2023 मराठी उखाणे नवरा-नवरी साठी | Navra-Navri Marathi Ukhane

नवरा-नवरी साठी मराठी उखाणे

आजच्या पिढीला नक्की आवडेल असा नवनवीन, मजेशीर, लग्न तसेच इतर खास दिवसांसाठीच्या Marathi Ukhane मराठी उखाण्यांचा बहारदार नजराणा. नव्या-जुन्या पिढीला आवडतील अशा लग्न तसेच अन्य शुभकार्यांसाठीच्या आणि महत्वाचं म्हणजे लक्षात ठेवण्यास सोप्या अशा मराठी उखाण्यांचा मजेशीर संग्रह एकदा तरी नक्की वाचा. 100+ मराठी उखाणे नवरदेव, नवरीसाठी आपल्या मराठी मध्ये.

Navra-Navri Marathi Ukhane
Navra-Navri Marathi Ukhane
 1. आतून मऊ पण बाहेर काटेरी साल.
  …दिसले खडूस तरी, मन मात्र विशाल.
 2. अलिकडे अमेरिका, पलिकडे अमेरिका,
  नाव घ्यायला सांगू नका मी आहे कुमारीका.
 3. संसाराच्या सागरात प्रेमाच्या लाटा
  …रावांच्या सुखदुःखात, माझा अर्धा वाटा.
 4. सासरची छाया, माहेरची माया.
  …आहेत, माझे सर्व हट्ट पुरवाया.
 5. नाव घ्या नाव घ्या हा काय कायदा,
  रावाच नाव मी घेईल तुमचा काय फायदा.
 6. आग्रहाखातर नाव घेते, आशीर्वाद द्यावा,
  …रावांचा सहवास, आयुष्यभर लाभावा.
 7. आई ने केले संस्कार, बाबांनी केले सक्षम.
  …सोबत असताना, संसाराचा पाया होईल भक्कम.

