ते आणि त्यांच्या राहिलेल्या आठवणी…

aathvani marathi status
aathvani marathi status
Stories तर फक्त 24 तासांन
मध्ये निघून जातात ,
पण त्यातील आठवणी कायमचा
राहून जातात मनात…

aathvan marathi status

सगळयांच्या आठवणीत कोणी
ना कोणी तरी असत…
फक्त ते त्या आठवणी  सगळ्यांपासून
लपवायला शिकलेले असतात…

आठवणी मराठी स्टेटस
आठवणी मराठी स्टेटस
लोक पण कशी असतात ना सुंदर आठवणी
Pendrive मध्ये आणि वाईट 
आठवणी आपल्या मनात ठेवतात.

aathvani marathi quotes

aathvani marathi quotes
aathvani marathi quotes
झोप का नाही येत हा प्रश्न तुम्हाला पडेल
ना तेव्हा समजून जायचं की
आठवणी अजून गेलेल्या नाहीत..

Junya Aathvani Status 💔

aathvani status in marathi

चल bye चाललोय मी तुझ्या सुखासाठी ,आता परत भेट होईल की नाही माहीत नाही पण हा एक पत्र सोडून जातो.

आपलं नात खुप मस्त चाललं होतं ना मग अचानक तू अशी का वागायलास लागलिस मला समजत नव्हतं .

मग खूप दिवसांनी मला माझ्या मित्रांन कढून कळाल की ती आता कोणा दुसऱ्या सोबत असते आणि त्यांचं लग्न पण ठरलं आहे

खूप मोठा धक्का बसला होता मला की मी अशीके चूक केली होती  की तू मला सोडून गेलीस ते ही न सांगता .

चल जे काही झालं असेल पण तू खुश रहा माझं काय एवढं मी राहीन असाच कुठेतरी  तुझ्या हृदयाचा एका कोपरयात तेवढच खूप आहे.

जातो मी त्या सगळ्या आठवणींसोबत ज्या तुझ्यासोबत घालवल्या होत्या.
तू तुझी काळजी घे जरा आणि जरा वेडेपणा कमी कर आता लग्न पण होईल ..

Phone वेगेरे नको लावून बघुस कारण आता तो sim पण टाकून दिला तो फक्त तुझ्यासाठी घेतलेला …Tc….❤️


आठवणी मराठी सुविचार आणि लेख ✒️

aathvani status in marathi

जेव्हा आपण पहिल्यांदा प्रेमात पडतो ना त्याच्या आधी पासून त्या व्यक्तीला आपण सतत बघत असतो social media वर ,real life मध्ये आणि एक वेगळाच connection होऊन जातो त्याव्यक्तीसोबत आणि अस काही आपण ठरवून वेगरे नाही ते आपोआप होऊन जातं …

आणि मग propose accept केल्यावर वर तर अजून जास्त होऊन जातं कारण आपण दिवस रात्र त्यांचाच विचार करत राहतो आणि तेच सतत आपल्या डोक्यात चालू असतो मग आपलं दुसऱ्या गोष्टी मन लागत नाही किंवा एक दिवस जरी ती व्यक्ती दिसली नाही तरी खूप एकटं एकटं वाटतं …

पण जर काही कारणान मूळे नात तुटतं तेव्हा तीच attachment खुल महागात पडते आपल्याला …

कारण आपल्या मेंदूला पण त्या गोष्टीची सवय होऊन गेलेली असते आणि नंतर जेव्हा आपण वेगळा विचार करायला जातो तेव्हा मेंदू ते accept नाही करत आणि मग आपल्याला त्रास होईला सुरवात होते मग त्याला आपण आठवणी अस नाव देतो .

मग यातून बाहेर कसं पडायचं खरच विसरता येते का अश्या व्यक्तींना जे आपल्या खूप close होऊन गेलेले असतात …

ठीक आहे असं झालं आहे पण तुम्ही किती प्रयत्न करताय ते पण महत्वाचं आहे कारण जर तुम्ही आशेचा बसून राहिलात आणि जर बोलाल की नाही विसरता तर नाही होणार ?

