✒️नवीन मराठी कविता, लेख आणि बरच काही…🌹

marathi kavita sangraha
marathi kavita sangraha

सवयींचे गुलाम झाला आहात तुम्ही

Yes,You are a slave to habits…
रोज तिचं वाट, तो रस्ता चुकवून बघा, कधीतरी भटकून बघा, या life मधून एक दिवस स्वतःसाठी चोरुन तर बघा…
रोज तिचं माणसं, तुम्ही काही new करणार तर ते बोलणार, तुम्ही odd दिसणार तर ते हसणार, तुम्ही जुन्या गोष्टी करत रहाल तर ते टोमणे मारणार,तर या life मधून एक दिवस त्यांना विसरून तर बघा…
रोज तेचं स्वप्न, ज्यासाठी तुम्ही hard work करत आहात, दिवस रात्र जागत आहात ना, but पुढच्या सेकंदात काय होईल हे कुणाला माहीत नाही, तर या life मधून एक दिवस tension remove करून तर बघा…
रोज त्याच responsibilities, याला happy कर त्याला happy कर, यांच्यासाठी हे कर यांच्यासाठी असं कर, yr life मधून एक दिवस बेफिकर जगून तर बघा…
ओळखीचे लोकं तर बोलणारचं आहे, पण अनोळखी लोकं तुमचं कौतुक करतील असं काहीतरी काम करून तर बघा…
24 hrs असतात त्यामध्ये पण सवयींचे बंदी झालात, कधीतरी त्यांच्या बाहेर पडून तर बघा…
I know सगळे formality म्हणून हसत आहेत, कधीतरी real smile करून तर बघा…
दुसरे तुम्हाला विसरले म्हणून sad होता ना, पण तुम्ही ओळखता का तुम्हाला ?? तर तुम्ही विसरत आहात स्वतःलाच …
एक दिवस स्वतःसाठी चोरुन तर बघा…

-Dnyaneshwari Gorde


Life ना खूप छोटी आहे,
वाटेल तसे जगून घ्या
परत नाही बोलायचं
वेळ होती पण utilize नाही करून घेतल,
Opportunities सारखे नाही भेटत,
पण मिळाल्यावर त्याच सोनं करायच आपल्या हातात असतं….

-Archana Bapu Jadhav


पैसे घेताना पण विचार करा आणि देताना पण विचार करा. कारण पैसे ही अशी गोष्ट आहे ज्यामुळे आपल्याला नकळत पचतवायची वेळ येते.

-Vijayraj dinkar kamble


प्रेम…

माझं पहिली प्रेम आहेस तू देवने दिलेलं सुदंर अशी भेट आहेस तू
आठवतो मला तो दिवस तू मला घट्ट मिठी मध्ये घेऊन बोला होतोस की सोडणार नाही मी तुजी साथ आणि हो म्हणुच तू आहेस माझ्यासाठी खास
प्रेम म्हजने काय हे मला तू शिकवलं आहेस
मी चुकीची असली तरी ना रागवत ते समजून सांगीतली आहेस हो म्हणू आहेस तू खास
तू मला नेहमी आई बाबा सारखं समजून सांगतोस समजून घेतोस
हो म्हणूनच तू आहेस माझ्यासाठी खास
तुजी वेडी पूजा

पूजा अनिल कांबळे


आकाशातील चांदण्यांपेक्षाही सुंदर माझी परी आहेस तु
समुद्राच्या लाटांप्रमाणे क्षणात विरघळणारी आहेस तु
पावसातील ओलसर मातीचा सुगंध माझ्या हृदयातला तु
रम्य या निसर्गातले कोमल एक फुल तु….

चंद्रावरती झुला घेऊनी का झुलावेसे वाटते
निसर्गतल्या निर्मळ ऋतुत का खेळावेसे वाटते,
क्षणोक्षणी तुझाच विचार माझ्या मनात का दाटते,
आकाशातील चांदणरातीत सखे का तुलाच शोधावेसे वाटते….. का तुलाच शोधावेसे वाटते

Shubham Rajkamal Borkar


आयुष्यात् पैसा कमविणे महत्वाचें आहे कारण पैश्याशिवाय् जगणं कठीण आहे परंतु पैश्याचा मोह करणे चुकीचे आहे पैश्याच्या नादात् आपली माणुसकी आपली नाती विसरू नये ,

माणुसकी विसरल्याने माणसाचं माणूस पण नाहीसा होता आणि नाती विसरल्याने माणूस एकटा पडतो आणि माणुसकी विसरलेला माणूस आणि

समाजापासून एकटा पडलेला माणूस आयुष्यात कधीच समधानि होऊ शकत नाही त्यामुळे पैसा कमवा पण त्याची हाव कधी करू नका माणुसकी आणि आपली नाती कधी विसरू नका …

