2024 Best Life Motivational Quotes in Marathi | जीवनावर मराठी सुविचार

तुमच्या आयुष्यात लोक येतील तुम्हाला सांगतील हे सगळं सोडून दे ह्यात काही career नाही आहे ,तू आपला काहीतरी जॉब कर ,ह्या गोष्टीत वेळ वाया घालवू नकोस ,ऐकून सोडून देयचं त्याचं बोलणं कारण त्यांना नाही माहीत तुम्ही काय करत आहात तुमचे काय स्वप्न आहेत ,ज्या दिवशी तुम्ही तुम्हाला पाहिजे ते मिळवाल ना तेव्हा तेच लोक तूम्हाला अभिनंदन करायला येतील ..
आशेच काही आयुष्यावर मराठी प्रेरणादायी सुविचार घेऊन आलो आहोत फक्त तुमच्यासाठी ,पूर्ण ब्लॉग वाचा ,share करा whatsapp वर ,आणि comments मध्ये कळवा कस वाटलं सुविचार ..

 

life quotes in marathi
life quotes in marathi

 

आपल्या आयुष्यात एखाद्या व्यक्तीला आपली गरज बनू नका ,

कारण जेव्हा ते बदलतात तेव्हा त्या व्यक्तीचा

राग कमी आणि स्वतःचा राग जास्त येतो ..


 

एखादी व्यक्ती जर आपल्याला value देत नसेल ,

तर त्यांच्या life मध्ये ,जास्त interest घेऊ नका ..


 

ज्यांना तुमच्या अश्रूंची किंमत कळत नाही त्याच्यासाठी रडू नका ,

कारण ज्यांना तुमच्या अश्रूंची किंमत कळते ,

ते तुम्हाला रडूच देणार नाहीत ..


 

समाधान सुविचार मराठी

 

खूप कमी लोक आपल्या आयुष्यात सुख

आणि आशीर्वाद घेऊन येतात ,

पण खूप जास्त लोक आपल्याला कटू

अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात..


आपण जसे आहोत तसे स्वतःला स्वीकारलं पाहिजे ,

कारण जगात आपल्यापेक्षाही कोणीतरी कमनिशिबी असतं

,ज्या लोकांनी तुम्हाला निराश केल त्यांना दोष देऊ नका ,

स्वतःला दोष द्या कारण तुम्ही त्यांच्याकडून जास्त अपेक्षा ठेवल्या


 

समाधान सुविचार मराठी

 

आयुष्यात त्या व्यक्तीला कधीच महत्व देऊ नका ,

ज्या व्यक्तीवर तुमच्या रागवण्याचा आणि

रुसण्याचा काही फरक पडत नाही ..


 

आयुष्यात काही बनायच असेल ना तर स्वताःचा जिवावर बना..

दुसर्यांचा जिवावर तर अख्खा जग उड्या मारतो….


 

आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टीत समाधान मानून हसायला शिका…

कारण कुणास ठाऊक मोठ्या गोष्टी मिळेपर्यंत समाधान आणि हसु टिकवता येईल का ?

आजच्या  आनदांच्या क्षणावर उद्याचे स्वप्न आणि समाधान टिकेल ,

पण उद्याच्या काळजीत आजचे सुख हरवू नका ..                       


आयुष्यात कोणासमोर स्वताःचे स्पष्टीकरण देत बसू नका

कारण ज्यांना आपण आवडतो त्याना स्पष्टीकरणाची गरज नसते….

आयुष्यात जस्त Tension घेऊ नका,मला माहित आहे सगळयांच्या life मध्ये काहींना

काहीतरी problems असतात..but its ok..सगळं होईल बरोबर तो आहे ना बघणारा..


समाधान सुविचार मराठी

 

समाधान सुविचार मराठी
समाधान सुविचार मराठी

आपल्याला लहापणापासून काहीतरी बनायचं असतं ,मोठे झाल्यावर त्याची reality कळते ,ती गोष्ट वेगळी असते ,पण आपण ठरवतो की मला मोठं झाल्यावर हेच बनायचं आहे ,

मग मोठे होता होता का अस वाटायला लागतं की स्वप्न विरत चालले आहेत ?
का असा भास होतो की माझे स्वप्न अर्धवट तर नाही राहणार ना ?

