सिंगल लोकांसाठी स्पेशल मराठी स्टेटस

single marathi quotes
single marathi quotes

मी single आहे
अस लोकांना सांगणं बंद करा रे ,तुमचं पण लग्न
होणार आहे यार आणि ते तुमचे आई – वडील लावून देतील ,
उगाच कशाला सगळ्यांसमोर रडत बसत आहात
आणि स्वतःला कमजोर म्हणून सिद्ध करत आहात..👍🔥


Single साठी प्रश्न आहे…
1:- तुम्ही singleच खुश आहात …
2:-कोणी दुसरा व्यती तुमचा आयुष्यात येइल
याची वाट बघत आहात..


Single ते नसतात जे एकटे आपली Life Enjoy करतात …
Single तर ते असतात जे Relationship
मधे असुन पण एकटेच असतात…

single quotes in marathi
single quotes in marathi

तू single आहेस का?
-हो,कारण प्रेम सोडून खूप काही महत्वाचा
गोष्टी आहेत माझ्या आयुष्यात ज्या
मला पूर्ण करायच्या आहेत…😏


Single वगैरे अस कोणी नसतं….
प्रेम संगळ्यानाच होतो फरक एवढाच असतो की
कोणाच क्षणात तुटत तर कोणाच आयुष्यभरासाठी टिकतं..तू Single का आहेस?
पहिली गोष्ट मी life मध्ये काही goals set केले आहे
आणि त्यामध्ये In Relationship status
कुठेच बसत नाही so..😏✌️

अस का पण ?
जे relation मध्ये आहेत कधी कधी त्यांना ते नात नको असतं
आणि जे single आहेत त्यानां relation मध्ये जाण्याची घाई असते ,
कारण आपल्याकडे जे नसतं ते हवं असतं आणि जे असतं
त्याची कदर नसते म्हणून जास्त अपेक्षा ठेऊ नका जे होईच
आहे ते होईल बरोबर वेळेवर मस्त enjoy करा आपली life .

चूक तुमची नव्हती

single marathi motivationa quotes
single marathi motivationa quotes

लोक तुम्हाला सोडून गेले ,त्यांनी तुम्हाला धोका दिला ते तुम्हाला ignore करायला लागले ,ते तुमच्याशी बोलत नसतील कारण त्यांना दुसरी व्यक्ती भेटली आहे ,

त्यांना कोणीतरी दुसरू व्यक्ती आवडली आहे ,कारण त्यांना timepass करायचा होता ,त्यांचं मन भरलं ,ते गेले ,

मला एवढंच सांगायच आहे की मग तुम्ही का हे सगळं स्वतःवर ओढून घेत आहात ,की सगळं माझ्यामुळे झालं असेल ,मी कुठेतरी कमी पडलो असेल वैगरे ,अस काही नाही आहे ,

तुमची यात काही चुकी नाही आहे फक्त तुम्ही निवडलेली व्यक्ती चुकीची होती ,ते ठीक आहे यार ,चुकी सगळ्या कडून होतात रे आणि हे ठीक आहे ,ते accept करा आणि पुढे चला ,


काही गोष्टी नसतात आपल्या हातात ,पण ठीक आहे यार हेच तर आयुष्य असतं ना ,पण आपली काही चुकी नसताना ,आपण का रडायचं त्या व्यक्तीसाठी ज्यांनी आपला थोडा पण नाही विचार केला ,

सगळ्याच गोष्टी तुम्ही तुमच्यावर घेऊ नका यार ,तुमच्यामुळे काही झालेलं नाही आहे ,तुम्ही चांगले आहात ,चांगले रहाल, लोक तुम्हाला सोडून गेले म्हणजे प्रत्येक वेळी चुकी तुमची आहे असं समजू नका ,

Life मध्ये अशे खूप लोक येतील आणि जातील ,सगळ्यांचे स्वभाव आवडी निवडी वेगवेगळ्या असतील, काहींना तुम्ही आवडालं काहींना नाही आवडणार ठीक आहे यार ,काहीवेळा होईल चूक माणसं ओळखण्यात, काही हरकत नाही ,अनुभव असाच भेटतो ,

दुःख होईल ,त्रास होईल पण फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा चूक तुमची नव्हती ,ते गेले कारण त्यांना जायचं होतं बस एवढंच होत ते ..

काही गोष्टी या accept करायला शिका अस प्रत्येक वेळी कोणी नाही सांगणार आहे तुम्हाला ,काही गोष्टी स्वतःहा ओळखायला शिका यार ,जग खूप पुढे चाललं आहे तुम्ही मागे राहू नका ..😊


Single marathi quotes
Single marathi quotes

काहिनाहीरे लोकांनी ना आपल्या डोक्यात ना ही चुकीची गोष्ट भरून ठेवली आहे की आता single असलो का कायम single रहाल तुम्ही ,की single आहे म्हणजे तुला कोण पटत नाही वगैरे वगैरे ..

