Valentine Day Messages for Husband in Marathi 💑🥰

नातं जरी जुने झालं असलं तरी नात्यातील प्रेम काळानुसार अधिक वाढत जाते. कारण आयुष्यात कितीही सुखदुःख आली तरी  आपला जोडीदार आपली साथ सोडून कधीही जात नाही. याच जोडीदाराला ‘व्हॅलेंटाइन्स डे’ला प्रेमाचे मेसेज (Valentine Day Messages for Husband in Marathi) पाठवून ‘तु माझ्यासाठी खूप स्पेशल आहेस’ ही भावना व्यक्त करा. प्रियकरासाठी खास टोपण नावे ही तुम्ही वाचू शकता.

Valentine Day Messages for Husband in Marathi

1. मनातले शब्द न शब्द तुलाच सांगायचे आहेत भविष्याचे वेधकवेत तुला घेऊनच घ्यायचे आहेत

रंगवलेली स्वप्ने सत्यात साकारायची आहेत फक्त मला प्रिये… त्यासाठी, साथ तुझी हवी आहे…

हेप्पी व्हॅलेन्टाईन्स डे

2. पाहशील जिथे जिथे नजर उचलून…

मीच असेल उभा ओठांवर स्मित घेऊन 🙂

आलेत कधी जर तुझ्या डोळ्यात दुखांचे अश्रू….

तुला सुखाचे आनंदाश्रू तिथे तिथे देऊन…….!!!

हेप्पी व्हॅलेन्टाईन्स डे

दाटून आलेल्या संध्याकाळी,

अवचित ऊन पडतं…..

तसंच काहीसं पाऊल न वाजवता,

आपल्या आयुष्यात प्रेम येतं !

हेप्पी व्हॅलेन्टाईन्स डे

3. पाऊस म्हटलं की मला आठवते
तुझ्या उरातली धडधड
माझ्या आधाराशिवाय झालेलं
तुला पाऊल टाकणं अवघड…
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे
– दिपाली नाफडे

4. तुझ्या प्रेमाचा रंग तो…
अजूनही बहरत आहे.
शेवटच्या क्षणापर्यंत….
मी फक्त तुझीच आहे !!!
Happy Valentines Day Husband!

5. भरभरून बोलायचं असतं तेव्हा
आणि माझं मौन ओळखायचं असतं तेव्हाही
जवळ फक्त तूच हवास…
सतत खळखळ हसणं
आणि छोट्याछोट्या गोष्टीवरचं रुसणं
ते समजून घ्यायलाही, जवळ फक्त तूच हवास…
शब्द माझे बोचणारे पण प्रेम मात्र दोनशे टक्के खरं
तरीही तुझी नकोशी असणारी कारणं ऐकूनही
जवळ फक्त तूच हवास…
मन कितीही अस्ताव्यस्त असो
ते एका क्षणात सावरायला
जवळ फक्त तूच हवास…
पण हे फक्त माझं म्हणणं,
तुझं विश्व वेगळंच,
मी मात्र तुला आपलं आपलं म्हणावं
आणि तू सहज तो बंध तोडून जावं
एक दिवस येईल असाही तू म्हणशील आज जवळ फक्त तूच राहावं
पण….
या पण मध्येही स्वतःला हरवून जिंकले असेन मी…
कारण फक्त एकच
जवळ फक्त तूच हवास…
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे

6. असतोस तू जेव्हा
हसूही तरळे अलगद ओठांवरी
पाहत राहावे तुला आणि तुलाच उमगावे मी
लाडे लाडे तुला छळावे
सर्व लाड पुरवून घ्यावे
कोणास ठाऊक पुन्हा असे दिवस कधी यावे
असतोस तू जेव्हा
मिठीत तुझ्या विसावे
क्षणाच्या सहवासात जन्माचे जगून घ्यावे
खांद्यावर डोके ठेवून कायमचे तुझे होऊन जावे
विरहाचे क्षण येता पुन्हा अलगद आसवांनी तुझे व्हावे
डोळ्यांनी तुला सांगावे
असतोस तू जेव्हा
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे नवरोबा
दिपाली नाफडे