ह्यावर खर तर उत्तर नाही आहे पण थोड्या गोष्टी स्पष्ट करतो ..
पैसा ,परिस्थिती ,नशीब, आता यात पण सगळ्यांचे विचार वेगवगेळे असू शकतात ,
पण या 3 कारणांमुळे आपले स्वप्न अपूर्ण राहतात अस सगळ्यांना वाटतं ,

पण काहीजणांना ते नाही पूर्ण करता येत काही कारणांमुळे ,
चल ठीक आहे ,नाही पूर्ण झाले तर कोणाला दोष तरी देऊ नका ,

कारण स्वप्न हे तुमचे स्वतःचे आहेत लोकांचे नाही ,
जे आहे त्याला accept करा आणि पुढे चला मग नंतर रडून आणि दुःख करून काही उपयोग होत नाही ..

पण मग ते स्वप्न कशे पूर्ण करतात ज्यांच्याकडे सुरवातीला यातील काहीच नसतं ,
कारण ते प्रयत्न करणं कधीच सोडत नाही मग कुठलीही संकट येउदे ,

काहीही होउदे ,ते त्यांचे स्वप्न पूर्ण करतात ..
आणि मार्ग निघतो यार जर तुमचे ध्येय निश्चित असेल तर मदत मिळते माणसांच्या रुपात ,वस्तूंच्या रुपात …

मी हे तुम्हाला याच साठी सांगत आहे की अस कुठलंच गैरसमज
पाळू नका ,ह्या तिन्ही गोष्टी सुरवातीला नसल्या तरी तुमचे स्वप्न थांबू नका ,

यार तुम्हाला हे स्वप्न फक्त तुमच्यासाठी नाही ,तुमच्या आई-वडिलांना पूर्ण करायचे आहेत ..

तुम्ही बोलत असाल काय यार सचिन नुसते स्वप्न स्वप्न करत असतो ,पण जेव्हा ते तुम्ही पूर्ण कराल ना तेव्हा जो आंनद भेटतो तो जगात कुठेच भेटणार नाही हे लिहून ठेवा ..


     Life status in marathi

life marathi quotes
Marathi Quotes on Life

सगळयांच्या आयुष्यात एक तरी अशी व्यक्ती

येते जी त्यांच आयुष्य बदलून तरी टाकते

नाही तर सुद्रवते तरी.


आयुष्यात त्या व्यक्ती आनंद देऊन जातात

ज्या व्यक्तीकडून  कधी अपेक्षा

ही केलेल्या नसतात..


आयुष्यात जर कधी रडावस वाटलं ना तर Call नक्की कर……

तुला हसवायची Guarantee तर देऊ शकत नाही …..

पण माझ्या सोबत बोलताना तू तुझ दुःख विसरशील हे नक्की….


 

Marathi Inspirational Quotes on Life

life quotes in marathi
life quotes in marathi

आयुष्यातील सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे पैसा..

तुम्ही कितीही नाह नाही बोल्लात तरी हेच खर..

जेव्हा खिशात एक रूपया  सुध्दा नसतो तेव्हा  कळते त्याची किंमत..


आयुष्यात काय पाहीजे अजुन यार ,

1 घर आहे राहण्यासाठी ,

2 टाईमच जेवण भेटतो  बस झाल ना …

आणी पैसा तो मि मेहनत करुन कमवीन…

बाकी मी मजेत आहे ……..✌


Jivan Thought in Marathi

life motivational marathi quotes
Life Good Thoughts in Marathi

आयुष्यात ADJUSTMENT करायला शिका कारण

सगळ्या गोष्टी प्रत्येक वेळेस तुमच्या

प्रमाणे  होउ शकत नाही….


आयुष्यात काहीही problem असलं ना तरी मला सांगत जा

मी तुझ्या बरोबर नेहमी असीन कारण

मी तूला एकट्याला दुःखात नाही बघू शकत..