आणि त्यामुळे आपला पण mindset असाच झाला आहे ,की मी single राहिलो तर ,college मधले मूल-मुली हसतील माझ्यावर ,

अशे बिनकामाचे विचार आपल्या डोक्यात येत असतात आणि आपण तेच तेच विचार करून उदास होतो ,काहीही कारण नसताना फक्त लोक बोलली म्हणजे ते खरं असेल हेच आपण लक्षात ठेवतो कारण तेव्हा आपल्याला समजवायला कोणी नसतो …

तर मी तुमचा एक मोठा भाऊ म्हणून समजावतोय की ह्या सगळ्याला ignore करा हे अस काही नसतं ,हे फक्त लोकांना काही काम धंदे नसतात ते दुसर्यांना पण बिनकामाचे ठरवतात ,

पण जर तुम्हाला एखादी व्यक्ती मनापासून आवडली तर ठीक आहे पण फक्त लोक बोलतात म्हणून किंवा तुमचा ego hurt झाला म्हणून relationship मध्ये जाण्याच विचार सोडून द्या ..

आणि जर अस करायचं आहे तर बिनदास करा फक्त depression मध्ये गेल्यावर कोणाला नाव ठेऊ नका कारण लोकांच किती आणि केवढं ऐकायचं ते आपल्यावर असतं …

जेव्हा कोणी बोलेल ना तुम्हाला की काय यार तुला अजून एकपण नाही पटली ‘ तेव्हा त्यानां फक्त एवढंच बोला की ” ते सोडून पण खूप गोष्टी असतात यार life मध्ये आणि मी त्यात खूप busy असतो ” …

आणि कसला कमीपणा वाटतो रे single असण्यामध्ये ,यार उलट तुम्ही कोणाचा आयुष्य उध्वस्त तरी नाही केलत ना ,म्हणून स्वतावर गर्व बाळगा ….
.
आणी प्रत्येक व्यक्तीच आयुष्य वेगळं असतं रे ,ते त्यानां आवडतं तस जगत आहेत तुम्ही तुम्हाला आवडतं तस जगाना ,

लोकांना तुमच्याबद्दल काय वाटत आहे त्याने काही फरक पडत नाही यार कारण ते त्यांच्या दृष्टीतून बघत असतात नेहमी तुम्हाला..

आणि तुमचे स्वप्न काय आहेत हे फक्त तुम्हालाच माहीत आहेत म्हणून जगाच विचार करणं सोडून द्या आता आणि मस्त life enjoy करा ..❤️

आणि तसपण सगळ्यांचे लग्न होणार आहेत त्यात काही वाद नाही फक्त मला लग्नाच आमंत्रण देईला विसरू नका हा ..


हे पण वाचा ⇓⇓

1) प्रेम आणि Reality प्रेरणादायी सुविचार

2)100+ Best Friend Quotes in Marathi


एकांत बसल्यावर खूप गोष्टी ,माणसं डोळ्यासमोरून गेली काहींनी सुख दिल काहींनी दुःख दिले पण ते सगळं आता विसरायचं प्रयत्न करत आहे ,

मग आठवलं मला ते बालपण ,ती मस्ती ,ती निरागस मैत्री ,ते हळूच हसणं आणि पटकन रागावणं ,आईनी ऐकवलेली चांदोमामची कविता आणि बाबांनी खांद्यावर बसून केलेली सैर ..

ती शाळा ,ते छोटेसे बाक ,आणि बॅग आणि गळ्यात waterbottel टाकून थोडं रडत शाळेला जाणार मी ..
10 झाली ,11 वी नंतर मग आली बारावी ,ते classes ,

त्याच वेळेस झालेले प्रेम ,त्यात गेलेले ते थोडे क्षण ,मग ते result च tension ,पुढे काय होईल याच tension ,
परत ते प्रेम accept करेल की नाही याचं tension यातच ते वर्ष संपून गेलं ,

मग पुढचं शिक्षण त्यात शिकलेल्या खूप गोष्टी ,काही घडलेले वाईट प्रसंग आणि काही चांगले सुद्धा ,माणसांची झालेली ओळख आणि पारख ,शिक्षकांनी दिलेले काही आयुष्याचे धडे …

ते झाल्यावर मग job ,मागतेच सगळं tension ,धावपळीच जीवन यात कधी आपण स्वताला वेळ दिलाच नाही ,
कधी अपल्याबद्दल विचार केलंच नाही कारण तेवढा वेळ कधी भेटलाच नाही ,सगळे busy होते आपापल्या भविष्याचा विचार करत ..

