे
नि: काम भजने भगवंत जोडे | फळ भगवंता  कोणीकडे.. (दासबोध)
अर्थ:  सकाम भक्ती केली तर  कामना  पूर्ण होईल.

वासुदेव: सर्वमति! ( सर्व जड आणि चेतन अशा सृष्टीत परमेश्वर आहे).

जेव्हा एखादा जास्त हसणारा आणि आनंदी राहणारा माणूस अचानक गप्प राहतो, त्यावेळी तो मनुष्य आतून तुटला आहे हे लक्षात घ्यावे .

अन्यायाचा स्वीकार कधीही करु नका, भगवान कृष्ण हे शांतप्रिय होते, पण त्यांनी
अन्यायाचा  कधीही स्विकार केला नाही. अन्यायाविरुद्ध आवाज उठवला.

हॅपी जन्माष्टमी स्टेटस (Happy Janmashtami Status In Marathi)

जन्माष्टमीच्या दिवशी खास स्टेटस ठेवून जर तुम्ही हा आनंद वाटणार असाल तर तुमच्यासाठी खास जन्माष्टमी स्टेटस (Happy Janmashtami Status In Marathi) या स्टेटसमधून तुम्हाला जनजागृतीही करता येईल.

एकमेकांचे पाय खेचण्यापेक्षा
सोबतीने ध्येय गाठण्याची शिकवण देणाऱ्या
दहीहंडी सणाच्या शुभेच्छा!

भगवान कृष्णाची शिकवण घेऊन करुया
मानवी जगाचे कल्याण,करुया दहीहंडीच्या शुभेच्छा!

दहीकाल्याचा उत्सव मोठा नाही आनंदाला तोटा, दहीहंडीच्या शुभेच्छा!

दही, लोणी ज्याची आवड… आज आहे त्याचा जनमदिवस… गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा

आजच्या या पवित्र दिनी भगवान कृष्णाने घेतला जन्म

कृष्ण जन्माष्टमी मेसेज (Krishna Janmashtami Message In Marathi)

मेसेज मधून शुभेच्छा देण्याची एक मजाच वेगळी असते. तुम्हालाही तुमच्या आप्तेष्टांना शुभेच्छा द्यायच्या असतील तर तुम्ही त्यांना कृष्ण जन्माष्टमीचे मेसेज (Krishna Janmashtami Message In Marathi) पाठवू शकता.

 हाथी घोडा पालखी… जय कन्हैया लालकी, कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा

दिन आला मोठा आज कृष्ण आमचा पृथ्वीतलावर आला, कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा

कृष्णाची भक्ती कृष्णाची शक्ती अपरंपार… कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा

कलेकलेने चंद्र वाढतो चिमणा नंदाघरी,
जगोद्धारा घरी यशोदा,पाळण्याची दोरी,कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा

वसुदेवं सुतं देव, कंस चाणूर मर्दनम
गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा!

जन्माष्टमी मराठी एसएमएस (Happy Janmashtami Marathi Sms)

 •  गोकुळाष्टमीच्या दिवशी आमची शुभकामना, पूर्ण होवोत तुमच्या सगळ्या इच्छा
 •  जय श्री कृष्ण म्हणून करुया दिवसाची सुरुवात, गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा
 •  कृष्णाचा जन्म झाला, आनंद हा मनी जाहला… गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा!
 •  कृष्णाची भक्ती मनी त्याची शक्ती… गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा!
 •  रंग सावळा ग ज्याचा प्रेमळ ग तो सखा, आला आला माझा कृष्ण कन्हैय्या आ

श्रीकृष्ण जन्म कथा ( krishna janma story in marathi )

द्वापर युगात, राजा उग्रसेन मथुरा शहरावर राज्य करत होता. राजा उग्रसेनला कारागृहात कैद करून त्याचा मुलगा कंस राजसिंहावर बसून स्वतः मथुरेचा राजा बनला. कंस आपल्या बहिणी देवकीवर अती प्रेम करत होता. देवकीचे वासुदेव यदुवंशी सरदारशी लग्न झाले होते. त्यावेळी कंस आपली बहीण देवकीला रथात घेऊन तिच्या सासरच्याकडे निघाला होता. सासरी जात असतानाच वाटेत एक आकाशवाणी झाली, “हे कंस, ज्या देवकी ला तू मोठ्या आनंदतात घेऊन चालला आहेस, त्याच देवकी चा ८ वा पुत्र तुजा वध करेल”.हे ऐकून कंस फारच संतापला आणि त्याने आपल्याच प्रिय बहिणीला मारायचा प्रयत्न केला.

