2022 Best Marathi Kavita ,Lekh ,Suvichar Sangraha

कॉलेजच्या आठवणी

पहिला दिवस अतिशय भितीदायक वाटला परंतु एक महिना तर भीतीदायक ठरला पण एका महिन्यानंतर जे मित्र बनू लागले ते अतिशय उत्साही वाटू लागले होते जणूकाही मी एका वेगळ्या जगात आले. परंतु तोच भीतीदायक क्षण हवाहवासा वाटतोय कारण की त्या आठवणी आठवणीत राहून गेले कॉलेजचे ते क्षण प्रत्येक वेळेला भासू लागले. आता तर फक्त आणि फक्त कॉलेज कधी चालू होणार याचीच वाट पाहत आहे. कितीतरी गोष्टी कामे ठप्प पडले आहेत ती नेहमीप्रमाणे सुरळीत पणे चालू हवे हिच फक्त ईश्वरचरणी प्रार्थना आहे.

Sakshi Narsing Shinde


आयुष्य म्हणजे रंगांची उधळण🎭
ती रंगीबिरंगी आपण कशी करतो? हे
महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक रंग आपल्याला आपला कसा करता येईल
ही कला अवगत पाहिजे.
हेच तर खरं जीवन आहे.

Shukriya Ramesh Bargat


स्वपनाचे पंख घेऊन आकाशी उडत होते, हलुच मध्ये जबाबदारी चे वारे आले आनी पंखातले बलच निघून गेले…..

-Jayshri madhukar bamne


गुलाबाच्या पाकळ्या सारखं एक नात आहे तुझ्या माझ्यात.
गुलाबाच्या कळी सारखं आपलं ही नात खुलत जाऊ देत.
उमलेल्या गुलाबाच्या फुलांसारखं आपलं नातं ही खुलत जाऊ देत.
मनाने जोडलेल हे नातं एका सुंदर माळेत जन्म भरासाठी आपुलकी आणि प्रेम ह्या दोन धाग्यांत जोडून राहू दे.

-Crg_status


आयुष्याच्या वाटेवर ती तो कधी तरी हरवून जातो, संकट जर आल तरी तो थोडसं रडून घेतो, खुप जिद्दी आहे हो ..तो कितीही संकट आली तरी सारे जग जिंकून घेतो…..

Pratik suresh kada


सोडून द्यायला शिका …
प्रत्येक वेळी काही प्रतिक्रया दिलीच पाहिजे असे नसते.
कधी कधी काही गोष्टी सोडून द्यावा लागतात.
दुसरे आपल्याबद्दल काय विचार करतात , या बद्दल आपणच विचार करून दुःखी होण्या पेक्षा
कधी कधी काही गोष्टी सोडून द्यावा लागतात.
आपल कोणीच नाही …आपला कोणीच विचार करत नाही …हा नकारात्मक विचार करण्यापेक्षा…
कधी कधी काही गोष्टी सोडून द्यावा लागतात.
नेहेमी आपल्या मनात काय सुरु आहे..हे सांगत राहण्या पेक्षा….
कधी कधी काही गोष्टी सोडून द्यावा लागतात.

Chetan shankar warate


आहे एक मैत्रीण माझी आगळी वेगळी एकटे वाटले मला कधी येतो तुझ्या जवळी..

दिसे थोडी अकडु ही पण आहे प्रेमळ तीची बोली माझ्या साठी मैत्री म्हणजे आजारांत डॉक्टरांची गोळी….

हास्य पसरले आमच्या भोवती कितीही दुःख असो तुझ्या मनी नाही आहे या जगी तूझ्या तोडीसतोड कोणी..
आहे एक मैत्रीण माझी अशी आगळी वेगळी कधी काळजी घेणारी तर कधी अश्रू पुसणारी…

एकमेकांच्या मनातील गुपित फोडणारे लाडात येऊन मनोसोक्त गप्पा मारणारी आहे एक मैत्रीण माझी अशी आगळी वेगळी
माझ्यावर लटके रागवणारे माझ्याशी भांडणारे मला नेहमीच समजून घेणारे माझ्याशी प्रत्येक गोष्ट share करणारी आहे एक मैत्रीण माझी अशी आगळी वेगळी,

