शनि देव कथा-आर्ती-मंत्र-स्तोत्र Lyrics Pdf | Shani Dev Status Marathi

आपल्या पौराणिक धर्म ग्रंथांत शनि महाराज यांचा कर्म आणि न्याय देवता असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. शनि महाराज यांची कृपादृष्टी मानवा प्रमाणे देवी देवतांनवर सुद्धा असल्याने त्यांना अनन्य साधारण महत्व देण्यात आलं आहे.

तसचं, शनि महाराज यांच्या बद्दल लोकांची अशी मान्यता आहे की, शनिवारी आपण त्यांची आराधना केल्यास आपल्यावर येत असलेली संकटे नाहीसे होतात. म्हणून भाविक दर शनिवारी शनि मंदिरात शनि देवाची उपासना करण्यासाठी मोठ्या संख्येने जात असतात. 

Shani Dev Marathi Aarti

जय जय श्री शनीदेवा | पद्मकर शिरी ठेवा

आरती ओवाळतो | मनोभावे करुनी सेवा || धृ ||

सुर्यसुता शनिमूर्ती | तुझी अगाध कीर्ति

एकमुखे काय वर्णू | शेषा न चले स्फुर्ती || जय || १ ||

नवग्रहांमाजी श्रेष्ठ | पराक्रम थोर तुझा

ज्यावरी कृपा करिसी | होय रंकाचा राजा || जय || २ ||

विक्रमासारिखा हो | शककरता पुण्यराशी

गर्व धरिता शिक्षा केली | बहु छळीयेले त्यासी || जय || ३ ||

शंकराच्या वरदाने | गर्व रावणाने केला

साडेसाती येता त्यासी | समूळ नाशासी नेला || जय || ४ ||

प्रत्यक्ष गुरुनाथ | चमत्कार दावियेला

नेऊनि शुळापाशी | पुन्हा सन्मान केला || जय || ५ ||

ऐसे गुण किती गाऊ | धणी न पुरे गातां

कृपा करि दिनांवरी | महाराजा समर्था || जय || ६ ||

दोन्ही कर जोडनियां | रुक्मालीन सदा पायी

प्रसाद हाची मागे | उदय काळ सौख्यदावी || जय || ७ ||

जय जय श्री शनीदेवा | पद्मकर शिरी ठेवा

आरती ओवाळीतो | मनोभावे करुनी सेवा ||

 

Shani Dev Marathi Aarti Lyrics Pdf

shani dev aarti pdf link

Shani Dev Story(कथा) Marathi

शनि महाराज यांची महिमा फार थोर असून भाविकांच्या कर्मानुसार ते त्यांना न्यायदान करीत असतात. तसचं, त्यांच्या जन्माबद्दल पुराणांमध्ये अनेक दंत कथा प्रचलित आहेत. त्यानुसार, शनि महाराज हे सूर्य देव आणि देवी छाया यांचे पुत्र आहेत.

शनि महाराज यांच्या रंगाबद्दल आणि त्यांच्या अंगी असलेल्या महान शक्तीबद्दल सांगण्यात येते की,  देवी छाया यांच्या गर्भात शनि देव असतांना त्यांनी भगवान शिव यांची आराधना केली होती. महादेवाची आराधना करण्यात देवी छाया इतक्या मग्न झाल्या की त्यांना आपल्या गर्भात बाळ असल्याची जाणीव राहिली नाही.

तहान भूक विसरून त्या आपल्या भक्तीत ध्यानिस्त झाल्या होत्या. परिणामी शनि महाराज यांचा रंग सावळा झाला. याचप्रमाणे शनि देव यांना आपले पिता सूर्य देव यांचा तिरस्कार करण्यामागे अशी मान्यता आहे की, शनि देवाचा रंग पाहून सूर्य देव यांनी देवी छायाला हे मुल आपले नसल्याचे सुनावले.

परिणामी शनि देव आणि त्यांची आई खूप दुखी झाल्या. शनि महाराज यांना आपल्या पितांचा तिरस्कार वाटू लागला. परिणामी त्यांनी आपल्या आईच्या म्हण्यानुसार वडिलांच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी भगवान शिव यांची कठोर तपस्या केली.

शनि महाराज यांची कठोर तपस्या पाहून महादेव त्यांना प्रसन्न झाले आणि त्यांनी शनि देवाला वरदान मागण्यास सांगितले. तेव्हा शनि देवाने आपल्या आईवर आणि आपल्यावर झालेला अन्याय महादेवाला सांगितला.

शिवाय, शनि देवाने महादेवाला वर मागितला की मला पिता सूर्य देव यांच्यापेक्षा जास्त शक्ती प्रदान करा. भगवान शंकर यांनी शनि महाराज यांना आशीर्वाद देऊन त्यांना नऊ ग्रहांमध्ये सर्वश्रेष्ठ ग्रह म्हणून स्थान दिले. म्हणून मानवाप्रमाणे देवतांना देखील शनि महराज यांच्याबाबत भीती वाटते.

मित्रांनो, ज्योतिष शास्त्रानुसार ग्रहांचे आपल्या जीवनांत विशेष महत्व आहे. आपल्या जीवनांत घडत असलेल्या सर्व गोष्टी ग्रहांवर अवलंबून असल्याचे ज्योतिष शास्त्री सांगत असतात. शनि महाराज यांना सर्व नऊ ग्रहांमध्ये सर्वश्रेष्ठ स्थान असल्याने त्यांची आराधना करणे सर्वात महत्वाचे असते.

आपण पाहत असतो की, कुठल्याही ज्योतिषाकडे गेल्यास ते आपणास ग्रह शांती करण्यास सांगत असतात. तसचं, ग्रह दोष असल्याचे सांगत असतात. म्हणून मित्रांनो आपण नियमित ग्रहांचे देवता असलेल्या भगवान शनि देव यांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची नियमित आराधना केली पाहिजे.