नवरदेवासाठी मराठी उखाणे|Marathi Ukhane for Male

Marathi Ukhane for Male
Marathi Ukhane for Male
 1. गाण्यांच्या सुराला तबल्याची साथ
  सौ …… ने दिला मला प्रेमाचा हात !!!!!
 2. चंदनाच्या झाडाला नागिणीचा वेढा
  सौ…..चा आणि माझा जन्मोजन्माचा जोडा !!!!!
 3. चंद्र आहे चांदणीच्या संगती
  आणि ….. आहे माझी जीवनसाथी
 4. चंद्राला पाहून भरती येते सागराला
  ….. ची जोडी मिळाली माझ्या जीवनाला
 5. जन्म दिला मातेने पालन केले पित्याने
  ……. च्या गळ्यात मंगळसुत्र बांधतो प्रेमाने.
 6. जाईच्या वेलीला आलाय बहार,
  …..ला घालतो २७ मे ला हार.
 7. जाईजुईचा वेल पसरला दाट
  …बरोबर बांधली जिवनाची गाठ.
 8. जाईजुईच्या फुलांचा दरवळला सुगंध
  ….. च्या सहवासात झालो मी धुंद.
 9. जीवनरूपी सागरात सुखदु:खाच्या लाटा
  सुखी संसारात सौ….. चा अर्धा वाटा !!!!!
 10. जुईच्या वेलीवर लागली सुगंधी नाजुक फुले,
  …. नी दिली मला दोन गोड मुले.
 11. झुळझुळ वाहे वारा, मंद चाले होडी,
  आयुष्यभर सोबत राहो ………. – ………. ची जोडी.
 12. तडजोड हा मंत्र आहे दोन पिढ्यांना जोडणारा पूल
  …ना आवडते गावठी गुलाबाचे फुल.
 13. ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल
  …………. चे नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल.
 14. दवबिंदूच्या थेंबाने चमकतो फुलांचा रंग
  सुखी आहे संसारात सौ ….. च्या संग !!!!!
 15. दासांचा दासबोध आहे अनुभवाचा साठा
  ….चे नाव घेतो तुमचा मान मोठा !!!!!
 16. दुधाचे केले दहि, दह्याचे केले ताक, ताकाचा केला मठ्ठा,
  …… चे नाव घेतो ….. रावान् चा पठ्ठा.
 17. दुर्वाची जुडी वाहतो गजाननाला
  सौ…..सारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला !!!!!
 18. देवब्राम्हण अग्नीसाक्षीने घेतले मी सात फेरे,
  …. चे व माझे जुळले जन्मोजन्मीचे फेरे.
 19. देवळाला खरी शोभा कळसा ने येते
  ….. मुळे माझे गृहसौख्य दुणावते.
 20. देवा जवळ करतो मी दत्ताची आरती
  …. माझ्या जीवनाची साराथी
 21. देवाच्या देव्हाऱ्यात फुलांना प्रथम स्थान
  सौ…..ने दिला मला पतिराजांचा मान !!!!!
 22. देवाला भक्त करतो मनोभावे वंदन
  …. मुळे झाले संसाराचे नंदन.
 23. दोन जीवांचे मीलन जणु शतजन्माच्या गाठी,
  …..चे नाव घेतो तुमच्या आग्रहासाठी.
 24. दोन शिंपले एक मोती, दोन वाती एक ज्योती
  माझी आणि सौ…..ची अखंड राहो प्रीती !!!!!
 25. हा दिवस आहे आमच्या करिता खास,
  …..ला देतो गुलाब जामुन चा घास.
 26. जुईच्या वेलीवर लागली सुगंधी नाजुक फुले,
  …. नी दिली मला दोन गोड मुले.
 27. झुळझुळ वाहे वारा, मंद चाले होडी,
  आयुष्यभर सोबत राहो ………. – ………. ची जोडी.
 28. तडजोड हा मंत्र आहे दोन पिढ्यांना जोडणारा पूल
  …ना आवडते गावठी गुलाबाचे फुल.
 29. ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल
  …………. चे नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल.
 30. दवबिंदूच्या थेंबाने चमकतो फुलांचा रंग
  सुखी आहे संसारात सौ ….. च्या संग !!!!!
 31. दासांचा दासबोध आहे अनुभवाचा साठा
  ….चे नाव घेतो तुमचा मान मोठा !!!!!
 32. दुधाचे केले दहि, दह्याचे केले ताक, ताकाचा केला मठ्ठा,
  …… चे नाव घेतो ….. रावान् चा पठ्ठा.
 33. दुर्वाची जुडी वाहतो गजाननाला
  सौ…..सारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला !!!!!
 34. देवब्राम्हण अग्नीसाक्षीने घेतले मी सात फेरे,
  …. चे व माझे जुळले जन्मोजन्मीचे फेरे.
 35. देवळाला खरी शोभा कळसा ने येते
  ….. मुळे माझे गृहसौख्य दुणावते.
 36. देवा जवळ करतो मी दत्ताची आरती
  …. माझ्या जीवनाची साराथी
 37. देवाच्या देव्हाऱ्यात फुलांना प्रथम स्थान
  सौ…..ने दिला मला पतिराजांचा मान !!!!!
 38. देवाला भक्त करतो मनोभावे वंदन
  …. मुळे झाले संसाराचे नंदन.
 39. दोन जीवांचे मीलन जणु शतजन्माच्या गाठी,
  …..चे नाव घेतो तुमच्या आग्रहासाठी.
 40. दोन शिंपले एक मोती, दोन वाती एक ज्योती
  माझी आणि सौ…..ची अखंड राहो प्रीती !!!!!
 41. हा दिवस आहे आमच्या करिता खास,
  …..ला देतो गुलाब जामुन चा घास.
 42. अंधश्रद्धेचा पाश करी स्त्रियांचा नाश,
  सौ….चे नाव घेतो तुमच्यासाठी खास !!!!!
 43.  अग़ अग़ ….. खिडकी वर आला बघ काउ,
  घास भरवतो जलेबीचा, बोट नको चाउ.