7. बंध जुळले असता,
मनाचं नातंही जुळायला हवं…
अगदी स्पर्शातूनही
सारं सारं कळायला हवं…
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे नवरोबा

8. जीवन जगता जगता एकदाच प्रेम करायचं असतं
तेच प्रेम आयुष्यभर मनात जपायचं असतं
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे 

9. दाटून आलेल्या संध्याकाळी
अवचित ऊन पडते
तसेच काहीसे पाऊल न वाजवता
आपल्या आयुष्यात प्रेम येते
Happy Valentines Day Husband !

Valentine’s day messages for navra in marathi

Valentine Day Messages for Husband in Marathi
Valentine Day Messages for Husband in Marathi

10. डोळ्यातल्या स्वप्नाला…
कधी प्रत्यक्षातही आण,
किती प्रेम करतो तुझ्यावर
हे न सांगताही जाण…
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे

11. तुझ्या प्रेमाचा रंग
अजूनही बहरत आहे…
शेवटच्या क्षणापर्यंत
मी फक्त तुझीच आहे…

12. असंच कधी तुला,
माझ्या आठवणींत,
हसताना पाहायचंय…
जीवनाचं सुंदर स्वप्न मला,
आता तुझ्याचसोबत जगायचंय…
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डियर husband

13. श्वासात गुंतलेला श्वास हा सोडवत नव्हता
भिजलेल्या उसासांचा गंध तेवढा दरवळत होता
भरलेल्या डोळ्यांनी पाहिले धूसर स्वप्नांचे जाळे
ओवाळलेल्या मिठीत मुक्या शब्दांचे पहारे
मनातल्या अंगणात किलबिलाट सारा
मंद स्मित वेचतो हा बेधुंद किनारा
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे अहो
– सुविधा लोखंडे

14. स्पर्शांना अर्थ मिळाले
नात्यांना आली गोडी
माझ्यातून ‘मी’ कातरला
अन् सुटली सारी कोडी
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे नवरोबा
गुरू ठाकूर

15. मनातले शब्द न शब्द तुलाच सांगायचे आहेत
भविष्याचे वेध तुला कवेत घेऊनच घ्यायचे आहेत
रंगवलेली स्वप्ने सत्यात साकारायची आहेत
प्रिये… त्यासाठी फक्त तुझी  साथ हवी आहे
Happy Valentines Day Husband

16. घे हाती हात माझा,
जगीचं सारं सुख तेव्हा तुझं असेल…
माझ्या प्रेमाच्या त्या सीमेपुढे,
अवघं ब्रह्मांड देखील त्यावेळी खुजं असेल…
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे नवरोबा

17. संगीत जुनच आहे
सूर नव्यानं जुळताहेत
मनही काहीसं जुनच
तेही नवी तार छेडताहेत
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे 

18.कधी बोलावसं वाटलं तरी नक्की बोल
ऐकण्यासाठी मी असेल
प्रश्न असतील मनात तुझ्या तर
उत्तर देण्यासाठी मी असेल
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे 

19. कधी कधी रुसणं देखील आहे महत्त्वाचं
ज्यामुळे माहिती पडते की…
आपला रुसवा दूर करणारंही कोणी तरी आहे…
Happy Valentines Day Dear Husband !

20. हो येतो मला प्रचंड राग तुझ्या सतत फोन करण्याचा
तुझ्या त्या सतत प्रश्न विचारण्याच्या सवईमुळेही माझा संताप होतो
पण तू नको बदलूस
तू करत जा मला फोन, विचारत जा विनाकारण मनात येणारे ते प्रश्न
कंटाळवाण्या दिवसातला हा माझा विरंगुळा झालाय आता
नेहमी चिडणारा मी तुझा फोन नाही आला तरी चिडतो
– शिवराज यादव

Leave a Comment