मराठी प्रेरणादायी भाषण(लेख) | Motivational Speech in Marathi

motivational speech in marathi written

दिवसाला 24 तास असतात त्यातील आपण कितीही ठरवलं तरी जास्तीत जास्त 3 ते 4 तास आपण लोकांसोबत बोलतो मग ते कोणीही असुदे ,त्यानंतर काय ??

त्यातील 90 % वेळ हा आपल्याला स्वतःसोबत घालवायचा असतो आणि तेच खूप कठीण असतं कारण आपल्याला सगळ्यांसाठी वेळ असतो पण जेव्हा आपल्याला स्वतःसोबत वेळ घालवायचा असतो तेव्हा आपण कारणं देत बसतो ,

स्वतःला busy ठेवतो ,त्यात जे आपल्याला नाही आवडत ते करतो आणि ती गोष्ट ignore करतो पण अस तुम्ही कितीवेळ करणार आहात थोड्या वेळ फक्त …

जेव्हा तुम्हाला स्वतःसोबत घालवलेल्या वेळेचा कंटाळा येणार नाही ना तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थानि strong व्हाल

कारण तुम्हाला माहीत आहे की जर आपण एकटे बसलो तर ते वाईट विचार येतात डोक्यात पण त्यांनाच तर काढून टाकायचं आहे ना ,त्यालाच तर mentally strong होणं बोलतात ..

आणि ते कसं करायचं ते बघू,
पहिले तर हा विचार करा की प्रत्येक दिवस हा शेवटचा दिवस आहे तुमच्या आयुष्यातील ,

जर अस तुम्ही विचार केलात तर तुम्हाला कसलाच tension राहणार नाही ,कुठल stress रहाणार नाही ,तुम्ही उद्याच विचार करणं सोडून द्याल ,जे तुम्हाला करायचं होतं ते करायला घ्याल ,

त्या गोष्टी कराल ज्या तुम्हाला आवडतात ,
आणि बघा मग तुम्हाला तुमचं आयुष्य किती सोपं वाटायला लागेल ते ,कारण जर आपणच नसू तर मग बाकीच्या गोष्टीना काहीच महत्व रहानारच नाही …

पण हे तुम्हाला ठरवायला लागेल ,नसेल जमत तर जमावव लागेल ,आपला mindset बदलावा लागेल , रोज रोज तेच तेच करणं सोडावं लागेल ,आणि अस आयुष्य जगून बघावं लागेल ..

तुमचा स्वतःला कधीच कंटाळा येणार नाही ,करून बघा हे 2 ते 3 महिने तरी आणि मग मला सांगा ..❤️


मराठी प्रेरणादायी लेख

marathi motivational lekh
marathi motivational lekh

कधी कधी तुम्ही खूप मेहनत कराल ,जीव तोडून काम कराल ,
पण त्याच फळ मिळणार नाही ,म्हणून सगळं सोडून नाही देयच कारण त्याच्या फक्त एक पाऊल पुढे कदाचित त्याच उत्तर किंवा यश लपलेलं असेल …

जीवनात सगळ्याच गोष्टी वाईट घडत असतील ,एकही गोष्ट आपल्याला पाहिजे तशी होत नसेल ,तर रडत नाही बसायचं ,

कदाचित तुमच्या काम करण्याची पद्धत चुकीची असू शकते ,
फक्त तेव्हा एकच गोष्ट लक्षात ठेवा जर बाकीचे करू शकतात तर मी का नाही ..❤️

जेव्हा खूप लोक तुम्हाला फसवतील ,धोक देतील ,
आपल्यासोबत वाईट वागतील ,तेव्हा आपण स्वतःलाच कोसत बसू की ,नेहमी मीच का ,माझ्यासोबतच अस का होत नेहमी ,

मीच एवढा unlucy कसा आहे ,तर तस काही नसतं फक्त ती वेळ तशी असते ,तेव्हा थोडा वेळ द्या स्वतःला सावरायला ,कोणी कुठे पळून जात नसतात सगळे असतात आपल्यासोबत जास्त करून आई-बाबा…

एक वेळ येते जेव्हा आपल्याला नाही कळत की आपण काय करतोय ,आपल्याला काय करायचं ,आपण हे का करतोय ,
पण तेव्हा ते काम करत रहा ,कारण तेच तुम्हाला नवीन संधी देत रहातील किंवा ते करताना तुम्ही काहीतरी नवीन शोध लावू शकता जे तुम्हाला आवडतं ..❤️
.
कधी कधी वाटेल की सगळं सोडून कुठंतरी निघून जावं ,वाईट विचार येतील डोक्यात की स्वतःला संपवाव ,

कोणालातरी फसवाव जस लोकांनी आपल्याला फसवलं ,पण ते फक्त त्या situation वरची तुमची reaction असते ,

म्हणून emotions ला कधी आपल्या विरुद्ध वागून देऊ नका ,कितीही काही झालं तरी कारण तुम्ही असला तर सगळं आहे ..