नाती आणि माणुसकी जपा आयुष्य सुंदर बनवा..😊😊😊

Abhijeet telang


स्पर्श मनातील उतरवूनी कागदावर,
येतील विचार मनात सारे।
न थकता, न थांबता, न डगमगता,
मांडुया समाज्यामध्ये।

SANDESH N PATIL


Aathavani tya divasancya sathvave lagle
Ni mag he sathvlele kay te aathvave lagle

Khup firle tya Ranat vanat fule navtich
Shevti kate ch pathvave lagle

Dur hota kinara mi tarang hou pahile
Antar te itke hote maz lat vhave lagle

Halkya halkya hundkyachi chahul lagli
Shodhayla malach aarshat pahave lagle

Sushama jadhao


आयुष्याच्या तळजोडीचा झालाय फापट पसारा…
माझ्या मनाच्या वेदना सांगू तरी कोणाला…?

ओंजळीत आलेले सुख सहजच
देण्यासाठी मोह जराही आवरेना…
आयुष्याच्या तळजोडीचा झालाय
फापट पसारा…
माझ्या मनाच्या वेदना सांगू तरी कोणाला…?

क्षणिक सुखाचा आनंदच वेगळा
दुःखाला ही लाजवेल असा तो भोळाभाबळा…
आयुष्याच्या तळजोडीचा झालाय फापट पसारा…
माझ्या मनाच्या वेदना सांगू तरी कोणाला…?

आयुष्यात आले इतके दुःख की…
सुख म्हणेज नेमकं काय असत…
सुख म्हणेज नेमकं काय असत…
याचा कधी लागलाच नाही थांग पत्ता…
आयुष्याच्या तळजोडीचा झालाय फापट पसारा…
माझ्या मनाच्या वेदना सांगू तरी कोणाला…?

Mangala Rajendra mahajan


जगणं- आपली परिस्थिती कशी आहे हे महत्त्वाचं नाही, आपण त्या परिस्थितीतून काय शिकलो यालाच जगणं म्हणतात.
कितीही संकट आले तरीही स्वतःला सांगायचे कि तूच आहेस जो यातून मार्ग काढू शकतो.

किरण शालीकराम मडावी


नकळत तुझ्यात गुंतले हे मन माझे…..
कधीतरी गुंतते का ते माझ्यासाठी मन तुझे….

जरी आठवणींच्या सरीत तुझ्या भिजले नसले
तरी आज मात्र तुझ्या नजरेत विसावले……

सांगायचे तर तुला खूप काही असत
पण तुझ्या समोर येता बावरे मन माझं घाबरत….

कधीतरी समजून घेशील का तू माझ्या भावना
जिया नही जाता ओ यारा आपके बिना…..

असो, सख्या तुला कळेल तेव्हा कळेल…..
तोपर्यंत माझ्या मनात, ह्रदयाशी मी तुला असच हळुवार अगदी प्रेमाने जपेल🌍❤️

Snehal patil


निळ्याशार पाण्याच्या सागर किनारी, निळ्याभोर नभाच्या सावलीत तिच्या आठवणित मी उभा होतो……
सांजवेळ अशी विसावताना तिच्या सहवासाची कल्पना करत होतो………

अचानक मला तिच्या पैंजणाचा आवाज येऊ लागला…..
त्यानंतर मी म्हणालो अरे माझ्या वेड्या मना तुला नकीच कोणतातरी भास झाला……

तितक्यात कोणीतरी मागून माझा हात पकडला…..
मागे वळून पाहता असता मी मला तिच्या असण्याचाच पुरावा मिळाला…..

काही कळेना मी काय बोलावे….. ती ही अशी एकटक पाहत होती कदाचित तिलाही माझे प्रेम कळले असावे…..

मागून हातातून गुलाब तिन्ही माझ्या समोर आणला…..
म्हणाली आयुष्यभर तुझ्यासोबत राहायचंय लग्न करशील का… असा मला त्या वेडू ने praposalch दिला 😍

Snehal patil


ते चार दिवस

कोणाला सांगता ही येत नाही. आणि सहन ही होत नाही. त्या वेदना तो त्रास नको वाटतो. जन्म हा बाईचा नको वाटतो. गरज असते तिला समजून घेण्याची. कोणाच्या तरी आधाराची. प्रेमाच्या दोन शब्दांची.

मायेच्या त्या स्पर्शाची. इतरवेळी सर्वांना ती हवीहवीशी वाटते. पण याच दिवसात का ती सर्वांना नकोशी वाटते. नेहमीच ती सर्वांनसाठी उपलब्ध असते. पण तिच्यासाठी कोणीच का उपलब्ध नसतं.

