COPY TEXT

जग तुम्हाला नावे ठेवण्यात व्यस्त असते, तुम्ही नाव कमविण्यात व्यस्त रहा.

काही गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात करून दाखवायच्या असतात.

आपल्या नियतीचे मालक बना पण परिस्थितीचे गुलाम बनू नका.

आरामात जीवन जगायचे असेल तर ऐकून घ्या, पाहून घ्या. व्यर्थ बडबड करु नका.

मूर्ख माणसे आपापसात संभाषण करू लागली की शहाण्या माणसाने मौन धारण करणे योग्य.

असत्य हे अपंग प्राण्याप्रमाणे असते, दुसऱ्याच्या आधाराशिवाय ते कधीच उभे राहू शकत नाही.

काही बदलायचं असेल तर सर्वात आधी स्वत:ला बदला.

शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम.

जगात सारी सोंगे करता येतात, पण पैशाच सोंग करता येत नाही.