( 30+) Husband Wife Relation Quotes In Marathi | नवरा बायको नातं मराठी

पहिलं प्रेम ❤️ … नाती मराठी लेख

Husband -Wife Relation Quotes In Marathi
Husband -Wife Relation Quotes In Marathi

आपण जेव्हा मोठे होत असतो तेव्हा प्रेम हा शब्द ऐकून असतो पण जेव्हा आपण Mature होईला लागतो तेव्हा आपल्यात Feelings तयार होऊ लागतात फक्त प्रेमाच्या नाहीतर सगळ्या प्रकारच्या .

तेव्हा मग कधी आपल्याला कुठली व्यक्ति आवडली का आपल्यामध्ये एक Excitement तयार होते त्या व्यतीला भेटण्याची आणि बोलण्याची ..

मग हळू हळू आपण ओळख बनतो एक अनोळखी व्यतिशी तेव्हा आपल्याला त्यांच्या Background शी काही घेणं देणं नसतं ..,

मग रोज बोलणं होत आणि एक Feelings तयार होतात त्या व्यतिबद्दल की जर आम्ही एकत्र आशेच सोबत राहिलो तर किती मस्त होईल ना.

तेव्हा आपल्याल त्यांच्या सगळ्या गोष्टी आवडू लागतात आणि मग एखादं दिवशी आपण त्या व्यतीला Propose करतो.,
ती व्यति हो बोलली तर ठीक नाहीतर आपण उदास होऊन बसतो.

कारण rejection ची आपल्याला सवय नसते आणि आपण त्या व्यतिवर मनापासून प्रेम करतो तीच व्यति जर नाही बोली तर खूप वाईट वाटत मनाला कारण ती आपली पहिलीच वेळ असते.

आणि जर ती व्यति हो बोली आणि जर तुमचं Breakup झालं तर आपला सगळ्या लोकांवरून विश्वास उडून जातो आणि मग कोणावरच विश्वास रहात नाही .
म्हणून पहिलं प्रेम खूप महत्त्वाचा असतं सगळ्यांच्या आयुश्यात एक धडा आणि एक Experience म्हणून पण.


का ते माहीत नाही 😍 .. प्रेम मराठी लेख

navra bayko prem sms marathi
navra bayko prem sms marathi

तुझ्याशी बोलायला आवडतं  मला का ते माहीत नाही पण तुझ्याशी मनातल्या सगळ्या भावना share करायला आवडतं मला,

तुझ्या प्रेत्येक reply ची वाट बघायला आवडतं मला
तुझ्याशी एक दिवस जरी बोलणं नाही झालं तर एकटं एकटं वाटतं का ते माहीत नाही,

तुझ्या सगळ्या stories ला reply देयला मला
तुला दुसऱ्या कोणाबरोबर बघतील तर खूप जळायला होत मला,

प्रेम आहे असं नाही पण का ते,
कधी आपलं बोलणं झालं नाही का तुझा आवाज ऐकत आहे म्हणून तूझा प्रत्येक Call record करून ठेवला आहे का ते माहीत नाही..
रात्री कितीही झोप आली असेल तरी तुला झोप नही येत तो पर्यंत बोलायला आवडतं मला का ते माहीत नाही,

लोकांनी आपल्या बद्दल काय विचार करता मला फरक पडत नाही पण तू माझ्याबद्दल काय विचार करतेस हे महत्त्वच आहे माझ्यासाठी का नाही महित ,

तुझ्याबरोबर Canteen मध्ये एक cup चहा पीआयला आणि तुझ्यासोबत वेळ घवायला आवडतं मला..
तुला बघितल्यावर मन पण चलबिचल होतो तुझ्याशी बोलण्यासाठी का ते माहीत नाही.

ह्या सगळ्या गोष्टी माहीत नसल्या तरी प्रेम करतो तुझ्यावर हे माहीत आहे का तुला..❤️


Relationships कस टिकवायचं ?? ..मराठी लेख

navra bayko relationship in marathi
navra bayko relationship in marathi

तसं बघायला गेलो तर याच उत्तर नाही आहे कारण प्रत्येक नात टिकवणे आणि तुटणे या मध्ये खूप काही गोष्टी असतात आणि त्या आपण ignore करतो आणि ते प्रत्येक व्यक्तीनुसार बदलत जात .

जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा प्रेम होतं ना तेव्हा आपल्याला बाकी कुठल्याच गोष्टीची घेणं देणं नसतं ,ती व्यक्ती कोण आहे ,कशी  आहे कारण आपण एका वेगळ्याच जगात असतो काहीवेळ.
कारण आपण खूप ऐकलेल असतं Relationship बद्दल पण खऱ्या आयुष्यात अनुभवणं खूप वेगळंच असतं .😊

ठीक आहे पहिले सगळच चांगलं वाटतं कारण आपल्याला कोणी तरी अस भेटलेल असतं जो तुमची care करेल ,तुम्हाला phone करेल ,सगळ्या गोष्टी share करेल आणि मग आपल्याला वाटतं की ती हीच व्यक्ती आहे जीच्यासोबत आपण लग्न करावं .