कारण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जर तुम्ही स्वतः ठरवलत ना तर काहीही शक्य आहे ,

मग त्यासाठी तुम्ही स्वताला busy ठेवा त्या कामात जे तुम्हाला आवडतं जेणेकरून तुमचं मेंदू व्यस्थ राहील ,आपल्या besties सोबत कुठे यरी फिरायला जा ,बोला त्यांच्याशी share करा आपल्या feelings ,थोडं बर वाटेल..

आणि कुठल्याही गोष्टीला वेळ लागतो रे एवढं पण सोपं नसतं अस लगेच एखादी गोष्ट विसरणं मग ती कुठलीपण असुद्या फक्त तुम्ही अस लेगच सोडून नका देऊ की काही नाही होत .


हे पण वाचा ⬇️⬇️

1 . प्रेम मराठी स्टेटस ❤️

2 . Depression प्रेरणादायी सुविचार 🔥

3 . 100+ मैत्री मराठी स्टेटस ❤️


वाईट आठवणी जेव्हा तुम्हाला झोपून देणार
नाही ना तेव्हा त्यांना सांगा ,
आता तुला परत जागा नाही आहे माझ्या आठवणीत पण
आणि आयुष्यात सुद्धा ,ती जागा मी
चांगल्या माणसांसाठी जपून ठेवली आहे ….

आठवण येते यार ..❤️🔥

खूप महिने झाले ,आता आम्ही बोलणं वेगरे सगळं बंद केलेलं ,ते block वेगरे च्या formalities पण पूर्ण केलेल्या ,
काही अधिसरख नव्हतं आता….

ती ही सगळं विसरून आता पुढे गेली असेल असं मी विचार करून पुढे चाललो होतो ..
का माहीत नाही खूप वेळानी अचानक काही gallery च्या hidden photos चे pics समोर आले ..❣️

ते बघून माझ्या डोळ्यात पण पाणी आले का कोणास ठाऊक ,का मी रडलो आणि त्याच व्यक्तीसाठी का परत रडलो …

ठरवलेलं की आता काही झालं तरी त्या व्यक्तीसाठी नाही रडायचं अस निश्चय केला होता पण काही गोष्टी खूप खोल वर जातात ना त्या अश्या नाही विसरता येत पटकन ..

मी स्वतःचीच समजूत काढत होतो की आत सगळं संपलय तरी तू का परत त्या व्यक्तीचा विचार करायला लागलास..

थोड्या वेळ बसलो होतो तोच फोटो बघत ज्यात ती आणि अमी एकत्र होतो आणि मग निर्णय घेतला की त्या ती नाही तर तिच्या आठवणी तरी कशाला म्हणून ते सगळे photo delete करून टाकले होते…❤️

नाय रे जास्त नाही पण थोडीशी आठवण आली आणि थोड्याश्या आठवणीत पूर्ण flashback डोळ्यासमोरन गेला..

ठीक आहे रे एवढं काही नाही रे येते आठवण कधीतरी त्या व्यक्तीची कारण आपण प्रेम पण तेवढच केलं असतं ना..

आता ते तुमच्यावर आहे की त्या आठवणींना धरून ठेवायच आहे की तेवढ्या पुरता रमून जाऊन सोडून देयचं आहे..


Aathvani Marathi Kavita ❤️

aathvani status in marathi

का गेलीस …. फुलासारखे तुला जपले होते
मग पाखरा सारखी उडून का गेलीस?
सावली प्रमाणे सोबत होतीस
मग ऊन पडल्यावर निघून का गेलीस?

जीवनाचा आनंद लुटायचा होता
त्या आधी आयुष्य उध्वस्त करून का गेलीस ?
तू शिल्पकार नव्हतीस
मग हृदयावर माझ्या नाव कोरुन का गेलीस ?

माझ्या अंधाराचा तू प्रकाश होतीस
मग मेणबत्ती प्रमाणे वितळून का गेलीस ?
नेहमी साथ मला दिलीस
मग मला एकट सोडून का गेलीस ?

तुला तर दुःखाची चिड होती
मग मला त्यात ढकलून का गेलीस ?
मी दिवा तर तू ज्योत होतीस
मग काजवा बनून विझवून का गेलीस ?