शनि अमावास्या या दिवशी शनि मंदिरात शनि देवाची उपासना करण्यासाठी विशेष पूजेचे आयोजन करण्यात येत असते.

तसचं, गरजू व्यक्ती तसेच गरिबांना प्रसाद म्हणून विविध अन्न पदार्थांचा वाटप देखील केला जातो. असे करण्यामागे लोकांची अशी धारणा आहे की, शनि महाराज प्रसन्न होतील आणि आपल्यावर असलेल्या ग्रहांचा प्रकोप कमी करतील. मित्रांनो, वरील लेखाचे महत्व समजून आपण सुद्धा शनि आरतीचे पठन करावे ही विनंती.

 

Shani Dev Marathi Mantra Marathi

 “ॐ शं शनैश्चराय नमः”

 “ॐ प्रां प्रीं प्रौं सः शनैश्चराय नमः”

 “ॐ शन्नो देविर्भिष्ठयः आपो भवन्तु पीतये। सय्योंरभीस्रवन्तुनः।।”

Shani Dev Stotra in Marathi

॥ अथ श्री शनैश्चरस्तोत्रम् ॥

श्रीगणेशाय नमः ॥

अस्य श्रीशनैश्चरस्तोत्रस्य । दशरथ ऋषिः ।

शनैश्चरो देवता । त्रिष्टुप् छन्दः ॥

शनैश्चरप्रीत्यर्थ जपे विनियोगः ।

दशरथ उवाच ॥

कोणोऽन्तको रौद्रयमोऽथ बभ्रुः कृष्णः शनिः पिंगलमन्दसौरिः ।

नित्यं स्मृतो यो हरते च पीडां तस्मै नमः श्रीरविनन्दनाय ॥ १॥

सुरासुराः किंपुरुषोरगेन्द्रा गन्धर्वविद्याधरपन्नगाश्च ।

पीड्यन्ति सर्वे विषमस्थितेन तस्मै नमः श्रीरविनन्दनाय ॥ २॥

नरा नरेन्द्राः पशवो मृगेन्द्रा वन्याश्च ये कीटपतंगभृङ्गाः ।

पीड्यन्ति सर्वे विषमस्थितेन तस्मै नमः श्रीरविनन्दनाय ॥ ३॥

देशाश्च दुर्गाणि वनानि यत्र सेनानिवेशाः पुरपत्तनानि ।

पीड्यन्ति सर्वे विषमस्थितेन तस्मै नमः श्रीरविनन्दनाय ॥ ४॥

तिलैर्यवैर्माषगुडान्नदानैर्लोहेन नीलाम्बरदानतो वा ।

प्रीणाति मन्त्रैर्निजवासरे च तस्मै नमः श्रीरविनन्दनाय ॥ ५॥

प्रयागकूले यमुनातटे च सरस्वतीपुण्यजले गुहायाम् ।

यो योगिनां ध्यानगतोऽपि सूक्ष्मस्तस्मै नमः श्रीरविनन्दनाय ॥ ६॥

अन्यप्रदेशात्स्वगृहं प्रविष्टस्तदीयवारे स नरः सुखी स्यात् ।

गृहाद् गतो यो न पुनः प्रयाति तस्मै नमः श्रीरविनन्दनाय ॥ ७॥

स्रष्टा स्वयंभूर्भुवनत्रयस्य त्राता हरीशो हरते पिनाकी ।

एकस्त्रिधा ऋग्यजुःसाममूर्तिस्तस्मै नमः श्रीरविनन्दनाय ॥ ८॥

शन्यष्टकं यः प्रयतः प्रभाते नित्यं सुपुत्रैः पशुबान्धवैश्च ।

पठेत्तु सौख्यं भुवि भोगयुक्तः प्राप्नोति निर्वाणपदं तदन्ते ॥ ९॥

कोणस्थः पिङ्गलो बभ्रुः कृष्णो रौद्रोऽन्तको यमः ।

सौरिः शनैश्चरो मन्दः पिप्पलादेन संस्तुतः ॥ १०॥

एतानि दश नामानि प्रातरुत्थाय यः पठेत् ।

शनैश्चरकृता पीडा न कदाचिद्भविष्यति ॥ ११॥

॥ इति श्रीब्रह्माण्डपुराणे श्रीशनैश्चरस्तोत्रं सम्पूर्णम् ॥

Shani Dev Status Marathi

१. “हा शनिदेवाच्या शक्तीचा आशीर्वाद आहे या जगात ज्याने इज्जतीची “दोन वेळची भाकर” खाल्ली तो फार भाग्यवान.”

२. “ते शनीदेवच आहेत जे पुढे जाण्याचा उत्साह देतात ,जेव्हा सगळे आपले साथ सोडतात तेव्हा फक्त शनिदेवच कामी येतो.”

३. “शनिदेव आणि मी दोघेही मोठ्या मनाचे आहोत, तो माझ्या चुका माफ करतो आणि मी त्यांची सेवा करतो. शुभ शनिवार..”

४. ” शनिदेव, तूच माझी काळजी घे. की तुझ्याशिवाय मी जगूच नये आणि मी स्वतःच होऊन जाऊ..”

५. “शनिदेव महाराजांची कृपा तुमच्यावर असो,आणि तुमचे नशीब बद्लो जे तुम्हाला तुमच्या आयुष्यात अजून मिळालेले नाही.”

हे पण वाचा नक्की ⇓⇓

  1.  साईबाबा मराठी स्टेटस
  2. Ganpati Bappa Quotes in Marathi

Leave a Comment