पण खरं तर Relationships  मध्ये राहणं आणि लग्न कारण यात खूप अंतर आहे फक्त ते आपल्याला आत्ता समजत नाही कारण आपल्याला कुठे लगेच लग्न करायचं असतं .😘

आपण प्रेमात एवढे वेडे होऊन जातो की त्यांच्या सगळ्या चुका आपल्याला तेव्हा कळतात जेव्हा नात तुटत.
मग आपण विचार करतो की आपलं नेमकं काय चुकलं ?

म्हणून जे काही आहे स्वतःबद्दल ते खरं सांगा मग ते काय निर्णय घेतील ती वेगळी गोष्ट आहे .
कारण जर तुम्ही खूप खोट बोलत जाल आणि शेवटला जेव्हा लग्नाची वेळ येईल तेव्हा खर सांगायला जाल आणि तेव्हा खूप दुःख होतील तुम्हाला पण आणि त्यांना पण .❤️

कधी पैसे नसतील तर नाहीच सांगायच उगाच इकडून तिकडून पैसे घेऊन चांगल्या hotel ला जेवायला नेयच याला काही अर्थ नाही .

तुम्ही बोलाल अरे सचिन अस आता काही नाही राहील रे सगळेच खोटे बोलतात आणि धोका देतात .
अरे पण लोकांना जस वागायचं आहे तस वागू देना तुम्ही खरं रहायच माहीत आहे जास्त दुःख तुम्हालाच भेटतील पण ठीक आहे थोडे सहन करा बघा सुख तुमच्या जवळच असतं फक्त तो पण तुमची परीक्षा घेत असतो ..😊

काही गोष्टी खूप Imaginary वाटत असले तर खर आहे आणि तस सगळ्यांनाच जमेल अस नाही पण तस वागण्याचं नेहमी प्रयत्न करत रहा ..❤️


विसरतात येत का ?? ..नाती मराठी सुविचार

visarne marathi quotes
visarne marathi quotes

विसरता येत का ?
इथे mostly सगळ्यांनाच पहिलं प्रेम होतं कळत नकळत ते टिकतं किंवा तुटत ,आणि मग तुटल्यावर सगळेच दुःखी होतात ,स्वताला त्रास करून घेतात त्यांच्या आठवणीत कारण ते सोडून गेले म्हणून .

पण खरच विसरता येत का त्या व्यक्तीला ज्यांनी आपल्याला खूप आठवणी दिलेल्या असतात ,त्याच उत्तर हो पण आहे आणि नाही पण कारण ते प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून असतं ,

कारण प्रत्येक व्यक्तीच त्या कडे कसा बघतो त्यावर त्यानां खरच त्यांना विसरायचं आहे का ,आपलं बाहेरून लोकांना दाखवण्यासाठी ,मी विसरलो अस करायचं आहे ,तस केलं तर मग काहीच नाही होणार .

विसरणं म्हणजे नक्की काय असतं ,म्हणजे त्या व्यक्तीला मनातून काढून टाकणे अस नाही होत यार ,फक्त आपल्याला आपल्या चांगल्या भविष्यासाठी पुढे जायचं आहे ,

त्यांच्या आठवणींना बाजूला ठेऊन आपल्याला स्वप्नांना पहिले priority देयच आहे ,त्याला बोलतात विसरणं …

प्रत्येक शब्द सरळ नसतो यार त्याचे अर्थ वेगवगळे पण असू शकतात फक्त तुम्ही त्याकडे कस बघतात त्यावर सगळं अवलंबून असतं ,

नाही विसरता येत बोलून आपण त्याच व्यक्तीला जास्त priority देतो आणि मग तस तर आपण बाकी सगळं सोडून त्यांच्याच मागे लागत बसायचं का ,जे सगळं विसरून त्यांची life enjoy करत असतील आणि तुम्ही त्याच्या आठवणीत रडत बसले आहात .

यार इथे कोण कोणासाठी थांबत नाही रे, मग तुम्ही कोणासाठी स्वताच वेळ वाया घालवत आहात ..

हे करताना तुम्हाला खूप त्रास होईल ,खूप दुःख होईल पण चांगल्या दिवसांना सामोरं जाईला काही वाईट दिवसांना सामोरं जाईला लागत ना..