आयुष्यात समजा आपण, एखाद्या गोष्टीत हरलो तर,

ती भावना जितकी दुर्दैवी आणि दुःखदायक असते,

त्यापेक्षाही पुन्हा त्याच गोष्टीत,जिंकण्याची इच्छा नसणं,

ही भावना जास्त भयंकर असते…प्रयत्न करत रहा.


 

Life Good Thoughts in Marathi

happines marathi quotes
happines marathi quotes

आयुष्यातील सर्वात मोठा आनंद म्हणजे,

जे तुम्हाला जमणार नाही,असं लोकांना वाटतं,

ते साध्य करून दाखवणं..


आयुष्यात कधी कुटल्या वाईट दिवसाला समोरे

गेलात तर एकच गोष्ट नेहमी लक्षात

ठेवा दिवस वाईट असू शकतं आयुष्य नाही..


 

life marathi quotes

प्रत्येक ठिकाणी जिथे कोणी चांगल काम करतात तिथे काही जण असतात त्यानां नाही बघवत ते ,पण का बघवत तुमची तितपर्यत पोहोचू नाही शकत म्हणून ,का तुमचा स्वभावच असा वाईट आहे म्हणून ,

आणि काय मिळत तुम्हाला दुसर्यांना नाव ठेऊन ,मोठेपणा ,का आंनद .
आयुष्यात दुसर्यांचं जो वाईट बघतो ना तो नेहमी मागेच राहतो अशे काम करत हे विसरू नका कधी ,

त्यापेक्षा तुम्ही प्रयत्न करून बघा ना तो काम करणयाची तेव्हा समजेल किती मेहनत आणि कुठल्या संकटांना सामोरं जायला लागत ते ,फक्त कोणाच्या comments मध्ये negative विचार लिहीन आणि त्यावर हसणं सोपं असतं रे ,जे प्रत्येकशात कराल ना तेव्हा तुम्ही त्यांच्या आदर करायला लागला ..

तुमच्यामुळेच तर काहीजण धीर सोडतात आणि हार मानतात कारण त्यांना सांगणार कोणी नसत की अश्या माणसांना ignore करायचं असतं .

स्वतः तर काही करू शकत नाही किमान दुसरे काही करत असतील तर पाय तरी खेचू नका त्यांचे ..
तुम्हाला हे सगळं timepass वाटत असेल पण बाकीचे याला seriously घेतात आणि खूप जणांचे आयुष्य उध्वस्त झाली आहेत म्हणून plss जळू नका कोणावर ,

एखादी गोष्टी नाही पटली तर स्पष्ट बोला ना पण हे वाईट काम करू नका …
एखाद्या बद्दल तुम्हाला एखादी गोष्ट नाही आवडली तर ignore करा ना काय फरक पडतो ..

दुसऱ्यांवर जळण्यापेक्षा आपण कुठे मागे आहोत तिथे लक्ष द्याना खूप पुढे जाल तुम्ही .
जे जळतात ना त्यांना वाटत असेल की काही होत नाही पण वेळ सगळ्यांची येते हे लक्षात ठेवा ..❤️


 

Life Good Thoughts in Marathi

Happy Marathi Quotes
Happy Marathi Quotes

आयुष्यात खूप खुश रहायच असेल ना तर

लोकांच बोलणं मनावर घेऊ नका

बघा Tension कमी होईल तुमचं..✌️


सगळ्यांच्या आयुष्यात सुख-दुःख अशे दोन वाटे असतात

देवा सगळ्यांचे दुःखाचे वाटे लवकर संपून टाक आणि

सुखाचे वाटे संपले तर थोडे वाढव ..❤️


त्रास ,दुःख सगळ्यांच्याच आयुष्यात असतात रे ,

पण सगळी जण हार नाही मानत हे बोलून की आता सगळं संपलं

उलट ते सगळ्या परिस्तिथीला तोंड देत पुढे जातात आणि

तीच लोक यशस्वी होतात रे बाकी दुःखांच कारण देत बसून रहातात तशेच ..✌️


काय असतं रे आयुष्यात कोणी भेटलं का एक smile देयचं

आणि दोन शब्द बोलायचे बाकी सगळे busy असतात रे

कोणाला तुमचा पैसा किंवा काही नको आहे रे फक्त एक माणूस म्हणून तरी ओळख ठेवा ..

