फाल्गुन पौर्णिमेनंतर वसंतोत्सवाला वा वसंत ऋतूला सुरुवात होते. या ऋतूला  वेगळा आनंदोत्सव रंग होळीमुळे आहे. यंदा २०२२ मध्ये १७ मार्च रोजी होळी असून १८ मार्च रोजी धुलीवंदन साजरा केला जाईल.

होळी सण उत्तर भारतामध्ये विशेष उत्साहाने साजरा केला जातो. या सणाला 'होळी  पौर्णिमा' असेही संबोधले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव  म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची स्थाननिहाय विभागणी होते.

कोकणात विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात शिमगा सण मोठ्या प्रमाणात साजरा होतो.  प्रथेप्रमाणे फाल्गुन पौर्णिमेला होळीचा मुख्य दिवस असतो. कोकणात हा सण  सुमारे १५ दिवस साजरा केला जातो.

कोकणात काही ठिकाणी पौर्णिमेच्या रात्री होम केला जातो, तर काही ठिकाणी  पौर्णिमायुक्त प्रतिपदेला होम केला जातो; याला 'भद्रेचा होम' असे म्हणतात.

आगीतून पलायन, नारळ जिंकणे अशा स्पर्धा आजही शिमगा उत्सवात भरवल्या जातात.  होळीच्या दिवसात 'जती'च्या रूपात गायनाचा कार्यक्रम चालतो. धुलिवंदनाच्या  दिवशी ओल्या मातीत लोळण घेण्याची प्रथा आजच्या काळातही सुरू आहे.

शिमगा उत्सवात नृत्याचे सादरीकरण हमखास केले जाते. वेगवेगळी सोंगे धारण करून कलाकार लोकांचे मनोरंजन करताना दिसतात.

लोकनृत्याला गीताची आणि वाद्यवादनाची पूरक साथ असते. पारंपरिक वेशभूषा करून ही नृत्ये सादर केली जातात.

होळीच्या हार्दिक शुभेच्छा msg वाचा खाली