Shree Ram Quotes in Marathi | श्री राम मराठी स्टेटस

चैत्र शुद्ध नवमी हा दिवस हिंदू पंचागानुसार अत्यंत महत्वाचा दिवस. याचे कारण असे की या तिथीला भगवान विष्णूचा सातवा अवतार समजल्या जाणाऱ्या प्रभू रामचंद्राचा जन्म झाला.. या दिवसाला ‘रामनवमी’ असे म्हणतात. ज्याप्रमाणे कृष्णाचा जन्म रात्री 12 वाजता झाला असे म्हणतात तसेच प्रभू रामाचा जन्म सूर्य डोक्यावर आल्यावर म्हणजेच दुपारी 12 वाजता झाला. रामनवमीचा उत्सव अनेक ठिकाणी फार वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. राम जन्माच्या दिवशी रामजन्म पाळणा अगदी हमखास गायिला जातो. या सोहळ्यामध्ये ग्रंथपठण, रामकथेचे निवेदन, गीत रामायण आधीचे पठण केले जाते. प्रभू श्रीराम हे पितृवचन, मातृवचन, एकवचनी आणि आदर्श व्यक्तिमत्व मानले जाते. त्यामुळे रामनवमीला आवर्जून एकमेंकाना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा (Ram Navami Wishes In Marathi), रामनवमीसाठी खास स्टेटस (Ram Navami Status In Marathi) आणि रामनवमी एसएमएस (Ram Navami SMS In Marathi) शेअर केले जातात. तुम्हा सर्वांना राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा.

Shree Ram Quotes in Marathi

Shree Ram Quotes in Marathi
Shree Ram Quotes in Marathi

१. “श्रीराम ज्यांचे नाव आहे
अयोध्या त्यांचे धाम आहे
एक वचनी, एक बाणी
मर्यादा पुरुषोत्तम
अशा रघुनंदनाला माझा प्रणाम..”

२. “प्रत्येकाच्या जीवनात आणि
जगण्यात राम येवो.
मर्यादापुरुषोत्तम श्री प्रभू रामचंद्र
आपणांस आरोग्य, सुख, शांती
भरभरून प्रदान करो.”

 

३. “प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद सदैव तुमच्यासोबत असू द्या.
तुमचे घर कायम आनंद, सौभाग्याने भरलेले राहू द्या.”

४. “त्याग , सत्यवचन , संस्कृती
आणि परंपरेचे जतन.
मर्यादा पुरुषोत्तम आणि
एक आदर्श शासक,
प्रेरणादायी राजा रामचंद्र .”

 

५. “ज्यांचा कर्म धर्म आहे..

ज्यांची वाणी सत्य आहे.

त्यावर प्रभू रामचंद्राची कृपा आहे.”

 

६. “जसा प्रत्येकाच्या जीवनात एक सखा
कृष्ण आवश्यक आहे,
तसाच प्रत्येकाच्या मनात,
मर्यादा पुरुषोत्तम
राम असणं आवश्यक आहे.”

 

७. “मर्यादापुरुषोत्तम भगवान श्री राम यांच्या
जीवनातून आपल्याला विचार,
शब्द आणि कार्यामध्ये श्रेष्ठता
आणण्यासाठी प्रेरणा मिळो.”

८. “प्रभू रामचंद्राची सज्जनशीलता,
मातृ-पितृ भक्ती, मर्यादा पुरुषोत्तमता
आणि राजेशाही वैभवता, सुख-समृद्धी
आरोग्यता, या चैत्रनवमीच्या शुभदिनी
श्री प्रभूरामचंद्राच्या कृपेने आपल्या
आयुष्यात आनंद येवो ही प्रार्थना.”

 

९. “आदर्श घ्यावा तर तो प्रभूरामचंद्राकडून

कारण त्यांच्यासारखा राजा,

मातृ-पितृवचनी पुत्र आणि

एकवचनी पुरुष कधीच होऊ शकत नाही”

 

RAM MANDIR QUOTES IN MARATHI

ram mandir quotes marathi
ram mandir quotes marathi

श्री रामा 
खूप वर्षापासून आम्ही सगळे या दिवसाची वाट बघत होतो, तुम्ही घरी परत येणार हे ऐकून खूप आनंद झाला, सोपं तर कोणासाठीच नव्हतं, आम्हाला माहीत आहे तुम्ही ही या क्षणाची वाट बघत होतात, डोळे भरून तुम्हाला बघत बसावं अस वाटत आहे, आमचे डोळ्यातील अश्रू हे आनंदाश्रू आहेत, ते आता फक्त तुमचे दर्शन झाल्यावरच थांबतील, देवा तूमचे अयोध्या नगरीत स्वागत आहे, आमचं आयुष्य सार्थकी लागले आणि या जन्माच सोन झालं असच आम्हाला वाटतं..🙏 जय श्री राम 🚩
🚩

Maryada Purushottam ram quotes in marathi

Shree Ram Quotes in Marathi
Shree Ram Quotes in Marathi

१०. “गर्व आहे प्रभू रामचंद्रावर ज्यांनी

14 वर्षांचा वनवास  झेलला

आणि पापाचा संहार केला..

