भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव

भारत सरकारने भारताच्या स्वातंत्र्य दिवसाचा ७५वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा  करण्याचा आणि स्वातंत्र्यसैनिकांना श्रद्धांजली वाहण्याचा निर्णय घेतला.

यानिमत्त देशभरात विविध कार्यक्रम करण्याचे ठरवले आहे. हा महोत्सव १२  मार्च २०२२ रोजी सुरू झाला असून १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत साजरा केला जाईल.

औपचारिकप्रथेप्रमाणे भारताचे पंतप्रधान दिल्लीतील लाल किल्ल्यावरून भारतीय ध्वज फडकवतील आणि त्यानंतर भाषण देतील.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्यदिनाच्या आधी  शाळा आणि महाविद्यालये यांच्या माध्यमातून विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात  येत आहे.

भारत सरकारने हर घर तिरंगा (प्रत्येक घरात तिरंगा) ही मोहीम देखील सुरू  केली आहे. यात प्रत्येक घरामध्ये ₹२५ च्या अनुदान दराने २०x३० इंच आकाराचा  राष्ट्रध्वज वितरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

प्रत्येकाने आपल्या घरात अथवा कार्यालयात, संस्थेत १३ ते १५ ऑगस्ट २०२२ या  काळात भारताचा राष्ट्रध्वज फडकवत ठेवणे असे या अभियानाचे स्वरूप आहे.

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा साठी खाली दाबा