आणि ते कोणाला दाखवण्यासाठी नाही तर स्वतःच्या आनंदासाठी .✌️


 

life marathi quotes images

आयुष्यात ज्यांनी तुम्हाला पहिल्यांदा

हसायला शिकवलं त्यानां कधी दुःख देऊ नका ..


खूप माणसं भेटलीत आयुष्यात आणि अजून भेटतील सुद्धा

ज्यांनी सुख दिले ते अजून सोबत आहेत आणि ज्यांनी दुःख दिले त्यानां पण thankyou

कारण त्यांनी पण खूप काही शिकवलं ,

फक्त तुम्ही कधी बदलू नका लोकणानुसार ते येतील ते जातील

आपण तसच रहायचं नेहमी तेच तर महत्वाचं असतं ना यार ..


Best Marathi Quotes for Life

life marathi quotes

बर झाल मला माझ्या आयुष्यात काही चुकीची माणसं भेटली

नाहीतर मला माझी चूक कधी कळलीच नसती …


आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टीत समाधान मानून हसायला शिका…

कारण कुणास ठाऊक मोठ्या गोष्टी मिळेपर्यंत

समाधान आणि हसु टिकवता येईल का ?

आजच्या  आनदांच्या क्षणावर उद्याचे स्वप्न आणि समाधान टिकेल ,

पण उद्याच्या काळजीत आजचे सुख हरवू नका .


Life Marathi Motivational Quotes

Best Marathi Quotes for Life
Best Marathi Quotes for Life

तुम्हाला माहीत आहे आपल्याला एखादी गोष्ट जमली नाहीतर आपण कारणं देईला सुरवात करतो पण जर ते तुमचे स्वप्न असतील तरीपण तुम्ही हीच कारण दिली असती का हा विचार करा ,

आपल्याला एखादी गोष्ट नसते करायची म्हणून आपण कारणं देतो पण तीच गोष्ट तुम्हाला तुमच्या स्वप्नांच्या जवळ घेऊन जात असेल तरीपण तुम्ही कारणं द्याल का ?

नाही ना ,म्हणून प्रत्येक गोष्ट जी तुमच्या life मध्ये घडत असते त्याला काहीतरी कारण असतं म्हणून त्याला सामोर जायचं ,जे संकट येतील ,दुःख येतील त्यांना face कराल नाही कराल ती पुढची गोष्ट आहे पण त्यांना कारणं देऊन ignore तरी करू नका यार ,
कारणं देऊन तरी काय होणार आहे ते काम फक्त पुढे जाणार आहे आणि शेवटी ते तुम्हालाच करायचं आहे ,

प्रत्येकाला struggle करावं लागतं मधल्या phase मध्ये मग
तो कशासाठी का नाही असत कारण तो आपल्या life चा एक भाग आहे आणि आपल्याला त्या phase मधून जावंच लागतं ,
आणि संधी कधी सांगून येत नाही हे नेहमी लक्षात ठेवा…


हे पण वाचा ⇓⇓

1) 300+ Marathi Motivational Quotes🔥

2) 2022 मराठी प्रेरणादायी लेख


 

self marathi quotes

काही गोष्ट अश्या होऊन जातात ना life मध्ये की त्याच दुःख कायम आपल्या मनात रहात ,कारण ते व्यक्ती आपल्या खूप जवळचे असतात आणि त्यांची आपल्याला सवय झालेली असते ,

पण शेवटी मरण आपल्या हातात नसतं ना जे होईच असतं ते होतच हेच तर आयुष्य असतं ..

आता ह्या corona मुळे किती जणांने आपल्या आई-वडील ,भाऊ -बहीण ,आजी-आजोबा ,मित्र-मैत्रिणी गमावले असतील त्यांच्यावर किती दुःख कोसळल असेल ह्याच आपण विचार सुद्धा नाही करू शकत ,

आणि त्यात पण शेवटच्या क्षणी सुद्धा त्या व्यक्तीला बघता येत नाही ,किती भयाण परिस्तिथी झाली असेल त्या व्यक्तीची आपण रोज बघतो एवढी लोक मरतात पण त्यांच्या families ला किती दुःख झालं असेल ह्याची आपण कल्पना सुद्धा नाही करू शकत.