Marathi Ukhane For Female | नवरीचे उखाणे

Marathi Ukhane For Female
Marathi Ukhane For Female
 1. उंबरठ्यावरील माप देते सुखी जीवनाची चाहूल,
  …. रावांच्या जीवनात टाकते मी आज पहिले पाऊल
 2. मंगळसूत्राच्या दोन वाट्या म्हणजे सासर-माहेरची खूण,
  …. रावांचे नाव घेते …. ची मी सून
 3. आकाशाच्या प्रागंणात ब्रम्हा, विष्णू आणि महेश,
  …… रावांचे नाव घेऊन करते मी गृहप्रवेश
 4. नव्या आयुष्याची, नवी नवी गाणी,
  …. च्या घराण्यात … रावांची झाले महाराणी
 5. सीते सारखे चारित्र्य, रामा सारखे रूप,
  ….. राव मला मिळाले आहेत ते अनुरूप
 6. हिरव्या साडीला पिवळा काठ जरतारी,
  …. रावांचे नाव घेते शालू नेसून भरजरी
 7. सासरचे निरंजन, माहेरची फुलवात,,
  …. रावांचे नाव घेण्यास करते आज सुरुवात
 8. गुलाबाच्या फुला पेक्षा नाजूक दिसतेय शेवंती,
  …. रावांनी सुखी रहावे हि परमेश्वराला विनंती
 9. जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने,
  ….. रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने
 10. माहेर सोडताना, पाऊल होतात कष्टी,
  …. रावांच्या संसारात, करीन सुखाची वृष्टी
 11. लग्नाच्या पंगतीत, घेतला उखाणा खास,
  आणि …. रावांच्या घशात अडकला घास
 12. लग्नात लागतात हार आणि तुरे,
  …. रावांचे नाव घेण्याचा आग्रह आता पुरे
 13. बारिक मणी घरभर पसरले,
  ….. रावांसाठी माहेर विसरले
 14. चांदीच्या ताटात अगरबत्तिचा पुडा,
  ….. रावांच्या नावाने भरला हिरवा चुडा
 15. एक दिवा दोन वाती, एक शिंपला दोन मोती,
  अशीच राहु दे माझी व ….. रावांची प्रेम ज्योती
 16. सौभाग्याचे काळे मणी घातले गळा,
  ….. रावांच्या नावाने लावीते कपाळी लाल टीळा
 17. गळ्यातील मंगळसूत्र, मंगल सुतात डोरले,
  ….. रावांचे नाव माझ्या हृदयात कोरले
 18. पिवळा पितांबर श्रीकृष्णाच्या अंगावर घातला,
  ….. रावांच्या जीवनासाठी स्त्री जन्म घेतला
 19. मंगलदेवी, मंगलमाता वंदन करते तुला,
  ….. रावांचे नाव घेते अखंड सौभाग्य दे मला
 20. सुशिक्षित घराण्यात जन्मले, कुलवंत घराण्यात आले,
  ….. रावांशी लग्न करून सौभाग्यवती झाले
 21. मान्सूनचे आगमन, पर्जन्याची चाहूल,
  ….. रावांचे नाव घेते, टाकते मी पहिले पाऊल
 22. ज्योत दिव्याची मंद तेवते देवापाशी,
  …..रावांचे नाव घेते …..च्या दिवशी
 23. मंगळसूत्राच्या दोन वाट्यात सासर-माहेरचा संगम,
  ….. रावांच्या सहवासात माझ्या आनंदाचा उगम
 24. सप्तपदीचे सात पाऊले म्हणजे सात जन्माची ठरावी,
  ….. रावांच्या बरोबर मी जन्मोजन्मी असावी
 25. रुसलेल्या राधेला म्हणतो कृष्ण हास,
  ——— रावांना भरविते मी प्रेमाचा घास
 26. तेलाच्या दिव्याला तुपाची वात,
  ——रावांचे नाव घेऊन करते संसाराला सुरवात
 27. हजार रुपये ठेवले चांदीच्या वाटीत
  —— रावांचे नाव घेते लग्नाच्या वरातीत
 28. एका वाफ्यातील तुळस, दुसऱ्या वाफ्यात रुजली,
  —— रावांची सारी माणसे मी आपली मानली
 29. सोन्याच्या अंगठी वर प्रेमाची खुण,
  —— रावांचे नाव घेते —— ची सून
 30. काढ्यात काढा पाटणकर काढा,
  —— रावांचे नाव घेते सगळ्यांनी शंभर शंभर रुपये काढा
 31. अबोलीच्या फुलांचा गंध काही कळेना,
  ——– रावांचे नाव घ्यायला शब्द पुरेना
 32. सासूबाई माझ्या प्रेमळ, जाऊबाई आहेत हौशी,
  ——- रावांच नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी
 33. देवांमध्ये श्रेष्ठ ब्रम्हा, विष्णू, महेश
  —– रावांच नाव घेऊन करते गृहप्रवेश
 34. अनेकांनी लिहिली काव्ये, गायली सौंदर्याची महती,
  काल होते मी युवती, आज झाले ——- रावांची सौभाग्यवती
 35. झाले सत्यनारायण पूजन, कृपा असो लक्ष्मी नारायणाची,
  —– राव सुखी रावो हीच आस मनाची
 36. सासरचे निरांजण, माहेरची फुलवात,
  —— रावांसोबत करते नवीन आयुष्याची सुरवात
 37. जाईजुईच्या फुलांचा दरवळतो सुगंध,
  —— रावांनी आणला माझ्या जीवनात आनंद
 38. शिवाजी महाराजांना जन्म देणारी धन्य जिजाऊमाता,
  —— रावांचे नाव घेते आपल्या शब्दा करिता
 39. सासरच्या कौतुकात राहील नाही काळाच भान,
  —— रावांचे नाव घेते राखून सर्वांचा मान
 40. प्राजक्ताच्या फुलांनी भरले अंगण,
  —— रावांचे नाव घेऊन सोडले काकण
 41. आजच्या सोहोळ्यात थाट केलाय खास,
  ——रावांना भरविते जिलेबिचा घास
 42. मंगळसुत्रातील दोन वाटया सासर आणि माहेर,
  —— रावांनी दिला सौभाग्याचा आहेर
 43. इन्द्रधनुष्य दिसतो, जेव्हा असतं पावसात ऊन,
  —— रावांचे नाव घेते—— ची मी सुन
 44. सोन्याची अंगठी रुप्याचे पैंजण,
  ——रावांचे नाव घेते ऐका सारेजण
 45. लग्नाच्या पंगतीत केलीय फुलांची आरास,
  ——रावांचे नाव घेण्यास आजपासुन करते सुरवात
 46. मनाच्या वृन्दावनात भावनेची तुळस,
  ——रावांचा संसार हा सुखाचा कळस
 47. आकाशाच्या अंगणात चंद्राची रोहिणीला लागली चाहूल,
  —— रावांच्या जोडीने संसारात टाकते पाऊल
 48. मानसरोवरात राजहंस मोती भक्षी,
  ——राव आणि माझ्या विवाहाला अग्निनारायण साक्षी
 49. मटणाचा रस्सा केला वाटण घालून घोटून,
  —- राव बसले रुसून मग मीच खाल्ला चाटून पुसून
 50. ॐ नमोजी आद्या ने ज्ञानेश्वरीची होते सुरुवात,
  ….. राव आणि माझी जोडी ठेव सुखात
 51. वाऱ्यासंगे ताऱ्यासंगे छेडीत जातो छंद मनाचा,
  ….. रावांसंगे हात गुंफून मार्ग चालते नवजीवनाचा
 52. शुभ्र फुलांच्या मखमळीवर शुभमंगल झाले,
  ….. रावांची मी छाया होऊन सप्तपदी चालले
 53. विवाहाला अग्निनारायाणाची असते साक्ष,
  ….. रावांच्या संसारात मी राहीन सदैव दक्ष
 54. शंकरासारखा पिता, अन गिरिजॆसारखी माता,
  ….. रावांसारखा पती मिळून स्वर्ग आला हाता
 55. जीवनाच्या सागरात सप्तरंगी पूल विचारांचा,
  ….. रावांच्या सह संसार, करीन मी सुखाचा
 56. गोकुळाच्या कुंजवनात श्रीकृष्ण वाजवतो बासरी,
  ….. रावांचे नाव घेऊन निघाले मी सासरी
 57. सासुरवाशीन मुलीने राखावा थोऱ्यामोठ्यांचा मान,
  ….. रावांना कन्या केली माझ्या आईवडिलांनी दान
 58. संगमरवरी देवळात बसवली रामाची मूर्ती,
  ….. रावांशी लग्न झाले, झाली माझी इच्छापूर्ती
 59. यमुनेच्या प्रवाहात ताजमहालाचे पडते प्रतिबिंब,
  ….. रावांचे नाव घेण्यास, करत नाही विलंब
 60. भोळ्या शंकराला बेलाची आवड,
  ….. रावांची पती म्हणून केली मी निवड
 61. रुप्याची साडी, तिला सोन्याचा गिलावा,
  ….. रावां सारखा नवरा मला जन्मोजन्मी मिळावा
 62. रुसलेल्या ज्योतीला पवन म्हणतो हास,
  …. रावांना भरवते मी श्रीखंड-पुरीचा घास
 63. एक तीळ सातजण खाई,
  …. रावांना जन्म देणारी धन्य ती आई’

हे पण वाचा :-

 1. Motivational Quotes Images in Marathi
 2. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा फोटो फ्रेम 

Leave a Comment