2024 Bappa Quotes in Marathi | Bappa Marathi Status Download

बाप्पा या वर्षी आम्ही सगळे वाट बघत आहोत तुमच्या आगमनाची ,मागच्या वर्षी करोना मुळे तुमचं स्वगत नाही कर्ता आल ,पण या वर्षी आम्ही सगळे तुमची अतुरतेने वाट बघत आहोत ,2024 हा आमच्या सगळ्यांसाठी खूप आनंदाचा वर्ष असणार आहे ,कारण आम्हाला तुमचं उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करायचं आहे ,म्हणून आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत 2021 Bappa Quotes in Marathi , Bappa Agaman quotes in marathi , Bappa Visarjan Quotes Marathi वर पूर्ण ब्लॉग लिहिला आहे , हे सगळे स्टेटस तुम्ही share करू शकता ,ब्लॉग पूर्ण वाचा आणि आपल्या प्रतिक्रिया कळवा .

Ganapati Bappa Quotes in Marathi

bappa agaman quotes marathi
bappa agaman quotes marathi

बाप्पा खूप आतुरता लागली आहे तुझ्या आगमनाची ,पूर्ण वर्ष वाट पहिली आता नाही राहवत, तुज्याशी खूप सार्‍या गोष्टी share करायचे आहेत कारण त्याचे solution पण तुझ्याकडे आहे हे माहीत आहे ,हयावर्षी प्रत्येक घरात वेगळी आरास बघ्याला भेटेल कारण thermocol पण बंद झाले आहेत ना ,आम्ही आता तयारी चालू करतो तू आपल्या वेळेनुसार ये जास्त वेळ लावू नकोस .

बाप्पा सगळ्यांच्या आयुष्यात सुख दे आणि त्यानां कुठल्याही परिस्तिथीतून बाहेर पडण्याची शक्ती दे ,
तुला तर सगळं माहीत आहे असतं ना पण जे होईच असतं ते होतच ना ,
तुझ्या येण्याने सगळ्यांच्या घरात आंनद आणि समृद्धी नांदूदे.

स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही
ते तुझ्या चरणाशी आहे.
कितीही मोठी समस्या असुदे बाप्पा
तुझ्या नावातच समाधान आहे.

 बाप्पा एक तूच आहेस जो
सोबत राहायचं प्रॉमिस देत नाही
पण साथ माझी कधी सोडत नाही.
कोणतीही येऊदे समस्या
तो नाही सोडणार आमची साथ
अशा आमच्या गणरायाला नमन
करितो जोडुनी दोन्ही हाथ.
माझं आणि बाप्पाचं खूप छान नातं आहे
जिथे मी जास्त मागत नाही
आणि बाप्पा मला कधी कमी पडू देत नाही.


Ganpati status in marathi

फुलांची सुरुवात कळीपासून होते,
जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते
प्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते,
आणि आपली कामाची सुरुवात
श्री गणेशा पासून होते.
गजानन तू गणनायक.
विघ्नहर्ता तू विघ्नविनाशक…..
तूच भरलासी त्रिभुवनी,
अन उरसी तूच ठायी ठायी….
जन्मची ऐसे हजारो व्हावे,
ठेविण्या मस्तक तूज पायी.
हरिसी विघ्न जणांचे,
असा तू गणांचा राजा
वससी प्रत्येक हृदयी,
असा तू मनांचा राजा
स्वीकार गणराया तुझिया चरणी,
साष्टांग दंडवत माझा…
बाप्पा तू सोबत असतो
म्हणून
संकटाना समोर जाण्याची
ताकद दुप्पट होते.
|| गणपती बाप्पा मोरया ||
जो पर्यंत जिवंत आहे तोपर्यंत
तुज नाव ओठावर असेल आणि
ज्या दिवशी तुज नाव माझ्या ओठावर

नसेल त्यादिवशी बाप्पा मी तुझ्या जवळ असेल…


Bappa Agaman quotes in marathi

Bappa Agaman quotes in marathi
Bappa Agaman quotes in marathi

 

बाप्पा
या वर्षी खऱ्या अर्थाने तुझ्यासोबत बोलायला आणि वेळ घालवायला भेटणार आहे ,
कारण यावर्षी सगळे आपापल्या घरी राहून तुझी पूजा अर्चना करणार आहे ,
तुझी आरास पण सजली आहे आता फक्त तुझ्या येण्याची वाट बघत आहोत ,
मला कोणी येईल नाही येईल ह्याच्याशी काही घेणं देणं नाही फक्त तुझीच वाट बघत आहे ,
हे 5 ते 6 दिवस खूप आनंदाने जाणार आहेत ,लोकांची गर्दी नसेल पण मानतील भावना कधी बदलणार नाही ,लवकर या तुम्ही ….❤️😊