तुला साथ दयायची नव्हती
मग माझ्याशी ओळख करून का घेतलीस ?
तुझं माझ्यावर प्रेम नव्हतं
मग प्रेमाची भाषा बोलून का दाखवलीस ?

तुझ्या विरहातून मी सावरलो होता
मग आठवणींना उजाळा देऊन का गेलीस ?
तू मला विसरायचं होत
मग आठवण सोबत घेऊन का गेलीस ?

Credit :- सौ.शरयू खाचणे


Aathvani Marathi Quotes ❤️

aathvani status in marathi

आपल्या life मधून काही जण निघून जातात काही कारणांमुळे आणि ते नाही परत येत ,
त्या नंतर राहतात त्या फक्त आठवणी आपल्यासोबत ,

मग एक lifehacker येतो आणि सांगतो तुम्हाला त्यांना विसरायला ,हो ते गरजेच आहे ,

मला माहित आहे असं विसरता नाही येत कोणाला सहज पण यार आपल्याला पुढे जायचं ,आपल्या आई-वडिलांच्या स्वप्नांसाठी ,स्वतःसाठी कारण एकच ठिकाणी अडकून राहण्यात काही अर्थ नाही आहे ,

अस कोण बोललं तुम्हाला सगळे जे पुढे निघून जातात ते सगळ्या आठवणी विसरतात ,अस नसतं यार ,
त्यांनी फक्त आपल्या priorities बदलल्या आहेत बाकी काही नाही आणि तेच तुम्हाला करायचं आहे ,

प्रत्येक व्यक्ती वेगवेगळे असतात म्हणून तुम्हाला थोडा वेळ लागेल पण ते तुम्हाला आतून ठरवायचं आहे ,फक्त कोणी सांगतंय म्हणून ऐकणं आणि सोडून देणं याला काही अर्थ नाही आणि हे कोणासाठी नाही तुमच्या चांगल्यासाठी सांगत आहे कारण मी तेवढंच करू शकतो ,

कारण ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला खूप त्रास होत असेल ,वेदना होत असतील म्हणून सांगत आहे तुम्हाला, बदलावं लागेल

आपले विचार बदलावे लागतील ,प्रेम चांगलं असो किंवा वाईट ,त्याबद्दल बोलणं आता बंद करा कारण तेच तेच बोलून आपण अजून depress होत जातो ,

आणि तुम्हाला यातून बाहेर पडण्यासाठी कोणी मदत नाही करणार आहे ,ते तुम्हालाच ठरवायचं आहे आता की तेच धरून बसायचं आहे का ,नवीन सुरवात करायची आहे ..


आठवणी प्रेरणादायी लेख
aathvani status in marathi

तुम्ही एखाद्या व्यक्तीवर खूप प्रेम करता आणि ते कारणं देऊन किंवा न सांगता सोडून जातात आणि मग आपण आपलेच मत मांडत बसतो ,की नाही माझंच काहीतरी चुकलं असेल , मी कुठेतरी कमी पडली/पडलो असेल …

आणि आपण स्वताच त्यांच्या आठवणीत रडत बसतो ,स्वतःला कोसत ,स्वतःला त्रास करून घेतो आणि त्यामुळे घरच्यांना पण त्रास होतो ..

पण मला एकच विचारायचे की गरज काय आहे ??
काय गरज आहे त्यांची वाट बघत स्वताच आयुष्य फुकट घालवण्याची ,म्हणजे तुम्ही अजून cinema च्या दुनियेत जगत आहात का ,

खऱ्या आयुष्यात या ,स्वप्न मोडायची गरज आहे आता ,हो मान्य आहे तुम्ही खर प्रेम केलत पण ते ज्यांना कळायच होत त्यांना तर नाही कळलं ना ,मग का तुम्ही अजून त्याच गोष्टी धरून बसले आहात ,

उलट त्यातून तुम्ही धडा घेतला पाहिजे आणि पुढे त्याच कुठेतरी चांगल्या प्रकारे वापर केला पाहिजे ,
आणि जर त्यांना येयचं असेल तर येतील यार पण थांबू नका ,
ते सोडून पण खूप काही करायचं आहे रे तुम्हाला ,फक्त प्रेम झाला ,लग्न झालं म्हणजे सगळं संपत नाही यार ,

