तु सोबत असलास की उन्हाचे ही चांदणे होते तु जरा हसलास की समुद्राला ही नदी भेटते तु नुसता बघत असलास की कवीला ही काव्य सुचते
तु सोबत असलास की खुप काही माझे होते🖤
–Dhanashree Hanumant Malgaonkr
लाडाची लेक….
कोणता असा गुन्हा केला, कळतच नव्हतं…..
नक्की केले काय एवढं, जुळतच नव्हतं….
गर्भात असताना, नकोशी झाली तुम्हाला…
जन्मली जेव्हा, आनंद नव्हता कोणाच्या चेहऱ्याला….
प्रत्येक वाट्या मध्ये, माझा कमीच अधिकार असायचा…
दादाला मात्र सगळ्यांत, जास्त मान भेटायचा…
शिकून घे ग पोरी, सासरी तुला जायचं…
हे घर तुझे नाही, कितींदा मनाला समजवायचं…
लाडाची लेक म्हणून, लाड कधीच नाही पुरवले…
ज्या गोष्टी मध्ये सुख होते, ते कधीच नाही अनुभवले..
मनातली गोष्ट तर कधी, करायलाच नाही जमली…
“लोक काय म्हणतील?” ह्यानेच, जीवनावर बंधने घातली…
मान सन्मानाची गोडी आता, मला ही नाही राहिली…
दुसऱ्यांच्या सुखात मी, आनंद शोधत राहिली..
आयुष्यातले सुखी क्षण, मला जाणून घ्यायचे..
कधीतरी मनासारखे मला, राहिलेले आयुष्य जगायचे…
-Rohan Ganesh Mhatre
एकतर्फी प्रेम….
तुझ्या येण्या – जाण्याचा वाटेला, वाट मी पाहतो…
तुला येताना पाहिल्यावर, मन बावरला जातो…
आडोशाला उभे राहून, तुझे ते रूप पाहतो…
तेच रूप मनात भरून, दिवस पूर्ण घालवतो ..
तुझा बद्दल प्रेम सांगण्याचा, प्रयत्न मी करतो…
पाहतो जेव्हा तुला,सर्व विसरुनी जातो…
मनात भरलेले सर्व, ओठावर येऊ पाहतो,
दोन पाऊल पुढे जाऊन, चार पाऊल मागे येतो…
आज सांगेन, उद्या सांगेन ह्या मध्येच मी अडकतो…
मनातून प्रेमाची गोष्ट, बाहेर काढून पाहतो…
आयुष्यात तु माझ्या, मनाची राणी आहेस..
तुझ्यासाठी नसलो मी राजा, तरी माझासाठी तू खूप आहेस..
तुझ्या त्या देखण्या रुपालाच, मनात भरून ठेवतो…
एकतर्फी का होईना, प्रेम फक्त तुझ्यावरच करतो…
–Rohan Ganesh Mhatre
सांगतील माझ्या भावना तुला
हक्काचा स्पर्श होऊ दे जरा
मग बघ ती रात्रच काय
जीवनच उजळून टाकेल
त्या अंधारी रात्रीला दुरावा
काय असतो हे जवळून सांगेल तुला
मग बघ जवळीकता काय असते
हे कळेल तुला
डोळे बंद करून
आनंद अनुभवायला सांगेल तुला
मग बघ दुःख काय असते
हे विसरून लावेल तुला
प्रेमाच्या पावसात
दोघांच्या उब सहवासात
कधी गोड सकाळ होईल
माहिती ही नाही पडेल
मग बघ सकाळ झाल्यावरही
अंधारी रात्र आवडेल तुला
–Sara giri
Problems…
होईल की सगळ व्यवस्थित आज चिंता केल्याने जे होणार आहे ते बदलू न्हाय शकत..
परंतु आज Positive विचार ठेवले असता ते टिकू ही न्हाय शकत…
Problems सगळ्यांचा आयुष्याचा एक भाग आहे पण या problems मध्येही आपण एक smile देहून पुढे गेलो यालाच महत्व आहे..😇
होईल ना सगळ ठीक आज वेळ वाहीट आहे उद्या चांगला येईल..
Problems आज आहे उद्या कमी होईल…💫
Problems तर मनुष्याच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग आहे यार लहानपणा पासून च आपल्याला problems ला बडी जावं लागतं..
लहानपापासूनच ही problem ती problem..but it’s only exam..✨
असं समजून पण जगल तरी आयुष्याच्या या problems नावाच्या परीक्षेत उत्तम गुणांनी पास होऊ..😇
थोडक्यात सांगणं एवडच की problems आज आहे उद्या ही असतील…
परंतु आयुष्य आज आहे सांगता येत नाही की उद्या असेल..म्हणून problems मध्ये ही एक छोटीसी smile देहुन जगा प्रत्येक दिवस आपल्याला काही शिकाहून जात असतो..
आज कमी तर उद्या बराच अनुभव देहुण जात असतो..😇
बस आनंदी राहून जगा problems तर आयुष्याचा एक भाग असतो..😇😊👍🏻
–Praful Patil
मी आणि माझे बाबा
जगतो सोबती घेऊन
सुख दुःखाच्या आठवणी….
मी आणि माझे बाबा
झटणारे माझे बाबा आणि
त्याचे हसू पाहण्यास
आतुरतेने वाट पाहणारी मी…..
मी आणि माझे बाबा
आमचे जीवन जसे लहरी सुखाच्या
बाबा चे जितके मानवे आभार
पडतात कमी …..
असे हे माझे बाबा आणि या बाबाची
लाडकी मी……