कंसानं ठरवलं की देवकीला मारून टाकली तर तिला पुत्र होणारच नाही आणि माझ्या मृत्यूचा धोका टळेल. वासुदेवजींनी कंसाला समजावून सांगितले की तुम्हाला देवकीचा धाक नाही पण तुम्हाला देवकीच्या आठव्या मुलापासून धोका आहे. आमच्या आठव्या मुलाचा जन्म होताच, मी तो तुमाला स्वाधीन करेन. असा वासुदेवाने कंसाला शब्द दिला. त्या नंतर कंसाने  दोघांनाही तुरूंगात टाकले.त्याचवेळी नारद जी तेथे आले. नारदजींनी, कंसाला हा सल्ला दिला की, तुला कसे समजेल कि आठवा पुत्र कोणता आहे. गणना प्रथम पासून सुरू होईल कि शेवट पासून. या सल्ल्यानुसार कंसाने देवकीच्या सर्व मुलांना ठार मारण्याचा निर्णय घेतला.

तुरुंगात देवकीने सात मुलांना जन्म दिला आणि कंसाने देखील प्रत्येकाची निर्घृण हत्या केली. जेव्हा आठव्या मुलाच्या जन्माची वेळ आली तेव्हा कंसाने तुरूंगात पहारा अजून काटेकोर केला.

भगवान श्री कृष्ण यांचा जन्म रोहिणी नक्षत्रात भाद्रपद मासातील कृष्णपक्षाच्या अष्टमीला झाला होता. त्यानंतर भगवान श्री विष्णू प्रकट झाले व त्यांनी वासुदेवजींना सांगितले की त्यांचा जन्म स्वतःच त्यांचा मुलगा म्हणून झाला आहे. वासुदेवजींना असा आदेश देण्यात आला होता की नंदबाबाच्या घरी मला वृंदावनात सोडले पाहिजे आणि यशोदाच्या गर्भाशयातून जन्मलेल्या मुलीला तुरूंगात आणावे आणि यशोदेच्या गर्भातून स्वतः मायेचा जन्म झाला होता. सर्व विधाने ऐकल्यानंतर वासुदेव जी आदेशानुसार काम करण्यास सुरवात करू लागले.

भगवान श्रीकृष्णाला टोपलीमध्ये ठेवता क्षणीच सर्व  सैनिक बेहोश झाले आणि तुरूंगाचे कुलूप आपोआपच उघडले. श्रीकृष्णासमवेत वासुदेव जी वृंदावनला रवाना झाले. अष्टमीच्या काळ्या रात्री मुसळधार पाऊस पडत होता, यमुना नदी पूर्ण भरली होती. वासुदेवजींनी टोपली डोक्यावर ठेवून यमुना नदी ओलांडून वृंदावन गाठली. श्रीकृष्णांना यशोदा जवळ ठेवले आणि मुलीला मथुरा येथे घेऊन आले. जेव्हा कंसाला आठव्या मुलाच्या जन्माची माहिती मिळाली तेव्हा त्वरित तुरुंगात पोहोचला. त्याने पाहिले की पुत्र मुलगा नसून एक कन्या आहे. तरीही त्याने तिला जमिनीवर आपटून मारहाण करण्यास सुरवात केली. कंसाचा हातातून निसटून मुलीने मायाचे रूप धारण केले. मग माया म्हणायला लागली, “मला मारून तुला काय मिळेल? तुमचा काळ वृंदावनात जन्मला आहे आणि लवकरच तुला नष्ट करील”.

श्रीकृष्णाच्या जन्माचा शोध लावण्यासाठी त्यांनी वृंदावनमधील सर्व नवजात शिशु शोधले. यशोदाचा लाल(श्री कृष्ण भगवंत) सापडल्यावर कंसाने अनेक असुरांना पाठवून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला पण त्याचा कोणताही प्रयत्न यशस्वी झाला नाही. यशोदाचा मुलगा वासुदेव-देवकीचा आठवा मुलगा आहे याचा त्याला एक संकेत मिळाला.