मी हे तुम्हाला का सांगतोय कारण एकदा ती व्यक्ती गेली का दुःख करून काही होत नाही म्हणून आहेत तेव्हाच काही राग वेगरे असेल तर सोडून द्या ,काही भांडण झाली असेल तर माफी मागून टाका ,

कोणी फसवलं कोणी काय केलं त्याला आता काही अर्थ नाही आहे ,जे होईच होत ते झाल ,आत जे चालू आहे त्यावर लक्ष द्या उगाच छोट्याश्या कारणांवरून नात तोडू नका ,

मान्य आहे त्यांची चुकी होती पण श्वास आहे तो पर्यंत सगळं आहे त्यानंतर सगळं संपत …

तो ego वेगरे सोडून द्या रे त्याने कोणाचच भल होत नाही ,एक चांगल माणूस म्हणून जगा ,कारण तुम्ही आयुष्यभर एक चांगले माणूस म्हणून जगले ना तर ते लोक चांगले बोलावे म्हणून नाहीतर त्यातून जो आंनद आणि सुख भेटतो ना ,तो कशातच नाही आहे …❤️


 

Marathi Inspirational Quotes On Life

sad life marathi quotes
sad life marathi quotes

जे होईच होत ते होऊन गेल ,ज्या गोष्टी होऊन गेल्या त्याच्यावर विचार करून ,रडून ,स्वताला त्रास करून फक्त तुम्हाला त्रास होणार आहे ,

तुम्हाला अस वाटत असेल की ते परत येतील ,तर ते फक्त आपले भास असतात कारण लोक येण्यासाठी जात नाही कधीच ,फक्त तुमचं मन ते accept करत नाही आहे सध्या ,

पण emotion ला तुमच्या भविष्याच्या आड येऊ देऊ नका कधीच कारण एखाद्या व्यक्तीच आयुष्य उध्वस्त करण्याची टाकत असते त्यात .

प्रत्येक व्यक्तीला दुःख असतात मग सगळेच आशा सोडतात का ,नाही रे ,मान्य आहे सगळ्यांचे problems वेगळे असतात पण म्हणून हे कारण देऊन तुमचे problems solve नाही होणार आहेत ते फक्त पुढे जात राहतील .. दोन व्यक्ती असतात ,

पहिले ज्यांना ह्यातून खरच बाहेर पडायचं असतं आणि दुसरे ज्यांना ह्यातून बाहेर पडायचं असतं पण ते नाही प्रयत्न करत आणि नाही होणार बोलून सोडून देतात किंवा कारणं सांगत बसतात अश्या प्रकारच्या व्यक्ती अजून depression मध्ये जायला लागतात आणि ते अजून negative होत जातात …

बाकी लोक प्रयत्न करत असतात आपापल्या पद्धतीने पण ते नाही जमत त्यानां ,त्यांनी निराश होऊ नका कारण ते करण्याची पद्धत बदला तुम्ही नक्की बाहेर पडाल यातून ,अशी मला खात्री आहे ,कारण अशक्य अस काहीच नसते यार ,काजळी घ्या ❤️


 

        जीवनावर मराठी स्टेटस

life problems marathi quotes life problems marathi quotes

मला खूप जण त्यांचे problems माझ्या सोबत share करतात ते सगळं ठीक आहे यार पण मी परत सांगतो की मी personal suggestion नाही देत मग तो कुठलाही topic असुद्या कारण, मी कोण आहे यार तुम्हाला solution देणारा ,

मी जे काही लिहितो ते मला सुचलेल असतं आणि ते मी तुमच्या समोर मांडतो पण म्हणून मला सगळं माहीत आहे असं होतं नाही ना ,आणि मला ह्याचा कुठलाही experience नाही आहे ,म्हणून plss अस करू नका ….