आणि जे होईच असतं ते होतच यार मग तुम्ही चांगले असो किंवा वाईट कारण ते आपल्या life च एक भाग आहे ,

अशे खूप जण आहेत जे तुमच्यासारख्या परिस्तिथी मध्ये अडकले आहेत त्यातील ज्यांना खरच काहीतरी करायचं आहे life मध्ये ते पुढे जातील आणि जे तेच धरून बसतील ते तिथेच राहतील मग नंतर तुम्हाला कोणी मदत करू शकत नाही कारण तेव्हा वेळ निघून गेलेली असेल ,

म्हणून आताच निर्णय घ्या तुम्हाला कुठला मार्ग निवडायचा आहे ,आणि जर तुम्ही प्रयत्न केलेत तर तुमची मेहनत तुम्हाला नक्कीच successful बनवेल अशी माझी खात्री आहे ..❤️


Aathavni Marathi Sms

aathvani status in marathi

Hii कशी आहेस ,सगळं ठीक चाललं असेल ना आता तुझं ,ज्यासाठी मला सोडलं होत ते मिळाल ना ,

अजून काय पाहिजे ,लग्न तर झालंच असेल ना तुझ lockdown मध्ये त्या व्यतीसोबत ज्यासाठी तू माझ्याशी नात तोडलं होतंस ,चल ठीक आहे मी नाही पण आयुष्यात तू तरी सुखी राहशील ना कारण गोष्टी तुला पाहिजे तश्या घडत गेल्या …

राग वैगरे काहिनाही यार फक्त सहज आठवण आली म्हणून पत्र लिहत होतो ,
जे होईच असतं ते होतच मग राग करून ,शिव्या देऊन त्याला काही अर्थ रहात नाही …

पण तू गेल्यानंतर खूप काही बदललं माझ्या आयुष्यात ,

मी आधी होतो तसा आता नाही राहिलो आहे ,खरतर त्याच श्रेय तुलाच देईला पाहिजे ,मी माणसं ओळखायला शिकलो ,आतून अजून strong झालो ,आणि मी पण आता सोडून दिलाय हे प्रेम वैगरे ,कारण आता फक्त स्वप्नांवर focus करतोय कारण आता तेच माझ्यासाठी माझ आंनद आणि सर्वकाही आहे ,

लग्नाच काय आहे ते तर आई-वडील लावूनच देतील म्हणून त्याच जास्त विचार नाही करत ,मस्त आयुष्य enjoy करायचं आणि खर खर जगायचं …❤️

पण खरं सांगू का आता अस वाटतंय की बर झालं ,तू गेलीस ते ,नाहीतर मला माझा शोध कधी लागलाच नसता यार ,मी तुझ्यामागेच राहिलो असतो आणि बाकीच्या गोष्टी हातातून निघून गेल्या असत्या ..

आणि तसपण जे होत ते चांगल्यासाठीच होत ना ,बाकी सगळं ठीक आहे ना तुझ्या सासरी ,काळजी घे सगळ्यांची ,
चल bye ..❤️


आठवणी मराठी सुविचार
aathvani marathi status

काय करायचं जेव्हा लोक दुःख देतात काही कारण नसताना ,
काय करायचं जेव्हा लोक धोका देतात आपण चांगलं वागून सुद्धा ,

काय करायचं जेव्हा रोज बोलणारी व्यक्ती अचानक बोलणं बंद करून टाकते ,
काय करायचं जेव्हा आपण ज्यांची respect करतो तेच चुकीचे वागायला लागतात  …

काही नाही करायचं यार फक्त धडे घेयचे त्या प्रत्येक व्यक्तीकडून जे आपल्याला दुःख देतात ,तेच धडे आपल्याला खूप कामी येतील भविष्यात हे नेहमी लक्षात ठेवा ,

चल ठीक आहे यार त्या व्यक्तीशी आपण बोलणं बंद करतो ,नात तोडून टाकतो पण त्याने काय होणार आहे ,अशे अजून खूप लोक भेटणार आहेत तुम्हाला आयुष्यात ,