मोठे झाल्यावर श्रीकृष्णाने आपल्या मामा कंसला त्याच्या पापांसाठी शिक्षा देऊन ठार केले. आणि राजा उग्रसेनाला गादीवर बसवले. तसेच वासुदेव-देवकी यांची तुरूंगातून सुटका करण्यात आली. भगवान श्रीकृष्णाच जन्म दिवस, तेव्हापासून संपूर्ण देशात हा पवित्र दिवस मोठ्या आनंदाने जन्माष्टमीच्या स्वरूपात साजरा करण्यात येतो.

krishna janmashtami marathi Songs

 1. Rangala Re Hari  – Tap To Listen
 2. Saware Shyam – Tap To Listen
 3. Govinda Ala Re – Tap To Listen
 4. Mach Gaya Shor – Tap To Listen
 5. Govinda Ala Re – Tap To Listen
 6. Govin  Ala Re Ala – Tap To Listen
 7. Har Taraf Hai Ye Shor – Tap To Listen
 8. Shor Mach Gaya Shor – Tap To Listen
 9. Dhakkumakun Dhakkumakun  – Tap To Listen
 10. Govinda Re Goapala – Tap To Listen

 Shri Krishnacha Paalana Marathi Lyrics

Shri Krishnacha Palana Pahilya Divashi

श्री कृष्ण पाळणा:
पहिल्या दिवशी जन्मले बाळ कळस सोन्याचा देते डहाळ
कृष्ण जन्मला कंसाचा काळ जो बाळा जो जो रे जो……………..॥धृ॥

दुसऱ्या दिवशी दुसरा रंग रूप सावळे गोरस रंग
जसा झळकतो आरशाचा भिंग..॥२॥

तिसऱ्या दिवशी आनंद मोठा सीता सावित्री बायांनो उठा
खारीक खोबरं साखर वाटा ……..॥३॥

चौथ्या दिवशी बोलली बाळी अनुसयेनं वाजविली टाळी
कृष्ण जन्मला यमुना तळी ……..॥४॥

पाचव्या दिवशी सटवाईचा वेढा लिंबू नारळ देवीला फोडा
तान्ह्या बाळाची द्रुष्ट गं काढा………॥५॥

सहाव्या दिवशी कलीचा मारा राधा कृष्णाला घालते वारा
चला यशोदा आपुल्या घरा ……..॥६॥

सातव्या दिवशी सटवीचा महाल तेथे सोनेरी मंडप लाल
यशोदा मांडीवर श्रीकृष्ण डोलं ..॥७॥

आठव्या दिवशी आठवीचा थाट भूलल्या गवळणी तीनशे साठ
श्री कृष्णाची पाहतात वाट ………॥८॥

नवव्या दिवशी नवतीचा फंद तान्ह्या बाळाने घेतला छंद
वासुदेवाचा सोडवावा बंध ………॥९॥

दहाव्या दिवशी भाग्येची रात तेहतीस कोटी देव मिळूनी येती
उतरून टाकती माणिक मोती ….॥१०॥

अकराव्या दिवशी नारद बोले देवा तुम्ही हो किती झोपले
मथुरा नगरीत देवकीचे हाल …..॥११॥

बाराव्या दिवशी बाराच नारी पाळना बांधिला यशोदा घरी
त्याला लावली रेशमी दोरी …….॥१२॥

तेराव्या दिवशी बोलली बाळी श्रीकृष्ण जन्मला यमुना तळी
गवळणी संगे लावितो खळी ….॥१३॥

चौदाव्या दिवशी तोफा गर्जती शंकर पार्वती नंदिवर येती
बाळाच्या डोळ्यात काजळ घालती ॥१४॥

पंधराव्या दिवशी नौबत वाजे श्रीकृष्णावरती घातला साज
यशोदा मातेला आनंद आज …॥१५॥

सोळाव्या दिवशी सोहळा केला गुरु महाराज विद्या बोलला
श्रीकृष्णाचा पाळणा गायीला जो बाळा जो जो रे जो…..॥१६॥

हे पण वाचा ⇓⇓

Leave a Comment