आसतात आशे काही दिवस

marathi motivational lekh
marathi motivational lekh

सुरवातीला हवी हवीशी वाटणारी माणसं नंतर तेच त्यांच्या तिरस्कार करायला लागतात …
सगळं चांगल चालू असताना अचानक अशी काही वादळं येतात जे सगळं उध्वस्त करून टाकतात आयुष्याला …

उत्साहाने भरलेल्या स्वप्नात अचानक सगळं तुटल्यासारखं वाटतं .
सगळ्यांसोबत हसत असताना काही दिवस अशे येतात जेव्हा एकटं रहावस वाटतं जिथे कोणी नसेल सोबत …

प्रेमाचा दुनियेत जगत असणारे लोक काही दिवसात प्रेमाचं नाव सुद्धा ऐकल्यावर रागावून जातात …

आयुष्य पुढे जात असताना अचानक आपल्याला आयुष्यात नक्की जे करायचं आहे ते सोडून आपण वेगळाच मार्ग निवडतो …
नेहमी positive विचार करणारे आपण अचानक सगळं जग negative वाटायला लागतं …
तुम्ही बोलाल यार हा एवढा negative कसा बोलायला लागला अचानक ,

तर कस आहेना आपण कितीही positive असलो तरी अशे काही दिवस येतात आपल्या आयुष्यात जे आपल्याला negative विचार करायला भाग पडतात जरी आपण खूप positive असलो तरीही ,

पण ठीक आहे यार त्या दिवसात आपल्याला वाटतं की आपले दुःख किंवा problems कोणासोबत तरी share करावे कारण emotions जास्त वेळ साठवून नाही ठेवता येत ,ते कधीतरी बाहेर पडतातच,

असतात अशे काही दिवस जेव्हा आपण स्वतःवरच doubt घेईला लागतो ,कारण ते आपल्या आयुष्याचा एक भागच आहेत रे आणि ते सगळ्यांसोबत होत असतं अधून मधून .

म्हणून फक्त माझ्यासोबतच अस होत का ? अस विचार करू नका ,एक phase असतो त्याचा पण आणि तुम्हाला त्यातून जावच लागतंच त्याला काही option नसतं …

मग तुम्ही बोलाल यातून बाहेर कस पडायचं तर त्याला पण वेळ जाऊन दयावा लागतो यार ,अस लगेच काही होत नाही ,

कारण depression मध्ये जाईला वेळ लागत नाही पण त्यातून बाहेर पडायला लागतो त्याच हेच कारण आहे आणि त्यासोबत तुमचं surrounding कस आहे ,

तुमचा mindset कस आहे त्यावर पण खूप depend असतं तुम्ही त्यातून तुम्ही किती लवकर बाहेर येता ते …

मी हे सांगितलं कारण आपल्या सगळ्यांना life मध्ये ह्या phase मधून जावं लागतं ,मग भलेही तो phase आता नसेल पण तो असतोच यार …


सगळं संपलं -मराठी लेख

marathi motivational quotes
marathi motivational quotes

ज्या दिवशी अशी feeling येईल ना ,किंवा तुमच्यासोबत कोणी नसेल ,तुम्ही एकटे पडाल आणि हार मानाल तो दिवस खूप कठीण असतो कारण तेव्हा आपण पूर्णपणे हारललो असतो ,

कसलीच उमेद रहात नाही ,सगळ्या गोष्टी चुकीच्या होताना दिसत असतात, खूप depression मध्ये गेलेलो असतो कुठूनच मार्ग दिसत नाही ,

काय करावं काही सुचत नाही ,आता बस झालं आता नाही होणार माझ्याकडून ,मी हार मानली आहे ….

तो दिवस आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात येणार आहे तेव्हा काहीच नाही करायचं सगळं सोडून एक शांत ठिकाणी बसायचं आणि कुठे चुकलो ,काय चुकीच्या गोष्टी केल्या इथपर्यंत ,त्याच विचार करायचं ,

त्या नंतर आपल्या आई-वडिलांचा विचार करायचा की जर ही गोष्ट त्यानां समजली तर ते पूर्णपणे तुटून जातील आणि संपून जातील ,

नंतर तुमच्या स्वप्नांच्या विचार करायचा की जर तुम्ही आज हार मानली तर ज्यासाठी एवढे त्याग केले ,एवढी मेहनत घेतली ,एवढ्या problems ला face केलेत त्याला काहीच अर्थ राहणार नाही …

हार मानायला वेळ लागतं नाही यार पण त्यानंतर ज्या गोष्टी वाईट घडणार आहेत ना त्यातून बाहेर पडायला वेळ लागतो ,

आणि तुम्ही एवढे strong आहात म्हणून या stage पर्यंत पोहोचले आहात ,नाहीतर खूप जणांनी अधिच हार मानलेली आहे ..