Bappa welcome quotes in marathi
Bappa welcome quotes in marathi

बाप्पा
तुझ्या आगमनाकडे आमचे डोळे लागले आहेत ,
खूप काही गोष्टी सांगायच्या आहेत तुला ,येणारे 5 दिवस आमच्यासाठी खूप आनंदाचे असतील ,
आयुष्यात खूप काही चालू असलं तरी हे 5 दिवास आम्हाला कसलाच विचार पडत नाही तुझ्याशिवाय ,
हे काही दिवस असतात जे आठवून आम्ही आमचा पूर्ण वर्ष आनंदात घालवतो ,बाप्पा लवकर या ,आम्ही आतुरतेने वाट बघत आहोत.

बाप्पा
दरवर्षीसारखी यावर्षीही आम्ही सगळे तुमची आतुरतेने वाट पहात आहोत ,फक्त या वर्षी तुमचे आगमन आणि निरोप तस नाही होणार जस दरवर्षी होईच ,पण म्हणून आमचा उत्साह कमी नाही होणार आहे कारण तूम्ही आमच्या प्रत्येकाचा मनात बसलेला आहात ,तुझ्या दर्शनाची ओढ लागली आहे बाप्पा ,लवकर या तुम्ही ..❤️❤️

बाप्पा तू कधी येशील रे आता तुला बागण्यासाठी आमचेही डोळे असुसलेत
बग जरा वेळ भेटला तर ये लवकर खूप बोलायचं आहे तुझ्याबरोबर जे मागे नाही बोलू शकलो आणि या वेळी थोडी जास्त सुट्टी काढून येना आम्हाला ही बरं वाटलं.

चला उठा आता
बाप्पा च्या आगमनाची तयारी चालू करायची आहे  झोपून नाही चालणार ,
खूप कमी दिवस राहिलेत मग मज्जा ही आपणच करणार आहोत ..✌️

बाप्पाच्या आगमनाने आपल्या जीवनात
भरभरून सुख समृध्दी ऐश्वर्या येवो..
हीच गणरायाकडे प्रार्थना!
गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वाना खूप खूप
शुभेच्छा!
जडलाय तुझ्या नव्या रूपाचा ध्यास”
पूर्ण कर बाप्पा आता भक्तांची आस!!!
आतुरता आगमनाची.
गणपती बाप्पा मोरया.
देव येतोय माझा…
आस लागली तुझ्या दर्शनाची,
तुला डोळे भरून पाहण्याची,
कधी उजाडेल ती सोनेरी पहाट,
गणराया तुझ्या आगमनाची…

Ganesh Chaturthi Wishes in Marathi

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

हे गणराया संपूर्ण भारत देशात आलेल्या
कोरोना सारख्या भयानक रोगापासून
संपूर्ण देशाला मुक्त कर हिच तुझ्या चरणी प्रार्थना..
गणेश चतुर्थी निमित्त सर्वाना
हार्दिक शुभेच्छा

मोदकांचा प्रसाद केला
लाल फुलांचा हार सजवला
मखर नटून तयार झाले
वाजत गाजत बाप्पा आले
गुलाल फुले अक्षता उधळे
बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे…
सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत ,
सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य,शांती,आरोग्य लाभो हीच
बाप्पाच्या चरणी प्रार्थना. ”
गणपती बाप्पा मोरया , मंगलमुर्ती मोरया !!!

बाप्पाच्या येण्याने चैतन्य बहरले
दुःख आणि संकट दूर पळाले
तुझ्या भेटीची आस लागते
तुझ्या नामस्मरणात वर्ष सरून जाते
अखेर गणेश चतुर्थीला भेट घडते…
श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

गणराया तुझ्या येण्याने
सुख, समृध्दी, शांती, आरोग्य लाभले
सर्व संकटाचे निवारण झाले
तुझ्या आशिर्वादाने यश लाभले
असाच आशीर्वाद राहू दे…
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !

फुलांची सुरुवात कळीपासून होते,
जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते
प्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते,
आणि आपली कामाची सुरुवात
श्री गणेशा पासून होते
|| गणपती बाप्पा मोरया ||
|| मंगल मूर्ती मोरया ||

तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता
अवघ्या दिनांचा नाथा
बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे
चरणी ठेवितो माथा.