आयुष्यभर ती संसाराचा गडा पेलते. पण तिचे चार दिवस तुम्हाला नकोसे वाटतात.

एवढं सगळं सहन करून देखील तुम्ही तिला अपमानास्पद वागणूक देता.

ती आहे तर आपण आहोत ती नाही तर आपण नाहीत. तीच आपली सूरवात. तीच आपला अंत.

ही संकल्पना कुठेतरी लक्षात घेतली पाहिजे. चला तिला समजून घेऊया आणि एक नवा भारत घडवूया.

भुजबळ सोनाली संभाजी


कासवाच्या गतीने का होईना
पण रोज थोडी थोडी प्रगती करा,
खूप ससे येतील आडवे,
बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा.

Rashmi vishwanath asawa


व्यथा शेतकर्याची

डोक्यावर उन्हाची सावली
आणि तप्त भूमीवर नांगर चालवी
मनात धरून आशेची पाळवी
समद्या लोकांचा विचार करी
किती सोसावी निसर्गाची करणी ?
तरी जिद्दीने हिरवं रान हा फुलवी
कधी सावकाराच्या कर्जाने आपला
नाजूक संसार चालवी
तरी कधी परिस्थितीने स्वतःचा गळा
हा आवळी
स्वतः आपल्या पोटाला चिमटा काढून
दिवस आजचा उद्यावर घालवी
पर आपल्या सर्जा – राजावर जीव हा ओवाळी
राबतो कष्टतो माझा शेतकरी बाप
तरी त्यालाच का एवढा मनस्ताप ?

Radha Shantaram Dhumak


नातं तुझं आणि माझं

अनोळखी दोन मुखवटे होतो आपण …
कधी एक झालो कळलंच नाही
तुझ्यात मी अन माझ्यात तू
कधी वीरलो हे उमजलंच नाही…
नात्याच्या बंधनात अडकून
कधी एवढे घट्ट बंध बनलो हे जाणवलंच नाही….
तू म्हणजे मी आणि मी म्हणजे तू
कधी असं झालं हे समजलंच नाही ….
यालाच प्रेमाचं नवीन बहर देऊन
कधी नातं तुझ आणि माझं बनलं हे उलगडलंच नाही

-Radha Shantaram Dhumak


आयुष्यात आपण घेतलेला निर्णय कधिच चुकिचा नसतो फक्त तो बरोबर आहे हे सिद्ध करण्याची जिद्द स्व:तमध्ये असायला हवी 👍

Sai Damodhar Wadje


करिअरच्या सुरवातीला किती पैसा कमवता , यापेक्षा किती ज्ञान कमवता याला जास्त महत्व आहे.

Vishvanath jagan pawar


आज न उद्या करता करता आयुष्य माञ कमी होत असत..ते किती जगता त्याला महत्व नसून ते कसं जगता त्याला महत्व आहे विचार करायला गेलो तर टेन्शन आज ही आहे उद्या ही असेल..परंतु त्या टेन्शन मधन आनंदी होऊन जगणं हेच खर आयुष्य..कधी काय होईल सांगता नाही येत परंतु जे होईल अगदी उत्तमच होईल असं विचार करून जगणच आयुष्य आहे..गेलं झाल ते विसरून जा..येईल आपला ही वेळ फक्त एक छोटीशी smile चेहर्या वर टेवत जा…😊

Praful Patil


चार दिवस कुठे लांब जाऊन बघा
लोक तुम्हाला विसरून जातील
आयुष्यभर माणूस एका गैरसमज मध्ये असतो
की मी लोकांसाठी खूप खास आहे
पण हे एक कडू सत्य आहे की लोकांना तुमच्या असल्याचा आणि नसल्याचा काहीही फरक पडत नाही
लोक फक्त त्यांचा फायदा असेल तेव्हा तुमची आठवण काढत असतात
म्हणून स्वतःसाठी जगुन बघा.

अजिंक्य दादाजी कापडणीस


आयुष्य असंच असतं…
जे हवंय ते भेटत नाही, जे आहे त्याचा सहवास संपत नाही…
जे व्हावं असं वाटतं ते होतंच नाही.., जे होऊ नये असं वाटतं ते होतंच…
जे चाललंय तेचं जगून घ्यावं आणि आमचं पणं छान चाललंय असं बोलून जावं..
कदाचित यालाचं तर म्हणतात आयुष्य..!!

Vrushali suhas Tilekar


नाचते जणू जसे मोरा
गुलाबा सारखा आहे चेहरा
फिदा झालो या अदावर
गोड तुझ्या या हसण्यावर

Harish Gangaram Bhaganagare

Leave a Comment