पण एक प्रश्न स्वताला विचारा की खरच मी कधी स्वतःसाठी जगलो का किंवा मला नक्की काय करायचं आहे ह्याचा विचार केला का ,स्वतःच्या आनंदाचा विचार केला का ??

माहीत आहे आयुष्य खूप कठीण आहे पण शेवटी ते आपलंच आहे ना आणि सोपं ही आपल्यालाच बनवायचं आहे .❤️


मी रोज ऐकतो खूप जणांकडून की मी single आहे रे काय करू ?

मला हसायला येतो की हा खरा प्रश्न नाही आहे रे ही jealousy आहे कारण जेव्हा तुमचे सगळे मित्र किंवा मैत्रिणी relationship मध्ये असतात तेव्हा अशी feeling येते की आपण का single का आहोत अजून .

पण जेवढी आजकालची पिढी त्याला seriously घेते तेवढी महत्वाची गोष्ट तर नाहीच आहे रे आपण उगाच त्याला मोठं करतो आणि सगळ्या गोष्टीत त्याला जोडत जातो.

आणि तुम्हाला कोण बोललं की relationship मध्ये आहेत ते खुश आहेत फक्त ते आता कोणाला सांगू नाही शकत कारण तो त्यांचा decision असतो ..

जेव्हा लोक बोलतील ना की तू अजून singles आहेस तेव्हा त्यांना सांगायचं की हो मी single आहे मग त्याने काय फरक पडतो आणि तुम्ही relationship मध्ये राहून काय मोठे दिवे लावलेत रे हे पण त्यानां विचारायचं ..

लोकांनी काहीही विचार करूदे रे ,शेवटी आपल्याला काय suitable आहे ते फक्त आपल्यालाच माहीत असतं ..

चल ठीक आहे रे आहे मी single एवढं काय त्यात आणि main म्हणजे खुश आहे ना मी बस तेवढंच पाहिजे मला बाकी काही नको मला आणि माझे bestie आहेत ना सोबतीला खूप झालं ..

लोकांना काय कमीपणा वाटतो काय माहीत हे सांगायला की मी single आहे ,अरे आहे ते आहे ना त्यात का चूक आहे का बोलायला ,

तुम्ही single असा किंवा relationship मध्ये ज्यात तुम्ही जास्त खुश असता ते तुम्ही निवडा ते तुमचं निर्णय आहे ..

Single आहे पण सक्षम आहे कुठल्याही परिस्थतीला सामोरं जायला ,कोणाच्या मागे मागे लपून राहण्याची गरज नाही मला .

Single राहणं म्हणजे दरवेळी ,कोणी भेटतं नाही म्हणून single आहे तो भाग वेगळा आहे आणि मला त्या मध्ये आता पडायचं नाही आहे ही एक वेगळी बाजू आहे आणि ती कोणाला नाही समजली तरी चालेल ,सांगायला पण जाऊ नका आपली life enjoy करा ..✌️


single marathi status
single marathi status

अस खूप जण प्रश्न विचारतात पण खरंच याच देणं गरजेचं असतं का ?
तुम्हाला माहीत आहे नक्की single म्हणजे कोण असतात ?
का आपण स्वतःला single बोलून बोलून स्वतःचीच समजूत काढत असतो ?

त्यांना सांगा काही problem आहे का तुम्हाला मी single असण्याचं किंवा नसण्याच ,
हो आहे मी single आणि ह्याच कारण काय असेल हे तुम्हाला काय ठरवायचं आहे ते ठरवा .🔥

Single ते नसतात जे relationship मध्ये नसतात तर खरे ते असतात ज्यांच्या बरोबर कोणी नसतं बोलायला ,personal गोष्टी share करायला ,कधी वेळ गर्जेवर कॉल करून लगेच बोलवायला 😞.

आपण ना लोकांकडे1 बघून relationships मध्ये जाण्याच प्रयत्न करतो खर तर तशी गरज नसते कारण जर तुम्ही एकटे खुश असाल तर काय गरज आहे relationship मध्ये जाण्याची .😊

तुम्ही तर खूप lucky आहात ,तुमच्याकडे besties आहेत काही जणांकडे ते पण नसतात ,त्याचं काय होत असेल कधी विचार केलाय का ..👍

लोक single आणि relationship मध्ये एवढे अडकत चालले आहेत की ते सोडून हल्ली कुठले विषय नसतात1 लोकांकडे बोलायला ..

मी अस नाही बोलत की प्रेम करू नका स्वतःच्या मनाला काय वाटतंय ते करा ,लोकांचं ऐकून कुठलही निर्णय घेऊ1 नका .😊

Leave a Comment