बोला श्री राम जय राम.”

 

११. “प्रभू श्री रामचंद्राचे आयुष्यही अडचणींनी

भरलेले होते. पण ते कायम त्यांना

हसतमुखाने सामारे गेले..

त्यांचा हा आदर्श नक्की घ्या.”

 

१२. “पायो जी मैने राम

रतन धन पायो…”

१३. “श्रीराम नवमीच्या दिवशी

प्रभू रामांनी जन्म घेतला तो दृष्टांचा

संहार करण्यासाठी या दिवसाचे

महत्व अजिबात कमी होऊ देऊ नका

आपल्यातील रावणाला आजच नष्ट करा.”

१४. “लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रम

रघुवंशनाथम, कारुण्यरुपं

करुणाकरं तं शरणं प्रपद्ये.”

Shree RAM Images in marathi

shree ram image
shree ram image

Ram navami quotes in marathi

Ram navami quotes in marathi
Ram navami quotes in marathi

१५. “माता सीतेचे धैर्य, लक्ष्मणाचे तेज

आणि भरताचे त्याग

आपल्या सगळ्यांना

आयुष्यात शिकवण देत राहो.”

१६.”आज प्रभू श्रीराम असते

तर त्यांनी प्रेमाचा खरा

अर्थ लोकांना शिकवला असता.”

 

१७.” वाईटाचा त्याग कर,सत्याची कास धर..

अरे मानवा जरा प्रभू रामांच्या

विचाराची कास धर..”

 

१८.”बळे आगळा कोदंडधारी

महाकाळा विक्राळ तोही थरारी।

पुढे मानवा किंकारा कोण ठेवा ।

प्रभाते मनी राम चिंतित जावा ।.”

 

१९.”उच्चारिता राम होय पाप चर  ।

पुण्याचा निश्चय पुण्यभूमी ।।”

 

२०.”रामश्याम हा धर्मपारायण हा चक्रायुथ

श्रीनारायण जगदुत्पादक

त्रिभुवनजीवन मानवी रामरुप ल्याला.”

२१. “जो सत्यमार्गावर चालतो

राम त्यांनाच भेटतो.”

२२.“प्रभू रामाला जीवनाचे सत्य माना आणि

मार्गक्रमण करत राहा तुम्हाला

नक्कीच यश मिळेल.

श्रीराम नवमीच्या तुम्हाला आणि

तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा!.”

 

२३.”प्रभू रामांच्या चरणी लीन राहाल तर

आयुष्यात कायम सुखी राहाल..”

 

२४.”ज्यांच्या आयुष्यात पाप नाही,

जो कायम सदमार्गावरुन चालतो.

प्रभू राम त्यांनाच प्रसन्न होतात.”

 

२५. “प्रत्येकाच्या जीवनात आणि जगण्यात

राम येवो हीच इश्वरचरणी प्रार्थना..”

 

२६. “राम अनंत आहे,राम शक्तिमान आहे,

राम सर्वस्व आहे..

राम सुरुवात आहे आणि

राम शेवट आहे.”

 

२७. “राम नावाने करा जीवनाची सुरुवात ,

म्हणजे चांगल्या आयुष्याची होईल सुरुवात.”

 

Ram sita quotes in marathi

Ram navami quotes in marathi
Ram navami quotes in marathi

२८. “राम ज्यांचे नाव आहे,

अयोध्या ज्यांचे गाव आहे..

असा हा रघुनंदन

आम्हास सदैव वंदनीय आहे.”

२९.”चैत्र मात्र त्यात शुद्ध नवमी ही

तिथी गंथयुक्त तरिही ,

वात उष्ण हे किती दोन प्रहरी,

का ग शिरी सूर्य थांबला,

राम जन्मला ग सखे राम जन्मला.”

३०. “ज्यांच्या मनात श्रीराम आहे,

त्यांच्या नशिबात वैकुंठधाम आहे.”

Leave a Comment