Wishes Quotes

Vat Purnima Wishes in Marathi | वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

ज्येष्ठ पौर्णिमा अर्थात वटपौर्णिमा हा सण खास सुवासिनींसाठी असतो. पावसाळा सुरू झाल्यानंतर येणारा पहिलाच सण म्हणजे वटपौर्णमा. महाराष्ट्रीयन महिलांसाठी तर हा दिवस अगदीच खास असतो. अनेक ठिकाणी हा सण साजरा करण्यात येतो. पतीच्या दीर्घायुष्यासाठी पत्नी हा उपवास करते आणि वडाची पूजा करून सात जन्मासाठी हाच नवरा मिळावा ही प्रार्थना करते. आता सोशल मीडिया प्रस्थही खूपच वाढले आहे. वटपौर्णिमेचे फोटो शेअर करणे आणि वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा (Vat Purnima Wishes In Marathi) देणे हादेखील एक अविभाज्य भाग बनला आहे. वटपौर्णिमेची संपूर्ण माहिती असल्यास शुभेच्छा संदेश कसे  द्यावे हे या लेखात आहे.

Vat Purnima Wishes in Marathi | वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

vat purnima wishes in marathi
vat purnima wishes in marathi

हा व्रत आमच्या सुखी सवसारासाठी,

माझ्या नवऱ्याच्या सुखी जीवनासाठी,

आमच्यातील नात अजून घट्ट व्हावं ह्या साठी,

आमच्या लग्नाची वचनं खरी करण्यासाठी,

आम्ही घेतलेल्या फेऱ्यांची पुरतता करण्यासाठी…

 


वटपौर्णिमा
पहिली फेरी- मला हाच नवरा सात जन्म मिळो,
दुसरी फेरी- आमची जोडी अशीच सुखात आणि आनंदने राहो,
तिसरी फेरी- याचं माझ्यावर असलेलं प्रेम असच वाढत जावो,
चवथी फेरी – यांच्या सगळे इच्छा पूर्ण कर त्यांना कुठलीच कमी पडू देऊ नको,
पाचवी फेरी – जीवनाच्या प्रत्येक पावलावर आम्ही दोघे सोबत असू,
सहावी फेरी – प्रत्येक सुख दुःखात आम्ही एकमेकांना सांभाळून घेऊ,
सातवी फेरी- आमच्या या सुखी सवसारला कोणाचीच नजर ना लागो,
आठवी फेरी – मला प्रत्येक जन्मी हाच नवरा मिळो अशी देवाकडे प्रथाने करते,
नववी फेरी – एक बायको म्हणून माझे जे काही कर्तव्य असतील ते मी पूर्णपणे पार पाडेन,
दहावी फेरी – आमचा सवसार असच अजून अजून फुलत जावो अशी प्रार्थना करते ..
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा


मला सात जन्म हीच बायको मिळो
आमची जोडी अशीच हसत आणि आनंदात राहो
आमच्या ह्या सवसारला कोणाचीच नजर ना लागो ,वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा


वटपौर्णिमा फक्त हाच नवरा मिळावा म्हणून नसते
तर ती लग्नातील सात फेऱ्यांच्या वेळी घेतलेली वचनांची पावती आहे जी आम्ही दोघे निभावत आहोत ,वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा


सण सौभाग्याचा, बंध हा अतूट नात्याचा
या मंगलदिनी पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा


या वडाच्या झाडाइतका दीर्घायुषी असावास तू,
जन्मोजन्मी माझा आणि माझाच असवास तू…वटसावित्रीच्या हार्दिक शुभेच्छा


वडाच्या झाडाइतकं दीर्घायुष्य मिळो तुला, जन्मोजन्मी तुझा सहवास लाभो मला – वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा


मराठी संस्कृतीची प्रतिमा
सावित्रीच्या निष्ठेचे दर्पण
बांधूनी नात्याचे बंधन
करेन साता जन्माचे समर्पण – वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा


एक फेरा आरोग्यासाठी, एक फेरा प्रेमासाठी, एक फेरा यशासाठी
एक फेरा दीर्घायुष्यासाठी, एक फेरा तुझ्या माझ्या अतूट सुंदर नात्यासाठी
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा


सप्तजन्मीचे सात वचन, साथ देणार तुला कायम
वटपौर्णिमेच्या दिवशी व्रत करून, फक्त तुझ्या प्रेमाची ओढ कायम,वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा


वटसावित्री पूजेच्या हार्दिक शुभेच्छा! हाच जन्म नव्हे तर प्रत्येक जन्मी तुम्हाला तुमच्या मनासारखा जोडीदार मिळावा हीच सदिच्छा,वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा


कुंकवाचा साज असाच कायम राहू द्या, धन्याला मिळू द्या दीर्घायुष्य…वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा


मंगळसूत्र करून देते आठवण दिलेल्या वचनांची, पाळेन मी सात जन्म आणि देईन तुला साथ…वटपौर्णिमेच्या हार्दिक आणि मनःपूर्वक शुभेच्छा

साथ जन्माच ग माझ ,तुझ सौभाग्याच लेण

जन्मोजन्मी घालीन, वटवृक्षाला गुंफण

-अस्मिता पाटील

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *