राजमाता जिजाबाई शहाजी भोसले , ज्यांना आपण राजमाता जिजाऊ (माँ साहेब) म्हणून ओळखले जाते, प्रशासक, योद्धा आणि छत्रपती शिवाजी महाराजांची आई होती.
राजमाता जिजाऊ यांचा जन्म १२ जानेवारी, १५९८ रोजी महाराष्ट्रातील सिंदखेडजवळील देऊळगाव येथे झाला. शिवाजी महाराजांवर संस्कार करत असतांना त्यांनी त्यांना कर्तव्याबरोबरच राजनिती देखील शिकवली. न्याय करतांना समान करावा आणि अपराध करणा.याला कठोरात कठोर शासन करतांना देखील तयार असावे हे संस्कार जिजामातेने महाराजांवर बिंबवले.
Rajmata jijau jayanti quotes in marathi | राजमाता जिजाऊ जयंती

जिजाऊ…
ज्यांच्या प्रेरणेने उजळली
स्वराज्यज्योती
याच माऊली ज्यांनी घडवले
श्री शिवछत्रपती
राजमाता जिजाबाईं यांच्या जयंती निमीत्त,लक्ष लक्ष प्रणाम
तुम्ही नसता तर नसते झाले
शिवराय अन शंभू छावा
तुमच्या शिवाय नसता मिळाला
आम्हांला स्वराज्याचा ठेवा
⛳जय जिजाऊ!⛳
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक
छत्रपती शिवाजी महाराजांना
घडवणार्या राजमाता
जिजाऊ यांच्या
जयंती निमित्त मानाचा मुजरा!
jijau jayanti quotes in marathi
महाराष्ट्राच्या मातीमध्ये रोवलेली
पहार काढून ज्या माऊलीने
गुलामगिरीच्या छाताडावर प्रहार केला
त्या थोर ‘राजमाता जिजाऊला’
मानाचा मुजरा !
जय जिजाऊ-जय शिवराय.
राजमाता जिजाबाई
यांच्या जयंती निमित्त
विनम्र अभिवादन!
हिंदवी स्वराज्याची संकल्पना
प्रत्यक्षात साकारण्यासाठी
छत्रपती शिवरायांना ज्ञान, चातुर्य,
चारित्र्य, संघटन व पराक्रम
अशा राजस आणि सत्त्व
गुणांचे बाळकडू देणाऱ्या
राजमाता जिजाऊ यांना
जयंती निमित्त
विनम्र अभिवादन!
jijamata quotes in marathi

थोर तुमचे कर्म जिजाऊ,
उपकार कधी ना फिटणार चंद्र
सूर्य असे पर्यंत
नाव तुमचे न मिटणार.
जय भवानी ! जय शिवाजी !
जय जिजाऊ.
स्वराज्याचा जिने घडविला
विधाता….
धन्य ती स्वराज्य जननी
जिजामाता …
जय भवानी ! जय शिवाजी !
जय जिजाऊ.
तुझ्या धाडसाचे धडे दे आम्हाला..
तुझ्या विचारांचे धडे सोबतीला..
तयांचे शौर्य गाजवु आम्ही..
जिजा माऊली गे तुला वंदितो मी ।
जिजाऊ ची गौरव गाथा
तिच्या चरणी माझा माथा..
स्वराज्यप्रेरिक राजमाता
राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ
यांना विनम्र अभिवादन.
एक उडाली ठिणगी आणि
लाख पेटल्या मशाली
स्वराज्याच्या
संकल्पाची नवी पहाट ही झाली.
एका स्त्रीची जबरदस्त इच्छाशक्ती
जगातल्या ५-५ महाकाय साम्राज्य
उद्वस्थ करू शकते हे
आई जिजाऊंनी
अख्या जगाला दाखवले.
jijau mata quotes in marathi
मुजरा त्या मातेला,
जिने घडविला राजा रयतेचा ।।
गनिमांस तिने नमविला,
वसा स्वराज्याचा चालविला।।
जन्माला तिच्या पोटी,
गुणगान असे रयतेच्या ओठी ।।
तिने दिले शिव आणि छावा,
मिळाला महाराष्ट्रास स्वराज्याचा ठेवा ।।
रचली स्वराज्याची गाथा,
दैवत असे ती राजमाता ।।
तुझ्या पाऊली लीन आम्ही सदाही,
तुझ्या साऊली हीन कोणीही नाही;
नसे दास कोणी नसे राव-स्वामी.
जय भवानी ! जय शिवाजी !
जय जिजाऊ.
जननी मराठा साम्राज्याची,
सारूनी बाजूस राजघराणी.
जनतेच्या साऱ्या न्यायाखातर,
लढा लढविली ही रणरागिणी.
जय भवानी ! जय शिवाजी !
जय जिजाऊ.
jijamata jayanti quotes in marathi

॥जिजाऊ वंदना जिजा माऊली
गे तुला वंदितो मी,
जिजाऊच साक्षात वात्सल्य नामी ॥धृ॥
तुझ्या पाऊली लीन आम्ही सदाही,
तुझ्या साऊली हीन कोणीही नाही;
नसे दास कोणी नसे राव-स्वामी॥
तुझ्या धाडसाचे धडे दे आम्हाला,
तुझ्या पाडसाच्या स्मृती सोबतीला;
तयांच्या सवे गाजवू शौर्य आम्ही ॥
तुझी सावली सर्व काळी असू दे,
कुठे दुःख कोणास काही नसू दे;
नसू दे अनारोग्य अंधार यामी ॥
तुझ्या प्रेरणेने घडो देशसेवा ,
तुझ्या चिंतनाने सुखी काळ जावा;
घडो अंत तो शांत साफल्यगामी ॥
जय जय जिजाऊ.
थोर मातेस विनम्र अभिवंदन.
आपलं आयुष्य जीने स्वराज्याची स्वप्न
पाहण्यात
आणि साकारण्यात खर्च केलं.
जिने ह्या रयतेला एक न्हवे दोन
छत्रपती दिलें
अशा राष्ट्रमाता,राजमाता जिजाऊंच्या
पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.
पेच प्रसंग आला तरी, तुम्ही
डगमगल्या नाही संकटांचा सामना
केला, नुसती चिंता केली नाही.
जय भवानी ! जय शिवाजी !
जय जिजाऊ.
हे पण वाचा:-