आपल्याला फक्त त्याच्यासोबत कस वागायचं आहे ते शिकायचं आहे आणि त्यांना जश्याच तस उत्तर देयचं जरी तुम्ही खूप साधे असाल तरी कारण ते गरजेचं असतं काही लोकांसाठी …

आणि गेले उडत ते ज्यांनी तुम्हाला धोका दिला ,कारण ज्यांना माणसं नाही परखता येत ते कुठे सुखी असतात यार ,आणि त्यांची पण फसवणूक होते रे कुठेना कुठेतरी ,

आणि ह्या लोकांच tension नाही घेईच ,तुम्हाला देवाने एवढं सूंदर आयुष्य दिल आहे त्यात तुमच्यावर प्रेम करणारे आई-बाबा,मित्र-मैत्रिणी दिले आहेत ,अजून काय पाहिजे तुम्हाला ,
मस्त मजा करा ,शिका,लग्न तर होणारच आहे ना ,

सगळ्यांना आयुष्यात एकदा तरी प्रेम होतं पण ते टिकलं तर ठीक आहे जर नाही तर सोडून द्या ना विषय ,
आयुष्यात खूप काही आहे रे करण्यासारखं ,फक्त कुठे थांबायचं नाही ,सगळ्या गोष्टींचा सामना करायचा ,

जे होणार असतं ते होतच पण आपल्याला आयुष्य कस जगायचं आहे ते आपल्यावर असतं ,ते तुम्हीच असता जे सगळं विसरून एक नवीन सुरवात करतात ,

ते तुम्हीच असता जे स्वतःला motivate करून जगण्याची आशा निर्माण करता ,
ते तुम्हीच असता जे एक निर्णय घेता की मी हार नाही मानणार आयुष्यात काहीही झालं तरी …❤️


Tuzhi Aathvan Status Marathi ❤️

aathvani marathi status

तुला आठवतंय ना ?
ती date जेव्हा मी तुला propose केलेले आणि तेव्हा तू मुद्दाम नाही बोललीस आणि थोड्या वेळेने गालावर kiss देऊन हो बोलून निघून गेलीस..

तुला आठवतंय ना ?
आपण graden मध्ये बसलो होतो आणि अचानक पाऊस चालू झाला आणि तू जाम खुश होऊन मला पण भिजायला नेलस जणू माझ्यासाठी ते स्वप्न आहे असं वाटत होतं

तुला आठवतंय ना ?
त्यानंतर तुला खूप थंडी भरली होती ,तू तशीच माझ्या जवळ येऊन मला घट्ट मिठी मारून बसली होतीस…
मला काही सुचलच नाही तेव्हा नक्की काय चाललं म्हणून मी पण शांत राहून सगळं अनुभवत होतो ..

तुला आठवतंय ना ?
आपण लपून गेलेलो एक long drive ला कारण तुला फिरायला आवडतं हे मला माहित होतं आणि तुझ्या चेहर्यावरचा आनंद बघून मी पण खुश होतो …

तुला आठवतंय ना ?
एकदा तू मला shopping ला जाण्यासाठी बोलावत होतीस पण घरातुन पाठवत नव्हते पण काहीतरी कारण सांगून मी आलेलो असाच पैसे न घेता आणि हे तुला माहीत होतं म्हणून तू सगळं खर्च केलस मला न काही विचारता ..

तुला आठवतंय ना ?
एकदा आपण आशेच फिरत असताना तुझ्या वडिलांना आपल्या दोघाना बघितलं होत आणि त्या दिवशी तुला घरी खूप ओरडा भेटला असेल तरी दुसर्या दिवशी लगेच तू मला भेटायला आलीस ..