तुझी आणि माझी भेट होयला कारण लागत नाही भेटलो नाही म्हणून अंतर वाढत नाही.सुख दुःख वाटुन घ्यायला सांगाव लागत नाही, कारण मैत्री शिवाय आयुष्याला अर्थ उरत नाही आहे एक मैत्रीण माझी अशी आगळी वेगळी

avishkar g hande


प्रेम 💯❤️

आपण जर कोणावर खरं प्रेम करत असेल तर तोच येईल का आपला जोडीदार बनून ? प्रेमात खुप ताकत असते ना आणि प्रेमावर विश्वास ठेवला तर भेटेल का तोच आपल्याला आयुष्याचा जोडीदार म्हणून ?

मला नाही माहीत तु माझ्या आयुष्यात आहेस की नाही पण मी पूर्ण प्रयत्न करेल तुला माझ्या आयुष्यात आणण्यासाठी..

तु एकदा शांत बसुन स्वतःला विचार ती जर तुझी होती तर ती तुला सोडून का गेली तुझ्या डोळ्यात पाणी का येऊ दिल तिने कदाचित असेल दुसरा कोणता विषय असच वाटत ना तुला मग तुला सोडून दिल्यावर ती दुसऱ्यासोबत का दिसली ती जर तुझी होती तर तुला सोडल्यावर ती तुझ्याच बद्दल वाईट का बोलली ?

आणि अजून पण तिचीच वाट पाहतोय तिच्यासाठी दुसऱ्या कोणत्या मुलीला होकार पण देत नाहीस जरा विचार कर ह्या गोष्टीचा प्रेम ना ह्या जगातली सगळ्यात सुखद भाव आहे जर कोण आपल्यावर जीवापाड प्रेम करत असल तर बोलावं ना हो काय माहित ती मुलगी तुम्हाला प्रेमाची एक नवीन परिभाषा शिकवेल..

तुम्ही ना त्या मागच्या गोष्टींमधून बाहेर पडायला हवं एकदा धोका भेटला म्हणजे नेहमी तसच होईल असं नाही होत ना..

जिच्यामुळे तुम्ही दुसऱ्याचं प्रेम नाकारत आहात अरे तिला तर तुमचं तोंड पण पहायचं नाहीये तुमचं प्रेम काय तुमच्या सोबत सुध्दा राहायचं नाहीये आणि अश्यांसाठी तुम्ही तिला नाही म्हणू नका जिचं खरंच तुमच्यावर खुप प्रेम आहे ,

होकाराची वाट ना जास्त करून मुली 1 आठवडा किंवा महिनाभर बघतात आणि आता तर 1 वर्ष झालं राव मी तुझ्या होकाराची वाट बघतेय हो बोल ना मला मी देईल तुझी साथ शेवटपर्यंत हो माहितेय वाढाव बोलते मी चिडते तुझ्यावर रागावते खुप पण कधी सोडून नाही जाणार तुला मी तुझ्या डोळ्यात कधीच पाणी नाही येऊन देणार plz हो बोल ना bestie..💯❤️

बग आत्ता आहे वेळ बोलून टाक हो परत काही वर्षांनी मी डॉक्टर झाले ना घरीच येऊन मागणी घालेल तुला लग्नाची मग बघू कोण नकार देतंय आणि मी माझ्या प्रेमाला मिळवण्यासाठी मागणी घालणार च आहे बघू देव पण किती दिवस लांब ठेवतो तुला माझ्या पासून.. I love you always 💕

तुझी जिवलग मैत्रिण 💖


हल्लीना आपण सगळे या mobile, social media मुळे आभासी जगात जगतोय.. कंटाळा आला किंवा जरा वेळ मिळाला की लगेच मोबाईल घेऊन बसतोय..त्यामुळं थोड भारी वाटत..

पण ना एखाद्याशी मोबाईल वर बोलण्यापेक्षा त्या व्यक्तीला समक्ष भेटून बोला..त्यानं काय होतंय की आपण आपला विचार कधीही एखाद्याला समोर असल्यावर जास्त चांगल्या रीतीने पटवून देऊ शकतो नाकी टाईप करुन सांगून…

समोरच्यालाबी बर वाटत भाव आपल्यासाठी आलंय इथपर्यंत .. आपल्याबद्दल खरंच काहीतरी वाटत राव… कसाय ना आपल्याकडे सगळं हाय पण आपल्या माणसांना देण्यासाठी वेळ नाह्याय कुणाकडेच..