बाप्पा आला माझ्या दारी
शोभा आली माझ्या घरी
संकट घे देवा तू सामावून
आशीर्वाद दे भरभरुन…
गणपती बाप्पा मोरया,
मंगल मूर्ती मोरया…

नूर गणेशाच्या प्रकाशाला भेटला
प्रत्येकाच्या मनाला धडकी भरते
गणेशाच्या दारावर जे काही जात
त्यांना नक्कीच काहीतरी मिळेल
|| गणपती बाप्पा मोरया ||

गणेशचतुर्थीचा दिवस आहे खास
घरात आहे लंबोदराचा निवास
दहा दिवस आहे आनंदाची रास
अनंत चतुर्थीला मात्र मन होते उदास…
सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला,
व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा!
बुद्धीची देवता असलेला गणपतीराया,
आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी,
आशीर्वाद देवो, अशी त्याच्या चरणी प्रार्थना…
गणपती बाप्पा मोरया!!


Ganpati Quotes in Marathi

श्रावण सरला,

भाद्रपद चतुर्थीची पहाट आली,

सज्ज व्हा फुले उधळायला,

गणाधीशाची स्वारी आली..

किती पाप किती पुण्य,कोणाचे कोणालाच स्मरण नाही .

विरह ही आहे कोठे कोठे,सार्‍यांनाच प्रेमाचे शरण नाही .

सुटेल हा देह एक ना एक दिवस,कोणाच्याच नशिबी अमृताचे धरण नाही .

कळ्यांचं आयुष्य फुलांन पर्यंत मर्यादित,पण काट्याला काही मरण नाही .

आणि प्रत्येक फुलांच्या नशिबी,देवा तुझे चरण नाही.

त्यांनी विचारले :- काय मागितलेस गणपती बाप्पा कडे ?

मी म्हणालो :- काहीच नाही मागितल… जे आजपर्यंत दिले, त्यासाठी आभार मानले

.

 

उत्सव हा मराठ्यांचा, उत्सव हा प्रेमाचा,

सोहळा आहे गणपती आगमनाचा, सुखाचा व समृद्धीचा.

हे गणराया संपूर्ण जगात पसरलेल्या कोरणासारख्या,

भयानक रोगापासून संपूर्ण जगाला, मुक्त कर हीच, तुझ्या चरणी प्रार्थना….

Ganesha Quotes in Marathi

अपराध भक्तांचे, उदरात साठवितो,

लंबोदर हे तुझे, प्रार्थना भक्त करतो,

कीर्ती त्रिभुवनी गाजे, वरदान गजानन देतो,

समाधानी मन होते हे, लंबोदर तू तोषतो.

 

64 कलांचा स्वामी हा भाग्यविधाता,

कलात्मकतेचे दान द्याया आलाय आज विघ्नहर्ता.

ganesha motivational quotes in marathi

बाप्पाच्या रूपात लोकांच्या सेवेसाठी धावलेल्या,

डॉक्टर ,नर्स ,पोलीस यांचे तो आभार मानेल,

मनुष्याचा गर्वहरण झाल,असं समजून,

गालातल्या गालातच हसेल.

 

नाव घेऊनी मोरयाचे मुखी,

मन वाट पाहते फक्त तुझ्या आगमनाचे..


Bappa caption in marathi

तुमच्या आयुष्यातला आनंद,
गणेशाच्या पोटा इतका विशाल असो,
अडचणी उंदरा इतक्या लहान असो,
आयुष्य सोंडे इतके लांब असो,
क्षण मोदका इतके असो..

तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत,
सर्वांना सुख, समृद्धि, ऐश्वर्या, शांती,
आरोग्य लाभो हीच बप्पाच्या चरणी प्रार्थना.”
गणपति बप्पा मोरया, मंगलमुर्ति मोरया..

तुमच्या आयुष्यातला आनंद त्या विद्यनहर्त् याच्या काना इतका विशाल असावा..
अडचणी उंदरा इतक्या लहान असाव्यात…
आयुष्य त्याच्या सोंडे इतके लाब असावे आणी
आयुष्यातले क्षण मोदका प्रमाणे गोड असावेत..

देवाचे आभार आहेत,
कारण त्याने आश्रुंना रंग नाही दिल,
नाहीतर रात्री भिजणारी माझी उशी,
सकाळी सकाळीही सांगून गेली असती..


Bappa Visarjan Quotes Marathi

बाप्पा निघालास तू एवढ्या लवकर थांब थोड्या दिवस ,खूप मज्जा असते तू असतोस तेव्हा खूप आठवण येईल तू गेल्यावर ,आमच्यासाठी एवढा वेळ काढल्याबद्दल धन्यवद,पण एक Promise कर पुढच्या वर्षी लवकर येईला लागेल हा …

बाप्पा निघाले
तुम्ही येता घरी आम्हा वाटे मजा तुम्ही जाऊ नका आम्हा मिळते सजा हे गाणी ऐकल्यावर थोडस का होईना वाईट वाटतं ,
बाप्पा या लवकर आता पुढच्या वर्षी वाट पाहत आहोत आम्ही .❣️