हेबघा जर तुम्ही ठरवलत तर आजपासूनच सगळं विसरून पुढे जाऊ शकाल आणि आणि जर नाही मग तसच रहावं लागेल ,
निर्णय घ्या ,भूतकाळाच ओझ्यामुले वर्तमान आणि भविष्यकाळ फुकट नाही गेला पाहिजे  ह्याची काळजी घ्या…❤️


मला आवडतं ❤️ ..नाती मराठी सुविचार

navra bayko bhandan marathi status
navra bayko bhandan marathi status

मला आवडते रे तुझ्यासोबत पूर्ण दिवस घालवायला ,कधी बोलताना कुठल्याही गोष्टीच विचार न करता तुझ्यासोबत बोलायला …
मला आवडतं तुझ्या खोड्या काढायला ,कधी रागविलास की ‘ तुला मानवायला ‘ ,कधी फुगून बसलास की तुला हसवायला …

मला आवडतं तुझ्याशी chat करत बसायला ,आणि कधी कधी तुला बघायच असेल तर घरात कोणी नसताना video chat करायला..

मला आवडतं ते सगळे secrects तुझ्यासोबत share करायला जे फक्त मी माझ्या special लोकांसोबत करते ..

मला आवडत जेव्हा कधी माझे periods चालू असतात तेव्हा तू बोलतोस जर आराम कर थोडे दिवस बर वाटेल आणि काळजी घे …

मला आवडतं जेव्हा तू काही surprise plan करतोस आणि मला थोडसं सवंशय ही न येता surprise देतोस ..

मला आवडतं तुझ्यासोबत त्या किनाऱ्यावर बसून ,आपल्या लग्नाच्या गोष्टी करायला …

मला आवडतं तुझा तो थोड्यावेळापूरता असलेला राग पण खरं सांगू तू त्यात जाम वेडा दिसतोस आणि मग येऊन sorry बोलणं…

मला आवडतं तुझे ते बहाणे जेव्हा आपण सोबत असताना कोण तर नातेवाईक भेटतात तेव्हा तुझी उडालेली तारंबल.

खरं सांगू का मला तूच आवडतोस या बाकीच्या गोष्टी तर फक्त तुझ्यावरचं प्रेम आहे …❣️


Relationships
म्हणजे फक्त मुलगा आणि मुलगी एवढच बघितलं जात पण दरवेळी त्याच अर्थ ते नसतं रे ,
म्हणजे नात बहिण-भावा मधलं ,आई -मुला मधलं ,बाबा-मुली मधलं त्यांच्या नात्याला पण नाव तेच असतं पण काय झालंय की आपण हे नाव ऐकलं की फक्त प्रेम हेच नेहमी डोक्यात येत ते आता काढून टाका बाकीच्या गोष्टी पण आहेत यार जगात ..


परत प्रेम झालं ❤️ .. नाती मराठी लेख

marriage navra bayko love sms
marriage navra bayko love sms

परत प्रेम झालं
तुम्हाला खरच वाटतं का पहिलं प्रेम आणि दुसरं प्रेम अस काही असतं नाही रे जे शेवट पर्यंत टिकतं ना तेच खर असतं बाकी फक्त असच नाव दिली जातात काहीपण .

आपण सावरतो आणि सांभाळतो स्वताला पहिल्या प्रेमातून आणि मग नाही नाही बोलता बोलता कोणी तरी आवडायला लागतं आणि मग होऊन जातं प्रेम परत …

पण ह्या वेळी आपण खूप काही शिकलेल असतं की लोक कशी असतात आणि त्याच्या सोबत कस वागलं पाहिजे ते तरीपण पण खूप वेळ झाला की आपण ह्या सगळ्या गोष्टी विसरून जातो आणि त्या व्यक्तीवर विश्वास ठेवतो पण ठीक आहे तो व्यक्ती तसा असेल तर चांगलच आहे ना ..

काही जण जेव्हा परत प्रेमात पडतात तेव्हा ते होतात त्या successful कारण काही गोष्टी माहीत नसतात त्या पहिल्या प्रेमात माहीत पडतात आणि ते सगळं विचार करून आपण तस वागत असतो ..

खूप छान वाटतं कारण आपले दुःख समजून घेणारी आणि आपल्याला सांभाळून घेणारी व्यक्ती आपल्याला भेटतं ..

त्या व्यक्तीला काही घेणं देणं नसेत तुमच्या पहील्या प्रेमाबद्दल ,की नात कस तुटलं वैगरे कारण त्यांना तुम्हीं आवडत असता तिथेच सगळ्या गोष्टी संपवून जातात आणि त्याला हेही माहीत असतं की हल्ली ह्या सगळ्या गोष्टी होतात सगळ्यांसोबत ..