त्यामुळे आभासी जगात जगण्यापेक्षा एकमेकांना वेळ द्या त्यामुळं आपली माणसं एकटी पडणार न्हाईत…एकटेपण माणसाचं आयुष्य खायला उतत..मग आत्महत्या असल काय बी हूनार न्हाय….

कोण कुणाकडं काय मागाय येत न्हाय पण तोंड भरून बोललं ना की समोरचा कुटबी गाट पडूदे आपल्याला हाक मारल्याशिवाय फूड नाय जाणार…

अपल्यालाबी बर वाटत….उद्याच कुणी काय सांगितलय हाय तवर एकमेकांशी बोलून चालून चांगलं राहव्या की…हाय का नाय..

Avdhut subhash jadhav


आई..

आई म्हणजे नक्की काय ?
भूक असतानाही मला भूक नाही बाळा, तू खा असे बोलणारी
प्रत्येक संकटामध्ये खंबीरपणे मागे राहणारी
कधी पैशाची अडचण असल्यास, मी आहेना! बोलून लोकांच्या घरची धुणीभांडी करणारी
नेहमी मुलांची काळजी करणारी
संसार चालवताना स्वतःलाच विसरून गेलेली

आई म्हणजे नक्की काय ?
जिची परतफेड देव हि करू शकत नाही ती आई 🌹
प्रत्येक जन्मी हिच आई मिळूदे हिच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏

Anjali Vinayak Pawar


आलास आयुष्यात अनोळखी बनुन…
अन दिलीस प्रेमाची बाग फुलवुन…
आभार मंडण्या तुझे पढतील शब्द ही फीके…
होते आसवांचे तळे जिथे उमलवलीस कळी तु तिथे…

न बोलताच घेतलेस समजुण…
न सांगताच दिलस सगळ समजाऊन…
किती अलगद सोडवलेस जिवनातील कोडे…
मन हे माझे आता फक्त तुझ्याच साठी वेडे…

आस लागते या जीवा तुला पाहण्याची…
अलगद ऊमलते दिश्या नव्याने जगण्याची…
सावरले या बीखरलेल्या आयुष्यातुन माझ्या…
नव्याने दिलेले हे जीवन आता नावाव तुझ्या…

आभाळाएवढं प्रेम करते पढणार नाही कधी कमी…
आयुष्यभर सोडणार नाही साथ हिच देते हमी…
सोडु नकोस कधी तु ही मधेच हाथ…
रमायच आहे मला तुझ्याचबर संसारात…

Charushila nandkumar sankpal


झाली ही ओळख जुनी तरीही तुझ्याकडे पाहतच बसावस वाटत…
रोज नव्याने तुझ्या प्रेमात पडावस वाटत…

स्वप्न म्हणावे की सत्य काहीच नाही समजत…
तुझ्याशिवाय दुसरे काही नाही आता उमजत…

नशिबवान आहे मी दिलीस तु मला साथ…
विश्वास आहे या प्रेमात सुटणार नाहित कधीच हात…

मोजायला गेलो प्रेम तर आभाळ ही पडेल फिके…
मांडायला बसलो कागदावर तर हे शब्द ही झाले मुके…

Charusheela nandkumar sankpal


ना गरजेनुसार ना गरजेसाठी…
नात हे जोडलं आयुष्यभरासाठी…

ओळख होती जिथे क्षणभराची…
उमलली अलगद कळी तिथे मैत्रीची…

अनोळखी हातात ही जाणवते साथ हक्कची…
मैत्रीत या नव्याने जाणीव होते आपुलकीची…

काय कमवलसं आयुष्यात जरी कुणी मला विचारले…
आवडेल सांगायला मला शिंपल्यातुन मोती जमवले…

अतुट बंधनामुळे मैत्रीच्या नाही कसलं टेन्शन…
सोबत आहे तुमची हिच आयुष्यभराची पेन्शन…

Charushila nandkumar sankpal

Leave a Comment