बाप्पा निघाले ,विसर्जनाची तयारी सुरू झाली
डोळे ही झाले ओले पण आनंद ही आहे जल्लोष ही आहे तुझा निरोप घेताना ,
पुढच्या वर्षी लवकर या आणि  आम्हाला परत अशे आनंदाचे क्षण देत रहा ..❣️


बाप्पा निघाले
आज दीड दिवसांचे बाप्पा निघाले ,
बर वाटलं थोडे क्षण का होईना तुमच्यासोबत घालवले थोडं दुःख होईल कारण ह्याच वर्षी हेच काही दिवस होते ज्यांनी आंनद दिला …
पुढच्या वर्षी लवकर या आम्ही वाट बघू 🙏❤️

बाप्पा
सगळ्यांच्या आयुष्यात सुख दे ,त्यांचे जे काही problems असतील त्यात त्यांना सामोर जाण्याची शक्ती दे ,
जे होणार असतं ते होतच पण हा virus लवकर जाऊदे अशी आम्ही सगळे प्रथना करतो ,
त्यांची जी काही परिस्तिथी आहे त्यात त्यांना आनंदी राहण्याची बुद्धी दे आणि त्यांना त्यांच्या स्वप्नांपर्यंत पोहोचवण्याचा मार्ग दाखव …
तुमच्याकडे काय मागायचं बाप्पा ,तुम्हाला तर सगळंच माहीत असतं ,आणि तुम्ही ते न सांगता पण देता,
फक्त आम्ही माणसं तस नाही वागत जस तूम्ही शिकवल आहे नेहेमी सगळ्यांच्या आदर करणे ,सगळ्यांसोबत चांगल वागणं आणि बरच काही …
🙏🙏🙏🙏गणपती बाप्पा मोरया 🙏🙏🙏🙏


Anant Chaturdashi Wishes Marathi |अनंत चतुर्दशी शुभेच्छा

 

ॐ भद्रं कर्णेभि शृणुयाम देवा:।
भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्रा:।।

अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा!

“बाप्पा, माझ्या जिवाभावाच्या माणसांना उदंड आयुष्य दे..
तुझे लक्ष त्यांच्यावर आयुष्यभर असेच राहू दे..
त्या सर्वाना सुखात, आनंदात आणि समाधानात ठेव..
हीच तुझ्या चरणी प्रार्थना”
गणपती बाप्पा मोरया!
पुढच्या वर्षी लवकर या!!
अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!

डोळ्यात आले अश्रू,
बाप्पा आम्हाला नका विसरू..
आनंदमय करून चालले तुम्ही,
पुढल्या वर्षाची वाट पाहू आम्ही..
अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!

आज अनंत चतुर्दशी!
श्री गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना
अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!
आजच्या ह्या मंगलदिनी सर्व
गणेश भक्तांच्या मनातील
सर्व इच्छित मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत,
हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना..
वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ,
निर्विघ्नं कुरुमेदेव, सर्वकार्येषु सर्वदा..
ओम गं गणपतये नमः
गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया,
पुढच्या वर्षी लवकर या..

बाप्पा चालले आपल्या गावाला,
चैन पडेना आमच्या मनाला,
ढोलाच्या तालात
गुलाल रंगात, नेऊया बाप्पाला,
वाजत गाजत नाचत
याहो पुढल्या वर्षाला…
अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!

अनंत चतुर्दशी च्या हार्दिक शुभेच्छा


Sankashti Chaturthi Shubhechha

आज संकष्टी चतुर्थी आजच्या या मंगल दिनी सर्व गणेशभक्तांच्या मनातील सर्व इच्छित मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत, हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना… सर्व भक्तांना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

सजली अवघी धरती, पाहण्यास तुमची कीर्ती.. तुम्ही येणार म्हटल्यावर, नसानसात भरली स्फ़ुर्ती.. आतुरता फक्त आगमनाची, कारण चतुर्थी आमच्या गणेशाची… || गणपती बाप्पा मोरया || || मंगल मूर्ती मोरया ||संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा

आज संकष्ट चतुर्थी श्री गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.. आजच्या ह्या मंगलदिनी सर्व गणेशभक्तांच्या मनातील सर्व ईच्छित मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत, हिच गणरायाच्या चरणी प्रार्थना

या संकष्टी चतुर्थी आपल्या जीवनात आनंद आणू शकतात. द्वेष आपल्या जीवनापासून दूर आहे. आपल्या हृदयात प्रेमासह आणि इतरांसाठी शुभेच्छा असलेल्या सणांचा आनंद घ्या


Ganpati Bappa Invitation Messages in Marathi

Leave a Comment