Table of Contents
पिठोरी अमावस्या हा श्रावण महिन्यातील शेवटचा सण असतो. महाराष्ट्रात या दिवशी मातृदिन (Matru Din), बैल पोळा (Bail Pola) देखील साजरा केला जातो. यंदा महाराष्ट्रामध्ये पिठोरी अमावस्या ही 6 सप्टेंबर दिवशी साजरी केली जाणार आहे .
व्रत वैकल्य आणि उपास-तापसांनी भरलेला श्रावण महिना हा पिठोरी अमावस्ये (Pithori Amavasya) दिवशी संपतो. पिठोरी अमावस्या हा श्रावण महिन्यातील शेवटचा सण असतो. महाराष्ट्रात या दिवशी मातृदिन (Matru Din), बैल पोळा (Bail Pola) देखील साजरा केला जातो.. आई आणि तिच्या मुलांचं नातं जपणारा हा सण महिला पिठोरी अमावस्या व्रत घेऊन पूर्ण करतात. या दिवशी अतिथींचं स्वागत करण्यालाही विशेष महत्त्व आहे.
पिठोरी अमावस्या तारीख आणि शुभ वेळ
अमावस्येची तारीख सुरू होते: 6 सप्टेंबर 2021 संध्याकाळी 07:40 पासून अमावस्या तिथी 7 सप्टेंबर 2021 रोजी संध्याकाळी 06.23 वाजता संपेल.
पिठोरी अमावस्या व्रत कसे करतात ?
पिठोरी अमावस्या व्रतामध्ये चौसष्ठ योगिनी या पुजेच्या देवता मानल्या जातात.या दिवशी व्रत करणार्या महिला उपवास करतात. संध्याकाळी आठ कलशांची प्रतिष्ठापना केली जाते. त्यामध्ये ब्राम्ही, महेश्वरी, वैष्णवी, वाराही, कोमारी, इंद्राणी, चामुंडा यांच्य मूर्तीची स्थापना केली जाते. तांदळाच्या राशीवर 64 सुपा-या मांडून त्यांचे आवाहन केले जाते. या चौसष्ठ योगिनी या मनुष्याच्या उपजीवेकेसाठी उपयुक्त अशा 64 कला आहेत. त्यांची ही प्रतिकं समजली जातात आणि पूजा होते. या दिवशी पिठाचे दिवे करुन पूजन करण्याच्या प्रथा असल्याने हा दिवस “पिठोरी अमावस्या” म्हणून ओळखला जातो.
पिठोरी अमावस्या व्रत कहाणी (Pithori Amavasya katha )
पुराणातील कथे नुसार, श्रीधर आणि सुमित्रा या दांम्पत्याच्या सुनेला झालेली मुलं जगत नसतं. एका श्रावण अमावस्यादिनीदेखील त्यांना झालेले मूल मरण पावले. घरात श्राद्ध पाहून सासूने सुनेला बाहेर काढले. मृत बालकासह सून अरण्यात गेली. तिथे तिची एका देवीशी गाठा पडली. त्या देवतेने तिला आश्रमात राहण्याचा सल्ला दिला. त्या रात्री 64 योगिनी येऊन ‘कोणी अतिथी आहे का?’ असा प्रश्न विचारतील त्यावेळेस त्यांना शरण जाऊन नमस्कार कर, तुझे दु;ख सांग असा सल्ला दिला. त्यानुसार सुनेने सारी कहाणी झाल्यानंतर तिची मुलं पुन्हा जीवंत झाली. पिठोरी अमावस्ये दिवशी पिठाचे दिवे केले जातात. नैवेद्यालाही पिठापासून बनवलेला एक गोडाचा पदार्थ असतो.
पिठोरी अमावस्या पूजा विधी
भाद्रपद महिन्यात अमावास्येच्या उपवासाला खूप महत्त्व आहे. या दिवशी फक्त महिला आणि माता उपवास करू शकतात. हे व्रत अविवाहित स्त्रियांसाठी नाही. या दिवशी सकाळी उठून स्नान करा (शक्य असल्यास पवित्र नदीत), शक्य असल्यास पाण्यात गंगाजल शिंपडा. स्नान केल्यानंतर स्वच्छ कपडे घाला आणि व्रताला सुरवात करा .म्हणून, या दिवशी पीठाने 64 देवींच्या मूर्ती बनवण्याचा प्रथा आहे. त्यांचे कपडे घालून त्यांची पूजा केली जाते.मूर्तींचे दागिने बनवण्यासाठी बेसनाचे पीठ मळून घ्या आणि हार, मांग टिका, बांगड्या, कान आणि मान बनवून देवीला अर्पण करा. सर्व देवतांना एका प्लेटमध्ये ठेवा आणि त्यांना फुले अर्पण करा.
एवढेच नाही तर पूजेसाठी करंजी , शंकरपाळया , आणि मठरी बनवा आणि देवतांना अर्पण करा. पूजेनंतर पिठापासून बनवलेल्या देवी -देवतांची आरती करा.प्रार्थना केल्यानंतर पंडीजजी किंवा घरातील कोणत्याही वडिलांना पदार्थ द्या आणि त्यांच्या पायाला स्पर्श करा. पंडिताला खायला द्या आणि दान आणि दक्षिणा देऊन त्याला निरोप द्या. अशा प्रकारे केलेले व्रत पूर्ण मानले जाईल आणि उपवास फायदेशीर ठरेल.