आपल्याला खूपदा अस वाटतं की यांच्याकडे याच उत्तर असेल पण तस नाही हे यार त्याच उत्तर तुमच्याकडेच असतं फक्त ते शोधायला थोडंस वेळ लागतं ,

कधी कधी आपल्याला वाटतं की आपण हे करू ,पण, हा शब्द येतो ना तेव्हा मनात शंखा येते आणि आपण स्वतावर doubt घेतो ,तेच तर चुकीचं आहे ना ,

तुम्हाला माहीत असतं की अस केलं तर अस होईल,
पण जितपर्यंत तुम्ही तो शेवटचा निर्णय घेत नाही ना तितपर्यंत काहिनाही होऊ शकत .

प्रत्येक व्यक्तीचे परिस्तिथी ,वेळ ,background वेगवेगळं असतं म्हणून तुम्ही एखाद्या व्यक्तीला हे सांगाल तेव्हा ते त्यांच्या पद्धतीने त्याच उत्तर देतील आणि तुम्हाला ते पटणार पण नाही कारण फक्त तुम्हालाच माहीत आहे ती व्यक्ती आतून आणि बाहेरून कशी आहे ते ..

तुम्ही 100 लोकांना तुमच्या problem सांगितले तर 100 वेगळी उत्तर येतील आणि शेवटी तुम्ही तेच करणार आहात जे तुम्ही ठरवलंय ,

मग कश्यासाठी कोणाला विचारत बसायचं आणि आपली personal life त्यांच्या सोबत share करायची ,कारण यातील खूपजण तुम्हाला चांगली पण भेटतील पण खूप जण तुमचा फायदा पण घेतील .

कधी कधी मन मोकळं करण्यासाठी आपल्या friends सोबत सगळं share करू शकता ,पण ज्या व्यक्तीला तुम्ही ओळखत नाही त्या व्यक्तीवर कधीच आपली personal life share करू नका ,मग तो मी का नाही असत …

तुमचं उत्तर तुमच्याकडेच आहे फक्त त्यात थोडा वेळ जाईल पण भेटेल उत्तर तुम्हाला..❤️


आयुष्य प्रेरणादायी सुविचार

marathi quotes on life
marathi quotes on life

यार आपण बोलतो काय असतं रे आयुष्यामध्ये लोक येत राहतात आपण attach होत जातो आणि नात तुटलं का आपण राग धरून बसतो …😔
पण राग कसला येतो नक्की तुम्हाला तुमच्या चुकीचा की ते चांगले वागून गेले याचा..😏

कुठे राग वेगरे धरून बसताय यार ,आपल्याला हे पण माहीत नसतं की पुढच्या 5min पर्यंत या जगात असू की नाही ..
म्हणून तुम्हाला हे पण माहीत नसेल की तुमचा शेवटचा msg किंवा शेवटचा call कोणाचा असेल म्हणून जाऊद्या रे आता

कोणावरचा राग असेल तर सोडून द्या ,कदाचित हा पण माझा शेवटचा msg असेल …😊
तुम्ही बोलाल कशाला अशे विषय काढतो अजून आहोत ना आपण,पण हेच खरं आहे यार …😊

म्हणून जे आहे तुमच्यासोबत त्यांच्यावर रागवत बसू नका ,काय बोलला असाल तर सोडून द्या रे जे होईच होत ते होऊन गेल ते कसं सांभाळून घेयचं हे तुमच्यावर असतं..❤️

आहे तो दिवस आनंदाने जगा उद्याच्या दुःखांच tension आज घेऊन बसू नका ,कारण भविष्य आपल्या हातात नसतं पण वर्तमानकाळ तर आपल्या हातात नसतं…✌️

चुका होत असतात रे ,म्हणून चूक झाली असेल तर माफी मागून टाका मग ते करतील की नाही ते त्यांच्यावर आहे ,आपण आपलं काम करायचं…👍

आणि मला पण माफ करून टाका कधी काही चूक झाली असेल तर कारण मी पण माणूसच आहे ना…❣️
नेहमी हसत रहा….❣️

Leave a Comment