एवढे problems ला सामोरं गेलात आता खूप जवळ आला आहात तुम्ही एवढ्या साठी हार मानणार आहात का तुम्ही …

मला माहित आहे तुम्ही हे पूर्ण करू शकता कारण तुमच्यात तेवढी क्षमता आहे आणि जिद्द सुद्धा …

आता तुम्ही चालू केलेली शर्यत तुम्हीच संपवायची आहे कारण लोक इथे तुमच्या हरण्याची वाट बघत आहेत ,आणि तेच चुकी तुम्ही आज करणार होता …..

हे सगळे विचार डोक्यात आल्यावर सगळं विसरून परत त्याच मेहनतीने परत सुरवात करायची आणि तुम्हाला माहीत आहे यश आणि अपयश यात फक्त तुमचे प्रयत्न हाच फक्त फरक असतो बाकी काही नाही …

जय दिवशी तुम्ही ,तुम्हाला जे पाहिजे ते मिळवाल ना तो दिवस एवढा भारी असेल ना ज्याच तुम्ही विचार सुद्धा नाही करू शकत ..❤️


मी जगून दाखवेन पुन्हा -मराठी भाषण

marathi motivational kavita
marathi motivational kavita

येतील दुःख पाडायला मला,
मी सावरून दाखवेन पुन्हा.

येतील लोक पाय खेचायला माझे ,
मी उभा राहू दाखवीन पुन्हा .

येईल परिस्तिथी छळयला मला ,
मी लढून दाखवेन पुन्हा ,

येतील problems माझे patience परखायला ,
मी निरखून दाखवेन पुन्हा ,

येईल depression माझे स्वप्न तोडायला
मी सगळं विसरून ती उंची गाठेन पुन्हा ,

येतील खूप लोक रडवायला मला ,
मी हासून दाखवेन पुन्हा ,

येईल वेळ थांबवायला मला ,
मी थोडी विश्रांती घेऊन ,मेहनत करीन पुन्हा.

येईल वाईट काळ संपवायला मला ,
मी जगून दाखवेन पुन्हा..❤️


21 ते 30 वयाची Reality -Marathi Motivational Story

Marathi Motivationa katha
Marathi Motivationa katha

ह्याच वयात आपण घडतो ,पडतो ,लढतो ,हार मानतो ,काही निर्णय घेतो चुकीचे /बरोबर ,आपण तुटतो ,रडतो ,परत उठतो ,जिंकतो सुद्धा ,

शिक्षण संपलं का जॉब च्या मागे लागतो ,जॉब लगेच भेटत नाही ,मग आपण घरातच असतो काही महिने ,भिविष्याचा विचार करत ,negative विचार येतात डोक्यात ,

मग जे आपले स्वप्न असतात ते तर बाजूलाच राहतात आणि कुठला तरी एक जॉब करतो ,नसेल आवडत तरी ,
त्यावर 2 ते 3 वर्षात पूर्ण settel होईच tension ,

जे करत आहोत ते निट जमत नाही याच tension ,आणि त्यावर घरातील परिस्तिथी आणि problems ,आपण तोच pressure घेऊन जगत असतो रोज ,

हेच सगळं करण्यात काहीजण successful होतात तर काहीजण तुटतात ,आणि मग हार मानतात ,मग सगळ्या गोष्टी negative वाटायला लागतात ,

आणि इथेच तर सगळं चुकतं ना ,
कारण जेव्हा आपण घाई करतो ,एवढ्या सगळ्या गोष्टींमध्ये तेव्हा होत काहिनाही तेवढयापुरता चांगला वाटतं आणि नंतर जे

आहे ते आहेच रे ,
म्हणून घरच्यांना समजवा की हे नाही आहे जे मला करायचं आहे ,आणि त्यांच्याकडे फक्त 1 वर्ष मागा ,की ह्या वर्ष मला द्या ,जे मला करायचं आहे त्यासाठी मी प्रयत्न करीन ,जर नाही जमलं तर जे तुम्ही सांगाल ते करीन …

कारण तुम्ही ते नाही करू शकत जास्त वेळ जे तुम्हाला नाही आवडत ,
यार आपल्याला एक निर्णय घ्यावा लागेल ,तसच आयुष्य जगून नाही चालणार ,त्यासाठी घरातले ओरडतील ,रागावतील पण ते थोड्यावेळा पुरता असेल ,

कारण भविष्य महत्वाचं आहे ,आणि लग्न वैगरे तर होईलच यार ,सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहेत तुम्ही काय करत आहात बाकीच्या गोष्टी होतात बरोबर नंतर …😊

1 thought on “मराठी प्रेरणादायी भाषण(लेख) | Motivational Speech in Marathi”

Leave a Comment