तुला आठवतंय ना ?
College मध्ये असताना काही जणांना वाटायचं की हे पण थोड्या दिवस टिकतील ,पण त्यानां कुठे माहीत होतं खर प्रेम के असतं हे त्यांना तेव्हा कळेल जेव्हा आमच्या लग्नची पत्रिका त्यांच्या घरी जाईल..
आठवणी गोड असल्या का आठवायला ही चांगल्या वाटतात..❣️


आठवणी मराठी स्टेटस
aathvani marathi status

तुला प्रेम होईल तेव्हा समजेल
दुःख काय असतो ,रोज ओघळणार्या अश्रूंची किंमत काय असते
त्याच्या मिठीत राहण्याच सुख काय असतं ,आपल्या प्रत्येक दिलेल्या शब्दाची किंमत काय असते …

आयुष्यभर साथ देन कशाला म्हणतात ,आणि एखाद्या व्यक्त8साठी झुरण कशाला म्हणतात ..
एखाद्यची व्यक्तीची सवय लागण म्हणजे काय असतं ,आणि त्यांच्या msg ची वाट बघणं कशाला म्हणतात..
त्याच्या आठवणीत जगणं म्हणजे काय असतं .

एखाद्या व्यक्तीबद्दल रोज विचार करणं काय असतं त्याच्या सगळ्यां गुणांसोबत त्याला सांभाळून घेणं म्हणजे काय असतं
साथ जन्माची वचन काय असतात ,त्यांच्या सुखात आपलं सुख शोधन म्हणजे काय असतं..

रोज त्या जागेवर त्या व्यक्तीची वाट बघणं म्हणजे काय असतं आणि एकमेकांच्या परिस्तिथी नुसार Adjustment करणं म्हणजे काय असतं…
त्यांच्या हातात हात घालून जगाला न घाबरता सोबत चालणं के असतं…


आठवणी मराठी लेख ✒️🔥

aathvani marathi status

आमचं नात खूप चांगलं चालू होतं पण खूप दिवस झालं  आमचं बोलणं झालं नव्हतं का ते माहीत नाही पण तिचा msg आला नव्हता मला वाटलं काही कामात आले पण 1 महिना झाला तिचा एकही Msg किंवा Call आला नव्हता

मग मी स्वतःहूनच तिला msg केला पहिले 2-3 calls तिने reject केले मग थोड्या वेळाने Call उचलला…

ती:- कशाला नुसता फोन करतोस रे ,एकदा Call reject केल्यावर समजत नाही तुला मला तुझ्याशी नाही बोलायच आहे ते .
मी :- पण काय झालं तू का अशी वागत आहेस काय चुकलं माझं.

ती :- मला वाटलं नव्हतं तू अस करशील माझ्याशी खूप विश्वास होता माझा तुझ्यावर पण असा का वागलास तू?
मी :- अग पण अस काय झालं

ती :- मी अस ऐकलं की दुसऱ्या कोणाबरोबर तरी होतास त्या दिवशी आणि तुमचं एक मेकांवर खूप प्रेम.
मी :- काय
बस एवढं एकूण तू माझ्याशी बोलत नाहीस एवढ्या दिवस.
आणि ते पण तू लोकांच एकूण सवश्य घेतलास तुझ्या कडून तरी ही अपेक्षा नव्हती.

ती :- मग ती मुलगी कोण होती
मी :- ती माझी मैत्रीण होती एक दिवस सोबत दिसलो म्ह्णून के लगेच प्रेम होतं का एवढंच ओळतेस का मला

ती :- नाय रे आपण कोणावर खूप प्रेम करत असलो आणि अस ऐकलं का खूप भीती वाटते आणि राग
मी :- मग मला विचारायचं ना तू सगळं स्वतःहूनच ठरावलस

ती :- Sorry रे माझ्याकडून खूप मोठी चूक झाली जर तू आज फोन नसता केलास तर आपण परत काढुच बोललो नसतो.
मी :- हा गैरसमज असतो ना हा वाटत छोटा असला तरी खूप घातक असतो एका नात्यामध्ये जर तो लवकर नाही सोडवला तर ते विश्वास वेगरे सगळं विसरून जातात लोक..

ती :- खरच Sorry यार तुला वाईट वाटलं असेल ना
मी :- त्रास तर तू करून घेतलास लोकांच ऐकून परत अस कधी करू नकोस.
अश्या प्रकारे आमचं नात तुण्यापासून वाचलं..❤️

Leave a Comment