Tujhya Majhya Sansarala Ani Kai Hava Full Information marathi

Tujhya Majhya Sansarala Ani Kai Hava (Zee Marathi) Serial Cast, Timings, Story, Real Name..

झी मराठीवर लवकरच एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ असं या मालिकेचं नाव असून, त्यात अभिनेत्री अमृता पवार प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. 30 ऑगस्टपासून रात्री 9 वाजता ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ ही मालिका प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होणार आहे. नुकतंच या मालिकेचा प्रोमो रिलीज झाला आणि पाहता पाहता या प्रोमोला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं.

या प्रोमोमध्ये अभिनेत्री अमृता नवऱ्या मुलाकडील नातेवाईकांची नाव लक्षात ठेवताना दिसतेय. या मालिकेचं कथानक नक्की काय असणार आहे आणि अमृतासोबत या मालिकेत अजून कोण कलाकार दिसणार आहेत, ही सर्व माहिती अजून गुलदस्त्यात आहे. पण, या प्रोमोने मालिकेबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला नेली आहे.

Tujhya Majhya Sansarala Ani Kai Hava Timing

Channel Name Zee Marathi
Show Timings Monday to Saturday at 9pm
Running Time 20-25 Minutes
Starting Date 30 August 2021
Language Marathi
Country India

 

Zee Marathi Serial Cast

Name तुझ्या माझ्या सावसाराला आणि काय हव
Main Cast अमृता पवार ,
Genre Romantic Drama
Director उपलब्ध नाही
Producer उपलब्ध नाही
Editor उपलब्ध नाही
DoP उपलब्ध नाही
Production House उपलब्ध नाही

कथानक आजच्या काळाशी रिलेटेबल!

या मालिकेबद्दल बोलताना अभिनेत्री अमृता पवार म्हणाली, “तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेचं कथानक आजच्या काळातील मुला-मुलींसाठी खूपच रिलेटेबल आहे. मी साकारत असलेली यातील भूमिका देखील खूप आपलीशी वाटणारी आहे. मी माझ्या वयाची आणि साधारण खऱ्या आयुष्यात मी जशी आहे तशी भूमिका पहिल्यांदा छोट्या पडद्यावर साकारतेय, त्यामुळे मला खूप जास्त आनंद होतोय. प्रेक्षक या मालिकेवर खूप प्रेम करतील त्यांना ही ती खूप आवडेल याची मला खात्री आहे.”

‘राणा दा’चं पुनरागमन

‘राणा दा’ साकारणारा अभिनेता हार्दिक जोशी (Hardeek Joshi) लवकरच पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. झी मराठी वाहिनीवर सुरु होत असलेली नवी मालिका ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं?’ (Tuzhya Majhya Sansarala Aani Kay Hava) यात हार्दिक मुख्य भूमिका साकारणार असल्याचे कळते आहे. वाहिनीकडून अद्पाय यावर अधिकृत शिक्कामोर्तब झाले नसले, तरी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हार्दिक जोशी आता ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ असं म्हणणार आहे. या मालिकेत नवोदित अभिनेत्री अमृता पवार मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

अमृता पवार कोण आहेत ?

टीझरनुसार, अमृता पवार या शोमध्ये एक अनोखी भूमिका साकारताना दिसणार आहे आणि चाहत्यांना चित्रपटाच्या पुरुष आघाडीबद्दल आधीच उत्सुकता आहे.याआधी, अमृताने शोमध्ये जिजामाताची मुख्य भूमिका साकारली होती आणि आता ती तिच्या आगामी शोद्वारे प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्यासाठी सज्ज आहे. तिने दुहेरी या शोद्वारे मराठी टीव्हीमध्ये पदार्पण केले. नंतर, ती ललित 205 या टीव्ही शोमध्ये अभिनेता संगम साळवीसोबत काम केले आहे .

प्रेक्षकांना नव्या मालिकांची उत्सुकता

‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मलिकेत अभिनेत्री अमृता पवार प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. 30 ऑगस्टपासून रात्री 9 वाजता ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ ही मालिका प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होणार आहे. नुकतंच या मालिकेचा प्रोमो रिलीज झाला आणि पाहता पाहता या प्रोमोला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं. या मालिकेचं कथानक नक्की काय असणार आहे आणि अमृतासोबत या मालिकेत अजून कोण कलाकार दिसणार आहेत, ही सर्व माहिती अजून गुलदस्त्यात आहे, पण प्रोमोने मालिकबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला नेली आहे.

हे पण वाचा ⇓⇓

Leave a Comment