तुम्ही जेव्हा परत प्रेमात पडता ना तेव्हा थोडे mature पण झाले असता म्हणजे तुम्ही सगळ्या situation ला कस तोंड देयचं ,

किंवा adjustment कशी करता त्यामुळे जास्त problems येत नाही आणि जर तुम्ही दोघेही settle असाल आपल्या आयुष्याध्ये तर लग्न ही होत ,

मला माहित आहे एवढं सगळं बोललो ते सोपं नसतं पण काही गोष्टी स्वतः समजून हो करायच्या असतात …✌️❣️


ATTACHMENT का EXCITEMENT होत

attachment quotes in marathi
attachment quotes in marathi

आपण एवढं नाही विचार करत या सगळ्या गोष्टींचा जेव्हा आपण पहिल्यांदा प्रेमात पडतो ,
आपल्याला फक्त ती समोरची व्यक्तीच दिसत असते मग जेव्हा काही कारणामुळे breakup होत ना ,

तेव्हा हा प्रश्न आपण स्वताला विचारतो की खरच मी attach झालो होतो का excitement होती ,

Attachment अपोअप होऊन जाते रे पण त्याला वेळ लागतो ,पण जेव्हा ती होते तेव्हा आपण पूर्णपणे समोरच्या व्यक्तीचे होऊन जाते .

ते सगळं ठीक आहे पण मग excitement म्हणजे काय ?

आपण जेव्हा single असतो ना तेव्हा social media बघतो की बाकीचे couples सोबत आहेत आपण पण असावा ,

तेव्हा आपल्याला एखाद्या व्यक्तीची गरज आहे असं वाटायला लागतं कारण तेव्हा आपल्यासोबत कोणी नसतं म्हणून अशे विचार येत जातात सतत ,

मग जेव्हा आपण social media वर किंवा college मध्ये असतो तेव्हा आपल्याला खूपजण असतात जे सुंदर दिसतात आणि

मग आपल्याला वाटतं की ह्या व्यक्तीची आपल्याला सोबत पाहिजे आहे ,म्हणून आपण कसबस करून त्या व्यक्तीसोबत attach होतो ,

मग जेव्हा नंतर खुप काही होत आणि relation तुटत तेव्हा आपण परत एकटे होतो आणि अस का झालं ह्याच विचार करत बसतो ,

Attachment असते ती अपोअप होऊन जाते रे आणि ते पण मनातून पण excitement असते ती जास्त करून लोकांना दाखवण्यासाठी असते की बघा मी पण प्रेमात पडलो ,

पण खरं तर लोकांना काही घेणेदेण नसतं तुम्ही काय करताय त्याच्याशी म्हणून excitement मध्ये घाईत कुठलं निर्णय घेऊ नका हेच सांगायच आहे .❣️

तुझी सोबत हवी

Husband -Wife Relation Quotes In Marathi
Husband -Wife Relation Quotes In Marathi

त्या दुःखांचा लाटेत बुडून सुद्धा सुखाचा किनाऱ्यावर परत येऊ फक्त तुझी सोबत हवी .
नात्याच्या धागा जेव्हा तुटायला येईल तेव्हा मी त्याला feviquick सारखा घट्ट पकडून ठेवीन फक्त तुझी सोबत हवी .

जेव्हा घरी एक दिवस कधी आजारी असशील तेव्हा घरातील सगळी काम मी करिन पण त्या आजारापासून दूर राहण्यासाठी तुझी सोबत हवी .
संकट वाट भगत आहेत आपली त्यानां हसून दूर करू आपण फक्त तुझी सोबत हवी .

माझ्यावर कधी कामाचा खूप pressure असेल आणि मी tension मध्ये असीन तेव्हा फक्त माझ्या जवळ येऊन माझा हात धरून मला धीर देण्यासाठी मला तुझी सोबत हवी .

एखादा महिने पगार उशिरा झाला तर घरातील सगळी adjustment करण्यासाठी मला तुझी सोबत हवी.
माझ्या periods च्या वेळेस नाही जास्त काम होणार माझ्याकडून तेव्हा ” आज मी सुट्टी घेतो तू आराम कर ” अस

बोलण्यासाठी मला तुझी सोबत हवी .
काही भांडण झाल अपल्यात तेव्हा शांत बसून थोड्या वेळाने स्वतःच माफी मागायला आलेल्या तुझी मला सोबत हवी .

आपले विचार एखाद्या topic वर नाही पटणार पण नेहमी सत्याच्या बाजूने उभा राहणाऱ्या तुझी मला सोबत हवी आहे .
लग्नात थोड्याश्या गोष्टी इकडे तिकडे झाल्या तर न रागावता सांभाळून घेण्यासाठी मला तुझी सोबत हवी .

आपला प्रेम किती खर आहे हे घरच्यांना पटवून देण्यासाठी मला तुझी सोबत हवी .
आमच्या घरातील सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी आणि माझ्या आईला समजूनघेण्यासाठी मला तुझी सोबत हवी .

आपल्या म्हातारपणी आपण आशेच बसून प्रेमाच्या आठवणी ताज्या करण्यासाठी मला तुझी सोबत हवी .

Leave a Comment